Vastu Tips: घरात कोणत्या ठिकाणी तिजोरी असावी? जाणून घ्या याचे नियम

आध्यात्म
Updated Jun 09, 2022 | 12:29 IST | टाइम्स नाऊ मराठी

वास्तुनुसार उत्तर दिशेला धन, संपत्ती ठेवण्याची दिशा मानली जाते. जाणून घेऊया घरात तिजोरी कुठे असावी आणि त्याच्याशी संबंधित उपाय

locker
Vastu Tips: घरात कोणत्या ठिकाणी तिजोरी असावी? जाणून घ्या 
थोडं पण कामाचं
  • वास्तुशास्त्रानुसार धन आणि सपंत्तीत वाढ होण्यासाठी काय करावे?
  • जाणून घेऊया वास्तुशास्त्रात यावर काय उपाय सांगण्यात आले आहेत...

मुंबई: प्रत्येक व्यक्तीला आपली धन-संपत्तीत(money) सतत वाढ होत राहावी असेच वाटत असते. अनेकदा घरातील वास्तुदोषामुळे(vastudosh) आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो. तसेच इन्कममध्येही वाढ होत नाही. जितके धन मिळवले आहे त्यात वाढ होत नाही. आता प्रश्न असा आहे की वास्तुशास्त्रानुसार धन आणि सपंत्तीत वाढ होण्यासाठी काय करावे? जाणून घेऊया वास्तुशास्त्रात यावर काय उपाय सांगण्यात आले आहेत...

अधिक वाचा - कोण असेल देशाचा पुढचा राष्ट्रपती; किती मतांची असते गरज

तिजोरी अथवा लॉकरशी संबंधित वास्तु उपाय

वास्तुनुसार उत्तर दिशेला धन, संपत्ती ठेवण्यासाठी उत्तम दिशा मानली गेली आहे. कारण ही दिशा कबेराशी संबंधित आहे. या दिशेला धन हानी होत नाही. तर यात वाढ होत राहते. 

जर तुम्ही उत्तर दिशेला घरात तिजोरी अथवा लॉकर ठेवताय तर या गोष्टींचे ध्यान ठेवा की त्याचा दरवाजा उत्तर दिशेला उघडला पाहिजे.  

ज्या खोलीमध्ये तिजोरी अथवा लॉकर असेल ते ईशान्य अथवा वायव्य कोपऱ्यात असता कामा नये.

तिजोरी अथवा लॉकरमध्ये सतत वापरल्या जाणाऱ्या वस्तू ठेवणे वर्ज्य मानले जाते. 

तिजोरीमध्य कोणताही सुगंधित पदार्थ ठेवू नका. 

जर तुम्हाला कोषागार निर्माण करायचा असेल तर तो उत्तर दिशेला करा. यात तिजोरीचे दार प्रामुख्याने उत्तर दिशेला असावे. 

अधिक वाचा - NEET PG 2022 स्कोअरकार्ड जाहीर

तिजोरीत घोड्याची नाल ठेवल्यास फायदेशीर

पैशाच्या बाबतीतील समस्या तुम्हाला सतावत असेल तसेच, सतत नुकसान होत असेल, उत्पन्नात अडथळे येत असतील, तर घोड्याच्या नालचा उपाय तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो. यासाठी घरातील तिजोरीत किंवा पैसे ठेवण्याच्या ठिकाणी ठेवा, यामुळे तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासणार नाही. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी