Diwali Puja Shubh Muhurta 2021: आज लक्ष्मीपूजन; नोकरदार, व्यावसायिक आणि घरी राहणारे लोक कधी करू शकणार लक्ष्मी मातेची पूजा

आध्यात्म
भरत जाधव
Updated Nov 04, 2021 | 08:08 IST

Diwali Puja Shubh Muhurta 2021:आज लक्ष्मी मातेची पूजा केली जाणार आहे. दिवाळीतील पूजा सर्वजण आप-आपल्या वेळेत करत असतात. नोकरदार, व्यावसायिक लोकांसाठी पूजेचा मुहूर्त वेगवेगळा निघाला आहे.

Lakshmi pujan Time For Employees, professionals and people living at home
Diwali Puja : नोकरदार वर्ग आणि व्यावसायिक व्यक्तींसाठी लक्ष्मीपूजनाची वेळ   |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • घरी आपल्या घरातील कुटुंबियांबरोबर दिवाळी सण साजरा करणारे लोक संध्याकाळी करतील लक्ष्मी पूजन
  • नोकरदार वर्ग सकाळी लक्ष्मी मातेची पूजा करू शकतील.

Diwali Puja Shubh Muhurta 2021: मुंबई : आज लक्ष्मी मातेची पूजा केली जाणार आहे. दिवाळीतील पूजा सर्वजण आप-आपल्या वेळेत करत असतात. नोकरदार, व्यावसायिक लोकांसाठी पूजेचा मुहूर्त वेगवेगळा निघाला आहे. पूजेच्या वेळेविषयी अधिक माहिती आपण जाणून घेऊ आचार्य शिरोमणी यांच्याकडून. चला तर जाणून घेऊन तुमच्यासाठी पूजेची योग्य वेळ कोणती असेल. 
नोकरदार वर्गातील लोक कधी करू शकणार लक्ष्मीची पूजा  

ज्या लोकांना वेळेची कमतरता असेल किंवा कामामुळे वेळ कमी राहत असेल तर तुम्ही सकाळी शुभ मुहूर्तावर लक्ष्मी माता आणि गणेश जींची पूजा करू शकतात. हा शुभ मुहूर्त सकाळी साडेसात ते पावणे दहा वाजेपर्यंत राहणार आहे. या दिवशी नोकरदार वर्गातील व्यक्ती पूजा करू शकतात.  

व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांसाठी कोणती वेळ आहे शुभ

व्यापारी किंवा व्यावसायिक लोकांसाठीही आचार्यांनी एक शुभ मुहूर्त सांगितला आहे. व्यापारी वर्गातील लोक दुपारी 1.43 ते 3.13 वाजेपर्यंत पूजा करू शकणार आहेत. यावेळे दरम्यान लक्ष्मी माता आणि गणपती बाप्पाची पूजा केली जाऊ शकते. लक्ष्मी मातेच्या पूजेमुळे तुमच्या घरात सुख-समृद्धी येईल.  


घरी असणारे व्यक्ती कधी करू शकतात पूजा 

घरीच राहणारे लोक म्हणजे ज्यांना कामावर, नोकरीसाठी जावे लागत नाही असे लोक लक्ष्मी मातेची पूजा गुरुवारी म्हणजेच आज संध्याकाळी करू शकतील. संध्याकाळी 6.26 ते 8.20 वाजेपर्यंत लक्ष्मी मातेची पूजा करू शकणार आहेत.  हा शुभ काळ अशा लोकांसाठी आहे जे हा सण आपल्या घरी कुटुंबासह साजरा करणार आहेत. या शुभ मुहूर्तावर तुम्ही कुटुंबासह माता लक्ष्मी आणि गणेशजींची पूजा करू शकता.

दिवाळी सण कसा साजरा करायचा

घराची उत्तर दिशा ही माता लक्ष्मीची दिशा मानली जाते. तेथे एक लाकडी फळी ठेवून त्यावर लाल कापड पसरवावे. यानंतर तेथे माता लक्ष्मी, कुबेर देव, गणेशजींची स्थापना करावी. त्यांना अक्षत म्हणजेच पांढरा तांदूळ अर्पण करा. यासोबतच तेथे 3 दिवे लावा.
यानंतर, सर्वप्रथम लाल गुलाब किंवा पिवळ्या झेंडूचे फूल घेऊन पवित्र करा. त्यानंतर देवांसमोर शुद्ध तुपाचा दिवा लावावा. सर्वप्रथम गणेश जींचा ओम गण गणपते नमः किंवा ओम श्री गणेशाय नमः या मंत्राचा जप करा. यानंतर 108 वेळा श्री महालक्ष्मी नम किंवा ओम दीप श्रीलक्ष्मी नम जप करा. त्यानंतर तुम्ही तांदूळ, लाल गुलाब, गंगाजल घेऊन माता लक्ष्मीसमोर प्रार्थना कराल की तुम्ही नेहमी आमच्या घरात विराजमान रहा.

देवी लक्ष्मीच्या चरणी मधाचा डबा ठेवा

यानंतर तुम्ही चांदी किंवा कोणत्याही धातूचा बॉक्स घ्या. त्यात शुद्ध मध आणि थोडे नागकेसर टाकून देवी लक्ष्मीच्या चरणी रात्रभर ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ केल्यानंतर हा डबा घरातील तिजोरीत ठेवावा. असे केल्याने घर वर्षभर ऐश्वर्य आणि अन्नाने भरलेले राहते.
माता लक्ष्मीला कमळ खूप प्रिय असल्याने. लक्ष्मी आणि भगवान विष्णूला कमळाचे फुले आणि लाल गुलाबाच्या फुलांचा हार अर्पण करावा. त्यानंतर ओम श्रीं श्रेय नम: मंत्राचा १०८ वेळा जप करावा. असे केल्याने घरातील अडकलेली कामे पूर्ण होऊ लागतात. कुटुंबातील मुले आणि वडील निरोगी राहतात आणि घरात पैशाचा ओघ वाढतो. 

(टीप: या लेखातील माहिती सामान्य माहिती आणि गृहितकांवर आधारित आहे. टाइम्स नाउ मराठी न्यूज याची पुष्टी करत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी