Lakshmi Pujan 2021 Wishes: लक्ष्मीपूजनाच्या मराठमोळ्या शुभेच्छा SMS, Greetings, GIFs, Images, Whatsapp Stickers च्या माध्यमातून देऊन तुमच्या नातेवाईकांना यंदाची दिवाळी करा खास

Laxmi Pooja Marathi Wishes 2021: लक्ष्मीपूजनाच्या मंगलमयी दिनाच्या आपल्या आप्तलगांना शुभेच्छा देऊन त्यांचा लक्ष्मीपूजनाचा दिवस खास करण्यासाठी कामी येतील या मराठमोठ्या शुभेच्छा ग्रीटिंग्स.

lakshmi pujan 2021 wishes greeting messages stickers in marathi for whatsapp and facebook status to wish your relatives on this laxmi pujan
Lakshmi Pujan 2021 Wishes: लक्ष्मीपूजनाच्या मराठी शुभेच्छा 
थोडं पण कामाचं
  • दिवाळी हा भारतीय सणांमधील पवित्र आणि भारतीय संस्कृती जपणारा असा मंगलमयी सण आहे.
  • यंदाच्या दिवाळीत नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन हे एकाच दिवशी आल्याने ही दिवाळी सर्वांसाठी खास असणार आहे . 
  • पुराणकथेनुसार लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्रीच्या वेळी लक्ष्मी सर्वत्र संचार करते.

Laxmi Puja Marathi Wishes: दिवाळी हा भारतीय सणांमधील पवित्र आणि भारतीय संस्कृती जपणारा असा मंगलमयी सण आहे. यंदाच्या दिवाळीत नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन हे एकाच दिवशी आल्याने ही दिवाळी सर्वांसाठी खास असणार आहे .  (lakshmi pujan 2021 wishes greeting messages stickers in marathi for whatsapp and facebook status to wish your relatives on this laxmi pujan)

 पुराणकथेनुसार लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्रीच्या वेळी लक्ष्मी सर्वत्र संचार करते. ज्या ठिकाणी स्वच्छता, सौंदर्य, आनंद, उत्साह अशा सकारात्मक बाबी असतात तेथे लक्ष्मी प्रसन्न होऊन आशीर्वाद देते. म्हणूनच या दिवशी सायंकाळी लक्ष्मीपूजन केले जाते. लक्ष्मीपूजनाला पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात. त्यावर वाटी किंवा तबक ठेवतात. त्यात सोन्याचे दागिने, चांदीचा रुपया, दागिने ठेवून त्यांची पूजा करतात.व्यापारीवर्गातही लक्ष्मीपूजनाला विशेष महत्त्व प्राप्त आहे.

अशा या मंगलमयी दिनाच्या आपल्या आप्तलगांना शुभेच्छा देऊन त्यांचा लक्ष्मीपूजनाचा दिवस खास करण्यासाठी कामी येतील या मराठमोठ्या शुभेच्छा ग्रीटिंग्स.

लक्ष्मीपूजन मराठी शुभेच्छा :

laxmi poojan marathi wishes


दिवाळीच्या मुहूर्ती,

अंगणी भाग्यलक्ष्मीची स्वारी

सुख-समाधान, आरोग्य आणि धनसंपदा,

गुंफून हात हाती, तुमच्या दारी यावी

लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा

laxmi poojan marathi wishes 1


महालक्ष्मीचे करुनी पूजन,

लावा दीप अंगणी

धनधान्य आणि सुख-समृद्धी,

लाभेल तुम्हा जीवनी

लक्ष्मीपूजनाच्या खूप खूप शुभेच्छा

laxmi poojan marathi wishes 2

समृद्धी यावी सोनपावली,

उधळणं व्हावी सौख्याची

भाग्याचा सर्वोदय व्हावा,

वर्षा व्हावी हर्षाची

लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा

laxmi poojan marathi wishes 3

रांगोळीच्या सप्तरंगात

सुखाचे दीप उजळू दे,

लक्ष्मीच्या पावलांनी

घर सुख-समृद्धीने भरू दे

लक्ष्मीपूजनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा

laxmi poojan marathi wishes 4


लक्ष्मीचा हात असो,

सरस्वतीची साथ असो,

गणरायाचा निवास असो,

आणि माता दुर्गेच्या आशीर्वादाने

आपले जीवन नेहमी उजळून जावो,

लक्ष्मीपूजनाच्या खूप सा-या शुभेच्छा!

laxmi poojan marathi wishes 5

लक्ष्मीपूजन हा दिवस सामान्य नागरिकांसह व्यापारी, दुकानदार देखील मोठ्या उत्साहात साजरा करतात. त्यामुळे या दिवसाची महत्व काही औरच असते. हिशोबाचे नवीन वर्ष लक्ष्मीपूजनानंतर सुरू होत असल्याने दुकानांची सजावट करुन लक्ष्मी आणि कुबेराचे पूजन केले जाते.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी