Janmashtami Vrat Rules: यंदा 18 ऑगस्ट रोजी जन्माष्टमीचा (Janmashtami) सण देशात आणि जगात साजरा होत आहे. त्यासाठी मथुरा-वृंदावनसह (Mathura-Vrindavan) सर्वच घराघरांत जय्यत तयारी सुरू आहे. भगवान श्रीकृष्णाचा (Lord Krishna) आशीर्वाद घेण्यासाठी जन्माष्टमीच्या दिवशी उपवास (fasting) केला जातो. हे व्रत इतर व्रतांपेक्षा कठीण मानले जाते. या दिवशी श्रीकृष्णाच्या बालरूपासोबतच माता लक्ष्मीची पूजा करण्याचाही नियम आहे. असे म्हटले जाते की, जर तुम्ही जन्माष्टमीचे व्रत विधीपूर्वक ठेवले तर बाल गोपाळासोबतच माता लक्ष्मीही तुमच्यावर प्रसन्न होऊन भक्तांवर आशीर्वाद देतात. जाणून घेऊया जन्माष्टमीला लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे कोणते नियम आहेत.
भगवान श्रीकृष्ण हा भगवान विष्णूचा मानव अवतार मानला जातो. अशा स्थितीत जर तुम्हाला जन्माष्टमीला विशेष पुण्य मिळवायचे असेल तर त्या दिवशी भगवान विष्णूची पूजा करून त्यांना तीळ अर्पण करा. दुपारी पाण्यात तीळ मिसळून आंघोळ करा. कंसाच्या तुरुंगात बंदिस्त असलेल्या माता देवकीला दुपारी त्याच वेळी प्रसूती वेदना सुरू झाल्या आणि रात्री कान्हाजीचा जन्म झाला होता. त्यामुळे दुपारी तिळाच्या पाण्याने स्नान केल्याने विशेष लाभ होतो.
Read Also : आजचे राशीभविष्य; जाणून घ्या आजचा बुधवार तुमच्यासाठी कसा
धार्मिक शास्त्रानुसार, श्री कृष्ण जन्माष्टमी (जन्माष्टमी 2022) रोजी तुम्ही ब्रह्म मुहूर्तावर म्हणजेच पहाटे 4 वाजता उठून दैनंदिन विधी झाल्यावर स्नान करावे. यासोबतच हातात गंगाजल आणि तुळशीची पाने घेऊन दिवसभरात जन्माष्टमीच्या उपवासात काही चूक झाल्यास देवाची अगोदरच क्षमा मागावी.
लक्षात ठेवण्याची विशेष गोष्ट म्हणजे जन्माष्टमीचा उपवास (जन्माष्टमी व्रत 2022) 24 तास चालतो. या वेळी हे व्रत 17 ऑगस्टच्या रात्री 12 वाजता सुरू होणार असून 18 ऑगस्टच्या रात्री चंद्रदर्शन झाल्यानंतर त्याचे उद्यापन होईल. त्यामुळे या चोवीस तासांत काहीही खाऊ किंवा पिऊ नये.
Read Also : जळगावात 'सैराट'; पोलीस तपासात धक्कादायक माहिती झाली उघड
भगवान कृष्ण हे भगवान विष्णूचे मानवी अवतार होते आणि माता लक्ष्मी ही भगवान विष्णूची पत्नी आहे. अशाप्रकारे, जन्माष्टमीचा सण भगवान विष्णू आणि लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी देखील एक उत्तम पर्व मानला जातो. कारण लक्ष्मी देवीला तुळशी अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे या सर्व विधीने तुळशीच्या रोपाची पूजा केली जाते. तसेच रात्री उपवास सोडताना श्रीकृष्णाला जेव्हा भोग अर्पण केला जातो तेव्हा त्यामध्ये तुळशीची पाने ठेवावीत.
हिंदू धर्मग्रंथानुसार, जन्माष्टमीच्या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मी माताची तसेच बाळ कृष्णाची पूजा सोबत करावी. असे मानले जाते की कमळाची फुले भगवान विष्णूला खूप प्रिय असतात. त्यामुळे घराचे दरवाजे कमळाच्या फुलांनी सजवावेत आणि पूजेत ही फुले अर्पण करावीत. या उपायांनी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी दोघेही प्रसन्न होतात आणि भक्तांचे घर धन आणि अन्नाने परिपूर्ण करतात.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. टाइम्स नाउ याची पुष्टी करत नाही.)