Sawan 2022 Shiv Mandir: भगवान शंकराचा (Lord Shankara) लाडका महिना सावन (Sawan) सुरू झाला आहे. 2022 च्या सावन महिन्यात अनेक शुभ योग (सावन 2022 शुभ योग) येतील. सावन मध्ये चहुबाजूंनी बाबा भोलेनाथांच्या (Bholenath) नामजपाचा गजर होतो. महादेवाचा हा महिमा अतुलनीय आहे. पौराणिक कथेनुसार जिथे शिव असतो, तिथे त्यांचा गण नंदीही बसतो.
महादेवाच्या मंदिरात तुम्ही गेलात आणि नंदीचं दर्शन न घेताल महादेवाचं दर्शन घेतलं तर ही पूजा पूर्ण होत नाही. प्रत्येक महादेवाच्या मंदिरात शिवलिंगासमोर नंदी महाराज असतात. परंतु देशातील इतर महादेवाच्या मंदिरापैकी एक मंदिर असे आहे की, ज्यात महादेव नंदीविना विराजमान आहेत. नंदीची पूजा केली नाही म्हणून आपल्याला महादेवाचा आशीर्वाद मिळत नाही अशात नंदीविना महादेव असणं हे जरा विचित्रच ना. आज आपण या लेखात या मंदिरात असं का आहे तसेच हे मंदिर कुठे आहे, याची माहिती घेणार आहोत.
महाराष्ट्राच्या नाशिकमध्ये असलेल्या गोदावरी नदीच्या किनार्याजवळ कपालेश्वर महादेव मंदिर आहे. येथे भगवान शंकराची मूर्ती आहे पण त्यांचे वाहन नंदी बसवलेले नाही. पुराणानुसार, या मंदिरात भगवान महादेवाचा वास होता. तर पौराणिक कथेनुसार ब्रह्मदेवाचे ५ मुख होते. चार मुख हे वेदोच्चारण करत असायचे तर पाचवे मुख हे नेहमी लोकांची निंदा आणि त्यांना वाईटपणे बोलत असायचे.
Read Also : सिद्धूला तुरुंगात बनले कारकून तर दलेर मेहंदी झाले हिशोबनीस
एकदा इंद्रसभेच्या सभेत ब्रह्मदेवाच्या पाचव्या मुखाने भगवान शिवाची निंदा करण्यास सुरुवात केली, त्यामुळे क्रोधित होऊन महादेवाने ते मुख ब्रह्मदेवांच्या शरीरापासून वेगळे केले. ब्रह्मदेवाच्या हत्येचे पाप भोलेनाथांवर लादले गेले. या पापातून मुक्त होण्यासाठी सोमेश्वरातील एका वासराने शिवाला उपाय सांगितला. या वासरावरही ब्राह्मण असलेल्या आपल्या धन्याला मारण्याचे पाप झाले.
Read Also : भारत-चीन सीमेवर तणाव कायम; आज चर्चेची 16 वी फेरी
ब्रह्मदेवाच्या हत्येच्या पापातून मुक्त होण्यासाठी वासराने शिवाला तोच उपाय सांगितला जो त्याने स्वतः केला होता. बछड्याने शिवाला नाशिकजवळील रामकुंडात स्नान करण्यास सांगितले. यानंतर भोलेनाथांनी वासराला म्हणजेच नंदीला गुरू म्हणून स्वीकारले. आता नंदी हे महादेवाचे गुरू झाल्याने महादेवाने नंदीला या मंदिरात आपल्यासमोर बसू देण्यास नकार दिला, तेव्हापासून येथे नंदीची मूर्ती बसवली जात नाही.