Parshuram Jayanti 2022: आज सर्वत्र साजरी होतेय परशुराम जयंती; जाणून घ्या पूजा पद्धती आणि शुभ मुहूर्त 

आध्यात्म
Updated May 03, 2022 | 10:13 IST | टाइम्स नाऊ मराठी

Parshuram Jayanti 2022 Date । परशुराम जयंती यंदाच्या वर्षी ३ मे रोजी साजरी केली जात आहे. म्हणजेच वैशाख शुक्ल तृतीयेला परशुराम जयंती साजरी केली जाते. अक्षय्य तृतीयेचा सणही याच दिवशी साजरा केला जातो. पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान परशुरामाचा जन्म झाला होता.

Learn the worship methods and auspicious moments of Parshuram Jayanti
जाणून घ्या परशुराम जयंतीचा शुभ मुहूर्त आणि पूजेची पद्धत   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • परशुराम जयंती यंदाच्या वर्षी ३ मे रोजी साजरी केली जात आहे.
  • वैशाख शुक्ल तृतीयेला परशुराम जयंती साजरी केली जाते.
  • पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान परशुरामाचा जन्म झाला होता.

Parshuram Jayanti 2022 Date । मुंबई : परशुराम जयंती यंदाच्या वर्षी ३ मे रोजी साजरी केली जात आहे. म्हणजेच वैशाख शुक्ल तृतीयेला परशुराम जयंती साजरी केली जाते. अक्षय्य तृतीयेचा सणही याच दिवशी साजरा केला जातो. पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान परशुरामांचा जन्म झाला होता. भगवान परशुराम हे भोलेनाथांचे परम भक्त असून त्यांना प्रसन्न करण्यासाठी परशुरामांनी कठोर तपश्चर्या केली होती. परशुरामांच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन भगवान शिवाने परशुरामांना परशु अशी उपमा दिली होती. म्हणूनच त्यांना परशुराम असे म्हणतात. परशुरामांना भगवान विष्णुचा अवतार देखील मानले जाते. पौराणिक कथांमध्ये ते त्यांच्या प्रताप, ज्ञान, भक्ती व्यतिरिक्त त्यांच्या रागासाठी देखील ओळखले जातात. (Learn the worship methods and auspicious moments of Parshuram Jayanti).

अधिक वाचा : ओळख करत शिक्षकाने शिक्षिकेवर केला बलात्कार

आज साजरी होतेय परशुराम जयंती

यंदाच्या वर्षी परशुरामांची जयंती आज म्हणजेच ३ मे रोजी साजरी केली जात आहे. असे मानले जाते की, परशुरामांचा जन्म राजांनी पृथ्वीवर पसरवलेले पाप आणि अधर्म दूर करण्यासाठी झाला होता. त्यांना भगवान शिवाचे एकमेव शिष्य मानले जाते. लक्षणीय बाब म्हणजे परशुराम यांच्या संबंधित अनेक पौराणिक कथा प्रसिद्ध आहेत. 

परशुराम जयंतीचा शुभ मुहूर्त आणि पूजेची पद्धत

वैशाख शुल्कची तृतीया मंगळवार ३ मे रोजी पहाटे ५.२० पासून सुरू होईल आणि बुधवार ४ मे रोजी सकाळी ७.३० वाजेपर्यंत चालेल. परशुराम जयंतीच्या दिवशी पहाटे लवकर स्नान करून उपवासाचे व्रत करावे. एका पाठावर स्वच्छ पिवळे किंवा लाल कापड अंथरून भगवान परशुरामांची मुर्ती अथवा फोटो लावून अभिवादन करा. चंदन-अक्षतांनी तिलक लावल्यानंतर त्यांना फुले, फळे, मिठाई अर्पण करा. तिथे तुपाचा दिवा लावावा. मंत्राचा जप करावा, धूप लावून शेवटी आरती करावी. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी