Makar Sankranti puja time, pooja vidhi in marathi: मकरसंक्रातीचा सण संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो. मात्र, प्रत्येक ठिकाणी संक्रांत साजरी करण्याची पद्धत वेगवेगळी आहे. मकरसंक्रातीच्या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतो. या दिवशी खरमास सुद्धा संपतो आणि त्यानंतर शुभ कार्याला पुन्हा सुरुवात होते. धार्मिक मान्यतेनुसार, मकरसंक्रातीच्या दिवशी अभ्यंगस्नान करुन देवदर्शन करण्याची पद्धत आहे. स्नान करण्यासोबतच दान करण्याला शुभ मानले जाते. जाणून घ्या मकरसंक्रांतीचा शुभ मुहूर्त, पुण्यकाल आणि इतर माहिती. (Happy Makar Sankranti 2023 Puja Vidhi Puja Mantra Rituals Upay remedies)
पंचांगानुसार, सूर्य देव 14 जानेवारी 2023 रोजी रात्री 8 वाजून 21 मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करत आहे. त्यामुळे उदया तिथीनुसार, यंदा 15 जानेवारी 2023 रोजी मकरसंक्रांत साजरी करण्यात येणार आहे.
हे पण वाचा : मकरसंक्रातीला बनतोय खास योग, या राशीच्या व्यक्तींना होणार मोठा लाभ
मकरसंक्रांतीच्या दिवशी स्नान केल्यावर दान करण्याला विशेष महत्त्व आहे. या दिवशी सूर्योदय होण्यापूर्वी उठून अभ्यंगस्नान करुन घ्यावे. नवीन कपडे परिधान करावेत. मकरसंक्रांतीच्या दिवशी नदीत स्नान करुन देवदर्शनाची पद्धत आहे. ते शक्य नसेल तर अंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकावे.
अंघोळ केल्यावर सूर्यदेवाची विधीवत पूजा करावी. यासाठी एका तांब्याच्या भांड्यात जल, थोडे तिळ, सिंदूर, लाल रंगाचे फूल टाकून सूर्याला अर्ध्य द्यावे. यानंतर पूजा करुन आपल्या योग्यतेनुसार दान करावे.
मकरसंक्रांतीच्या दिवशी अन्न, तिळ, गुळ, वस्त्र, तांदूळ, उडीतदाळ, मुरमुऱ्याचे लाडू दान करा. असे केल्याने सूर्यदेवासोबतच शनी देव सुद्धा प्रसन्न होतात.
हे पण वाचा : मकरसंक्रांतीच्या दिवशी चुकूनही करू नका हे काम
मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्य देवाची पूजा करताना सूर्यदेवाच्या मंत्राचा जप करा. ऊँ सूर्याय नम:, ऊँ ह्रीं ह्रीं सूर्याय नम:, ऊँ ऐहि सूर्य सहस्त्रांशों तेजो राशे जगत्पते, अनुकंपयेमां भक्त्या, गृहाणार्घय दिवाकर: या मंत्राचा जप करु शकता.
मकरसंक्रांतीच्या दिवशी गाईला हिरव्या भाज्या खायला देणे शुभ मानले जाते. यामुळे बुध मजबूत होतो. या दिवशी खिचडीचा प्रसाद सुद्धा वाटण्यात येतो आणि खिचडीचं साहित्य सुद्धा दान केले जाते. मकरसंक्रांतीच्या दिवशी गुळ किंवा रेवडी दान करणे शुभ मानले जाते.