Krishna Janmashtami 2022 Messages in Marathi: कृष्ण जन्माष्टमी मराठी शुभेच्छा, Quotes, Facebook Messages द्वारा शेअर करत साजरा करा यंदा गोकुळाष्टमी

Janmashtami 2022 Messages : कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा तुमच्या मित्रपरिवारासोबत गोकुळाष्टमीच्या निमित्ताने WhatsApp, Facebook द्वारा शेअर करत साजरा करायला विसरू नका.

krishna-janmashtami-2022-wishes-in-marathi-quotes-facebook-messages-to-share-with-your-loved-ones-on-gokulashtami
कृष्ण जन्माष्टमी मराठी शुभेच्छा 
थोडं पण कामाचं
  • कृष्ण जन्माष्टमी (Krishna Janmashtami ) म्हणजे श्रीकृष्णाचा जन्मदिवस.
  • हिंदू धर्मीय हा सण गोकुळाष्टमी (Gokulashtami) म्हणून देखील साजरा करतात.
  • कृष्ण जन्माष्टमी यंदा भारतामध्ये 17 ऑगस्टला साजरी केली जाणार आहे.

 Krishna Janmashtami 2022 Messages in Marathi: कृष्ण जन्माष्टमी (Krishna Janmashtami ) म्हणजे श्रीकृष्णाचा जन्मदिवस. हिंदू धर्मीय हा सण गोकुळाष्टमी (Gokulashtami) म्हणून देखील साजरा करतात. कृष्ण जन्माष्टमी यंदा भारतामध्ये 17 ऑगस्टला साजरी केली जाणार आहे. भगवान विष्णूंनी घेतलेल्या अवतारांपैकी आठवा अवतार हे श्रीकृष्ण आहेत.  

गोपिकांच्या खोड्या करणाऱ्या कृष्ण कन्हैय्या ते युद्ध भूमीवर अर्जुनाला उपदेश करणारा तत्तवज्ञ श्रीकृष्ण असा विविध टप्प्यावरील त्यांचे अचंबित करणारी रुपं मनमोहून टाकतात.  कृष्ण जन्माष्टमीला रात्री 12 वाजता कृष्ण जन्म साजरा केला जातो. यंदा या कृष्ण जन्मानिमित्त तुमच्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना, प्रियजणांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा देण्यासाठी टाइम्स नाऊ मराठी कडून तयार करण्यात आलेले हे फोटोज तुम्ही नक्की डाऊनलोड करू शकता. सोशल मीडीयात व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस, स्टिकर्स, फेसबूक मेसेजेस, Wishes, GIFs द्वारा जन्माष्टमी अर्थात गोकुळाष्टमीचा आनंद द्विगुणित करू शकता.

गोकुळाष्टमीचे मेसेज ( Krishna Janmashtami 2022 Messages in Marathi )

Krishna Janmashtami 2022 Messages in Marathi

                                             Krishna Janmashtami 2022 Messages in Marathi ।  Photo : Times now Marathi

कृष्णाच्या भक्तीत विसरा सर्व दुःख,

मिळून कृष्ण भक्तीत सारे

हरी गुण गाऊ एकत्र..

कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!

Krishna Janmashtami 2022 Messages in Marathi 2

                                             Krishna Janmashtami 2022 Messages in Marathi ।  Photo : Times now Marathi

अच्युत्म केशवं कृष्ण दामोदरं

राम नारायणं जानकी वल्लभं

गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!

Krishna Janmashtami 2022 Messages in Marathi 1.

                                             Krishna Janmashtami 2022 Messages in Marathi ।  Photo : Times now Marathi

ढगांच्या आडून चंद्र हासला

आकाशी ता-यांचा रास रंगला

कृष्ण जन्मला ग बाई कृष्ण जन्मला

कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!

Krishna Janmashtami 2022 Messages in Marathi 4

                                             Krishna Janmashtami 2022 Messages in Marathi ।  Photo : Times now Marathi

कृष्ण ज्याचं नाव

गोकुळ ज्याचं धाम

अशा श्री भगवान कृष्णाला

आमचा शतश: प्रणाम

गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा

Krishna Janmashtami 2022 Messages in Marathi 3

                                             Krishna Janmashtami 2022 Messages in Marathi ।  Photo : Times now Marathi

जर तुम्ही धर्म कराल तर

देवाकडुन तुम्हांला मागावे लागेल,

आणि जर तुम्ही कर्म कराल तर

देवाला तुम्हाला द्यावेच लागेल,

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!

दरम्यान, जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी मोठ्या धूमधडाक्यात गोपाळकाला किंवा दहीहंडी (Dahi Handi) साजरी केली जाते. श्रीकृष्णाने व्रज मंडळात गाई चारताना आपण व आपले सवंगडी या सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र करून, त्या खाद्य पदार्थांचा काला केला व सर्वांसह त्याचे भक्षण केले अशी कथा आहे. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी