Sharad Purnima 2021: जाणून घ्या कोजागिरी पौर्णिमेच्या पूजेचा शुभ मुहूर्त आणि महत्त्व

kojagari purnima muhurt in marathi । शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा अश्विन मासातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरी केली जाते. या दिवशी लक्ष्मी मातेची भक्तिभावाने पूजा केली जाते. 

kojagari purnima sharad purnima know the pooja shubh muhurt and importance
Sharad Purnima 2021: जाणून घ्या कोजागिरी पौर्णिमेच्या पूजेचा शुभ मुहूर्त आणि महत्त्व  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री खासकरून खीर बनवली जाते.
  • या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा केली जाते.
  • भक्ती भावाने लक्ष्मी मातेची पूजा अर्चा करतात त्यांच्यावर लक्ष्मी देवीची कृपा कायम राहते.

kojagari purnima muhurt in marathi । मुंबई: सर्व पौर्णिमांमध्ये विशेष मानली जाणारी शरद पौर्णिमेचे(sharad pournima 2021) पर्व आज आहे. शरद पौर्णिमेला अश्विन मासातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरी केली जाते. या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमाही(kojagari pournima) म्हणतात. या दिवशी लक्ष्मी मातेची(laxmi mata) भक्ती भावाने पूजा करतात. जे भक्तगण भक्ती भावाने लक्ष्मी मातेची पूजा अर्चा करतात त्यांच्यावर लक्ष्मी देवीची कृपा कायम राहते. 

असं म्हटलं जात की शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्र सोळा कलांनी युक्त असतो. शास्त्रानुसार शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्रातून निघणाऱ्या किरणांमध्ये सर्व रोगांचा नाश करण्याची क्षमता असते. याच कारणामुळे म्हटले जाते की शरद पौर्णिमेच्या रात्री अमृत वर्षा होते. अशीही मान्यता आहे की शरद पौर्णिमेच्या दिवशी चंद्र, पृथ्वीपासून खूप जवळ असतो. यादरम्यान अंतराळातील सर्व ग्रहांमधून निघणारी पॉझिटिव्ह एनर्जी चंद्राच्या किरणांनी सरळ पृथ्वीवर पोहोचते. 

शरद पौर्णिमेच्या रात्री बनवली जाते खीर

शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी खासकरून खीर बनवली जाते. ही खीर रिकाम्या आकाशाखाली ठेवली जाते. यामागचे वैज्ञानिक कारण म्हणजे चंद्राचे औषधीय गुणांनी युक्त किरणे पडल्याने खीर अमृतासमान होते. याचे सेवन करणे लाभदायक मानले जाते. याशिवाय असा तर्कही आहे की दुधात लॅक्टिक अॅसिड असते जे चंद्राच्या किरणांनी अधिक मात्रेतील शक्ती शोषतात आणि भातात स्टार्च असल्याने ही प्रक्रिया आणखी सोपी होते. वैज्ञानिक मान्यतेनुसार ही खीर खाल्ल्याने आरोग्याच याचे खूप फायदे होतात. 


काय आहे शरद पौर्णिमेची कथा

प्राचीन कथेनुसार एका सावकाराच्या दोन मुली होत्या. या दोन मुली पौर्णिमेचे व्रत भक्तीभावाने करत असतं. एकदा मोठ्या मुलीने पौर्णिमेचे व्रत विधीपूर्वक केले मात्र छोट्या मुलीने ते व्रत करणे सोडले. या कारणामुळे छोट्या मुलीचे बाळ जन्म घेताच मृत्यू पावले. त्यानंतर सावकाराच्या मोठ्या मुलीच्या पुण्यस्पर्शाने लहान मुलीचे बाळ पुन्हा जिवंत झाले. तेव्हापासून हे व्रत विधीपूर्वक करण्याची पद्धत आहे. 

कोजागिरी पौर्णिमेचा शुभ मुहूर्त

या वर्षी अश्विन पौर्णिमेची तारीख 19 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 07 पासून सुरू होईल आणि 20 ऑक्टोबर रोजी रात्री 08:20 वाजता संपेल. चंद्रोदयानंतर संध्याकाळी शरद पौर्णिमेची पूजा केली जाते. या दिवशी, पूजेची शुभ वेळ संध्याकाळी 5:27 वाजता चंद्रोदयानंतर असेल.

अशी करा पूजा

या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा केली जाते. या दिवशी सकाळी स्नान करून एका पाटावर लाल रंगाचा कपडा पसरला. यानंतर यावर लक्ष्मी मातेच्या प्रतिमेची स्थापना करा. आता लक्ष्मी मातेची विधीवत पूजा करा. यानंतर स्त्रोताचे पठण करा. या दिवशी स्त्रोताचे पठण केल्यावर लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर कायम राहते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी