Mahashivratri 2023 Vrat Katha In marathi:देवांचे देव (God) महादेव ( Mahadev) यांची भक्ती करण्याचा दिवस महाशिवरात्री (Mahashivratri) असतो. महाशिवरात्री 18 फेब्रुवारी म्हणजेच उद्या साजरी केली जाणार आहे. हिंदू धर्मानुसार (Hindu Religion),महादेव असे देवता आहेत, ज्यांची उपासना (worship) ही खूप सोपी आहे. महादेवाच्या पूजेचं काही खास नियम नाहीत. एक तांब्या पाणी अर्पण केलं तरी भोळा महादेव आपल्या भक्तांची इच्छा पूर्ण करत असतात. फक्त महादेवाची पूजा करताना लक्षात ठेवा की, मनात कोणतेही चुकीचे विचार आणू नका. या महाशिवरात्रीला शिवलिंगाची पूजा करावी. आता आपण जाणून घेऊ, महाशिवरात्रीची पूजा करण्याची सोपी पद्धत आणि पूजेचा शुभ मुहूर्त.( Mahashivratri 2023 : Know when to perform Rudrabhishek on Mahashivratri, auspicious moment )
अधिक वाचा : तुमच्या या सवयी तुमच्या मुलांना बिघडू शकतात
फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री हा सण साजरा केला जातो. पौराणिक मान्यतेनुसार महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव अग्निलिंगाच्या रूपात प्रकट झाले होते. शिवलिंगाची पूजा सर्वप्रथम भगवान विष्णू आणि ब्रह्मदेवांनी केली होती. देशात अनेक ठिकाणी हा सण भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह उत्सव म्हणूनही साजरा केला जातो. त्यामुळे अनेक ठिकाणी महाशिवरात्रीच्या रात्री भगवान शंकराची मिरवणूकही काढली जाते.
अधिक वाचा : तुम्हाला परीक्षेत टॉपर व्हाययंच मग लावा या सवयी
महाशिवरात्रीची पूजा रात्री एकदा किंवा चार वेळा करता येते. रात्रीचे चार प्रहर असतात. महाशिवरात्रीच्या पूजेसाठी निशिता काळ हा सर्वात शुभ मुहूर्त मानला जातो. मान्यतेनुसार, हीच वेळ आहे जेव्हा भगवान शिव आपल्या लिंगाच्या रूपात पृथ्वीवर अवतरले होते. येथे पहा रात्री चार वाजता पूजेच्या सर्व शुभ मुहूर्त;
अधिक वाचा : काय आरजे रेडिओ जॉकी बनायचंय, पण कसं
पहिला मुहूर्त - 18 फेब्रुवारी संध्याकाळी 06:18 ते रात्री 09:31 पर्यंत
दुसरा मुहूर्त - 19 फेब्रुवारी रोजी रात्री 09:31 ते 19 फेब्रुवारी रोजी रात्री 12:44 पर्यंत
तिसरा मुहूर्त - 19 फेब्रुवारी 12:44 AM ते 03:57 AM पर्यंत
चौथा मुहूर्त - 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 03:57 ते 07:10 पर्यंत
महाशिवरात्रीच्या उपवासाची वेळ - 19 फेब्रुवारी सकाळी 07:10 ते दुपारी 03:32 पर्यंत
महाशिवरात्री चतुर्दशी तारीख - 18 फेब्रुवारी रात्री 08:02 PM ते 19 फेब्रुवारी 04:18 PM