मुंबई: लक्ष्मी मातेला धन आणि सौभाग्याची देवी मानले जाते. मान्यतेनुसार ज्या घरात ती जाते तेथील लोकांवर तिची कृपादृष्टी राहते. लोक आराम आणि सुख मिळवण्यासाठी माता लक्ष्मीला आनंदित करतात. अनेकजण तर लक्ष्मी मातेची कृपा मिळवण्यासाठी तिची विशिष्ट पद्धतीने पुजाही करतात. मात्र काही जणांवर ही कृपा राहत नाही आणि लक्ष्मी माता ते घर नेहमीसाठी त्यागते. जाणून घ्या अशा कोणत्या सवयी आहेत ज्यामुळे त्या घरात लक्ष्मी मातेचा वास राहत नाही.
माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अनेक जण विविध उपाय करत असतात. शुक्रवारचा दिवस माता लक्ष्मीचा मानला जातो. या दिवशी लक्ष्मी मातेची आराधना केल्यास आपल्या आयुष्यात धनसंपत्तीची कमी राहत नाही. दरम्यान, लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न व्हावी यासाठी शुक्रवारच्या दिवशी गुळाचा उपाय जरूर करून बघा. प्राचीन काळात हा उपाय सांगण्यात आला आहे. यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होते. शुक्रवारी तुपाचे दान केल्यास अथवा गूळ दान केल्यास तुमच्या लक्ष्मी मातेची कृपा कायम राहते.