Makar Sankranti 2023 Date:हिंदू धर्मात (hindu religion)मकर संक्रांती या सणाला विशेष महत्त्व आहे. हा सण मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. हा सण सूर्यदेवाला समर्पित असून मकर राशीमध्ये सूर्याचे आगमन झाल्याचे संकेत असते. तसेच हा काळ रब्बी हंगामाची पेरणी करण्याचा आहे. ऋतूतील बदलांमुळे शेतकऱ्यांच्या दिनक्रमात बदल आणि शेतीशी संबंधित कामे या दिवसापासून सुरू होतात. शेतकरी (Farmer) काढणी झालेल्या पिकांची (crops) पूजा करतात आणि त्याला वाटत असतात. (Makar Sankranti 2023 Date: Makar Sankranti is on 14th 15th? know the right date,auspicious time)
अधिक वाचा : ज्येष्ठ समाजवादी नेते शरद यादव यांचे निधन
पंचांगनुसार, मकर संक्रांतीला तमिळनाडुमध्ये पोंगल, पूर्वी उत्तर प्रदेशात खिचडी, गुजरात आणि राजस्थानमध्ये उत्तरायण आणि हरियाणा आणि पंजाबमध्ये माघीच्या रूपात साजरा केला जातो. मकर संक्रांती जानेवारी महिन्यात साजरी होत असली तरी यंदा मकर संक्रांती नेमकी कोणत्या तारखेला येईल याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम आहे.
अधिक वाचा : Bus Accident : शिर्डीला निघालेल्या बसची ट्रकशी टक्कर, 10 ठार
लोहरीच्या एका दिवसानंतर मकर संक्रांती साजरी केली जाते. यामुळे यंदा मकर संक्रांती ही 15 जानेवारी साजरी केली जाते. 14 तारखेला रात्री 8.46 वाजता सूर्य मकर राशीत प्रवेश करेल. परंतु ज्योतिषांच्या मते, मकर संक्रांतीचा सण दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी साजरा करणे शुभ राहील. सूर्यदेव 14 जानेवारीच्या सायंकाळपर्यंत धनु राशीत राहील, तोपर्यंत खरमास राहील. याच दिवशी त्याची सांगता होईल. त्यामुळे 15 जानेवारीपासून शुभ कार्याला सुरुवात होणार आहे.
अधिक वाचा : दारूचा एक थेंबही प्यायल्याने होऊ शकतात 7 कॅन्सर
हिंदू दिनदर्शिकेनुसार 2023 मध्ये मकर संक्रांती रविवारी 15 जानेवारी रोजी साजरी केली जाईल. 14 जानेवारी रोजी रात्री 8 वाजून 21 मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करेल आणि 15 जानेवारी 2023 रोजी उदय तिथीनुसार मकर संक्रांती साजरी केली जाईल.या दिवशी सूर्याला अर्घ्य देण्याला विशेष महत्व आहे. याशिवाय या दिवशी स्नान, तीळ आणि गूळ इत्यादी दान करण्याची परंपरा आहे.
पंचांगानुसार, मकर संक्रांती पुण्यकाळ मुहूर्त सकाळी 7 वाजून 15 मिनिटे ते दुपारी 12 वाजून 30 मिनिटापर्यंत असेल.एकूण कालावधी 5 तास 14 मिनिटे आहे, तर महापुण्य काळ मुहूर्त 7 वाजून 15 मिनिटे ते 9 वाजून 15 मिनिटापर्यंत असेल.