Sharad poornima 2021: द्या कोजागिरी पौर्णिमेच्या मराठी शुभेच्छा, Wishes, Facebook आणि Whatsapp मेसेज

Whatsapp Quotes on Sharad poornima 2021:  कोजागिरी पौर्णिमेला आता आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या मित्र-मैत्रिणींना कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा आणि पुढील मेसेज देखील पाठवू शकता.

kojagiri purnima 2021 messages wish your family and friends with these beautiful lines a happy sharad purnima
कोजागिरी पौर्णिमेच्या मराठी शुभेच्छा 
थोडं पण कामाचं
  • नवत्रोत्सवाची सांगता झाल्यानंतर आता सर्वांनाच कोजागिरी पौर्णिमेचे वेध लागतात.
  • यंदा (१९ ऑक्टोबर) कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यात येणार आहे.
  • शरद पौर्णिमेच्या दिवशी घरात स्वच्छता करून खीर किंवा बासुंदी बनवली जाते.

Sharad poornima 2021 whatsApp Marathi wishes and Messages (Kojagiri Purnima २०२१): नवरात्रोत्सवाची सांगता झाल्यानंतर आता सर्वांनाच कोजागिरी पौर्णिमेचे वेध लागतात. यंदा (१९ ऑक्टोबर) कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यात येणार आहे. या दिवशी चंद्राचं साजरं रुप आणि टपोरं चांदणं पाहायला मिळणार आहे. यावेळी सर्व जण रात्री बारा वाजेपर्यंत जाऊन ही पौर्णिमा साजरा करतात. याच सणानिमित्त आता आपण डिजिटल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांना शुभेच्छा देऊ शकता. चला तर यानिमित्ताने आपणही आपल्या मित्र मंडळींना द्या विशेष शुभेच्छा.

हिंदू धर्मात शरद पौर्णिमेच्या व्रताचे विशेष महत्व आहे. असे मानले जाते की या दिवशी जो पण हे व्रत करेल त्याला सुख आणि समाधान लाभते आणि त्याला आजीवन आजारापासून दूर राहतात.  शरद पौर्णिमेच्या दिवशी घरात स्वच्छता करून खीर किंवा बासुंदी बनवली जाते. त्याला चांदी भांड्यात ठेऊन खुल्या आभाळाखाली ठेवले जाते. त्यानंतर सकाळी उठून स्नान करून प्रसाद म्हणून त्याचे ग्रहण केले जाते. मानले जाते की असे केल्याने तुमच्या शरीरातील गंभीरातील गंभीर व्याधी दूर होते. शरद पौर्णिमेचे व्रत संतान प्राप्ती आणि संतानाच्या दीर्घायुष्यासाठी  ठेवले जाते.  

दरवर्षी मोठ्या उत्साहात कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाते. यावेळी अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वेगवेगळे कार्यक्रम साजरे केले जातात. मात्र यंदा कोरोनाचे सावट असल्याने हा उत्सव साधेपणा साजरा करण्यात येणार आहे. 

मात्र, असं असलं तरीही आपण कोजागिरी पौर्णिमेचा उत्साह अजिबात कमी होऊ देऊ नका. आपण कोरोना संसर्गामुळे एकत्र येऊ शकलो नाही तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून कोजागिरीच्या शुभेच्छा आपल्या नातेवाईकांना आणि मित्र मंडळींना नक्कीच देऊ शकता. त्यामुळे आम्ही आपल्यासाठी काही खास मेसेज आम्ही घेऊन आलो आहोत आपण हे खास ग्रीटिंग्ज संदेश (Sharad poornima 2021 wishes and Quotes) वापरू शकता. तसेच व्हॉट्सअ‍ॅपवर (Whatsapp) आणि सोशल मीडियावर हे शुभेच्छांचे मेसेज शेअर करु शकतात.  

द्या कोजागिरीच्या खास शुभेच्छा!

Kojagiri pornima marathi messages 8

                                           Kojagiri Purnima HD Wishes (Photo Credits: BCCL)

चंद्राचा शीतल प्रकाश 
त्यात दुधाचा गोड स्वाद 
असावा गोडवा साखरेचा... 
कोजागिरी पोर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! 

Kojagiri pornima marathi messages 9

                                           Kojagiri Purnima HD Wishes (Photo Credits: BCCL)

आजचा दिवस खूप सुखकारक आणि आनंदमयी जावो
आनंदाची उधळण आपल्यावर नेहमीच होवो
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा! 

Kojagiri pornima marathi messages 10

                                           Kojagiri Purnima HD Wishes (Photo Credits: BCCL)

चंद्राची शीतलता, शुभ्रता, कोमलता, 
उदारता, प्रेमलता आपल्याला आणि आपल्या कुटुंबीयांना प्रदान होवाो 
कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा!

Kojagiri pornima marathi messages 11

                                           Kojagiri Purnima HD Wishes (Photo Credits: BCCL)

चंद्राच्या मंद प्रकाशाला मधुर दुधाची साय, 
प्रकाशमय करणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनात वाढवू ऋणानुबंधाचा हात 
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

Kojagiri pornima marathi messages 12

                                         Kojagiri Purnima HD Wishes (Photo Credits: BCCL)

कोजागिरी पौर्णिमेच्या आपणास आणि 

आपल्या कुटुंबीयांस खूप-खूप शुभेच्छा! 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी