Makar Sankranti 2023: सूर्यदेवाशी (Suryadev) संबंधित अनेक सण हिंदू धर्मात (hindu religion) साजरे केले जातात. मकर संक्रांतीसुद्धा (Makar Sankranti) हा सूर्य देवाला समर्पित असलेला सण आहे. यंदा 15 तारखेला मकर संक्रांती साजरी केली जाणार आहे.आधी सण 14 जानेवारीला साजरा केला जातो, परंतु गेल्या काही वर्षांपासून हा सण 15 जानेवारीला साजरा केला जात आहे. (Makar Sankranti 2023: Katha , Kahani to know why we celebrate Makar Sankranti)
अधिक वाचा : Pune Fire : पुण्यात गॅसच्या पाइपलाईनला आग
सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याला ज्योतिषात संक्रांत म्हटले जाते. मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो. एका संक्रांतीपासून दुसऱ्या संक्रांती पर्यंतचा काळ हा सौर मास (महिना) म्हणून ओळखला जातो. पौष महिन्यात सूर्य उत्तरायण होऊन मकर राशीत प्रवेश करतो ही गोष्ट देशभर वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या प्रकारे उत्सव म्हणून साजरी केली जाते.
शास्त्रानुसार, मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान,ध्यान आणि दान करण्यास विशेष महत्त्व असते. मकर संक्रांतीचा दिवस हा देवाचा दिवस म्हटलं जातं. या दिवशी केलेल्यामुळे आपल्याला दहा पटीचा फायदा होत असतो, अशी या दिवशाची मान्यता आहे. आपण जर या दिवशी तुप आणि चादर दान केली तर आपल्याला मोक्ष प्राप्ती मिळत असते.
अधिक वाचा : ST कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी, वेतनासाठी 300 कोटीचा निधी
महाभारताच्या काळात भीष्म पितामह यांनी आपले देह त्याग करण्याचा दिवस निश्चित केला होता. गीतेत सांगितले आहे की, जो माणूस उत्तरायणात शुक्ल पक्षात देहत्याग करतो त्याला मुक्ती मिळते. मकर संक्रांतीपासून सूर्य उत्तरायण होतात म्हणून हा दिवस लोकं आनंद- उत्साहात साजरा करतात.याचदिवशी गंगा नदी माता भागीरथ ऋषींच्या मागे-मागे जात समुद्रात मिळाली असल्याचं म्हटलं जातं.
अधिक वाचा : लंका हरली, टीम इंडिया 4 विकेट राखून जिंकली
श्री भागवत आणि देवीपुराणानुसार, शनी महाराजला यांचे आपल्या वडिलांशी वाद होत होता, त्यांचे भांडण होत होते. या वादाचे कारण हे होते की, सूर्य देवने त्यांची आई छायाला दुसरी पत्नीचा संज्ञाचा पूत्र यमराजशी भेदभाव करताना पाहिलं होतं. यावर नाराज झाल्यानंतर सूर्यदेवाने संज्ञा आणि त्यांचा मुलगा शनीला आपल्यापासून दूर केलं होतं. यांचा शनिदेव आणि छाया यांना राग आला होता. त्यानंतर सूर्यदेवाला कुष्ठरोग होण्याचा शाप दिला होता.
कुष्ठरोगाने पीडित असलेल्या वडील सूर्य देव यांना पाहून यमराज यांनी खूप त्रास होत होत होता. आपल्या वडिलांना कुष्ठ रोगापासून मुक्त करण्यासाठी यमराजने तपस्या केली. रोगाने त्रासलेल्या सूर्य देवाने संतापून शनि महाराजांचे घर कुंभला जाळून टाकले. कुंभ ही शनीची राशी म्हटलं जातं. यामुळे शनी आणि त्यांची आई छाया यांना खूप कष्ट सहन करावे लागले. त्यानंतर आपला सावत्र भाऊ आणि आईला होणारा त्रास पाहून यमराज यांना खूप त्रास होत होता. त्यांचे कल्याण व्हावे यासाठी वडील सूर्यदेव यांना खूप समजवलं. तेव्हा कुठे सूर्यदेव शनीचे घर कुंभमध्ये गेले.
कुंभ राशीत सर्व काही जळले होते. त्यावेळी शनिदेवांकडे तीळाशिवाय दुसरे काहीही नव्हते, म्हणून त्यांनी काळ्या तिळाने सूर्यदेवाची पूजा केली. शनिदेवाच्या या पूजेने प्रसन्न होऊन सूर्यदेवाने शनीला आशीर्वाद दिला की, शनिचे दुसरे घर मकर राशीत मी येईन तेव्हा ते घर धन-धान्याने भरून जाईल. तिळामुळेच शनिला पुन्हा वैभव प्राप्त झाले. त्यामुळे तीळ शनिदेवाला प्रिय आहे. त्यावेळेपासून मकर संक्रांतीला सूर्य आणि शनिची तीळ घालून पूजा करण्याचा नियम सुरू झाला.
मकर संक्रांतीचे वैज्ञानिक कारण म्हणजे सूर्य उत्तरायण झाल्याने प्रकृती मध्ये बदलांना सुरुवात होते. थंडीने गारठलेल्या लोकांना सूर्यदेवाच्या उत्तरायण होण्याने थंडीपासून बचाव होण्यास मदत होते.
भारत हा कृषिप्रधान देश आहे. येथील सण-उत्सवाचे पर्व हे शेतीवर अवलंबून आहे. मकर संक्रांती अशा काळात येते जेव्हा शेतकरी रब्बी हंगामाची पेरणी करून खरीप हंगामाचे पीक मका, ऊस, शेंगदाणे, उडीद घरी घेऊन येतात. शेतकऱ्यांचे घर अन्नधान्याने भरून जाते.