Mangalwar Upay : मंगळवारचे उपाय, हनुमानाची कृपा राहील आणि प्रगती होईल

Mangalwar Upay, Hindu Religion, Tuesday Astro Remedies, Hanuman Photo, How to please lord hanuman : मंगळवार हा दिवस मारुतीरायाचा अर्थात भगवान हनुमान यांचा आहे.

Mangalwar Upay, Hindu Religion
मंगळवारचे उपाय, हनुमानाची कृपा राहील  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
 • मंगळवारचे उपाय, हनुमानाची कृपा राहील
 • हनुमानाची कृपा राहावी यासाठी मंगळवारी करायचे उपाय
 • आठवड्याचे सात दिवस, कोणता दिवस कोणत्या देवाचा?

Mangalwar Upay, Hindu Religion, Tuesday Astro Remedies, Hanuman Photo, How to please lord hanuman : मंगळवार हा दिवस मारुतीरायाचा अर्थात भगवान हनुमान यांचा आहे. मंगळवारी श्रीरामाचे परमभक्त भगवान हनुमान यांची पूजा करावी यामुळे विशेष लाभ होतो असे सांगतात. भगवान हनुमान अर्थात बजरंगबलीची कृपा ज्याच्यावर असेल त्या व्यक्तीला अडचणी भेडसावत नाहीत. एखादी अडचण आली तर त्यातून लवकरच मार्ग सापडतो आणि पुढचा काळ चांगला जातो. वाईट शक्तींचा त्रास होत नाही.  

मंगळवार 17 जानेवारी 2023 पासून या राशींची शनि साडेसाती

मुंबई ते रायगड अवघ्या 20 मिनिटांत गाठता येणार, वाचा कसा आहे देशातील सर्वात लांबीचा सागरी मार्ग असलेला मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प

Sea Links to ease Mumbai roads : नरिमन पॉइंट ते विरार एका तासात, 5 सी लिंकमुळे प्रवास होणार सुपरफास्ट

हनुमानाची कृपा राहावी यासाठी मंगळवारी करायचे उपाय

 1. दीप प्रज्वलन : दर मंगळवारी भगवान हनुमानाची मनोभावे पूजा करावी. हनुमानाला रुईची पानं आणि तेल वाहावे. हनुमानासमोर सकाळी तुपाचा दिवा तर संध्याकाळी तेलाचा दिवा प्रज्वलित करावा. दिव्यासाठी कलावाची वात तयार करून वापरावी.
 2. प्रसाद : हनुमानाला बुंदीच्या लाडवांचा अथवा चण्याच्या डाळीपासून तयार केलेल्या लाडवांचा प्रसाद अर्पण करावा.
 3. चमेलीचे तेल : शेंदूर आणि चमेलीचे तेल यांचे मिश्रण करून तयार केलेला ओला शेंदूर वापरून हनुमानाच्या मूर्तीला व्यवस्थित लेपन करावे. नंतर भगवान हनुमानाची मनोभावे पूजा करावी.
 4. तुळशीची माळ : रामाचे नामस्मरण करत 108 तुळीशीची पाने भगवान हनुमानाला वाहावी. प्रत्येक पान वाहताना एकदा रामाचे नाव घेऊन तुळशीचे पान हनुमानाला वाहावे. हनुमानाच्या गळ्यात तुळशीच्या पानांचा हार तसेच रुईच्या पानांचा हार घालावा. नंतर भगवान हनुमानाची मनोभावे पूजा करावी. यामुळे भगवान हनुमान तसेच मंगळ प्रसन्न होईल.
 5. प्राण्यांना खाऊ घाला, भूतदया करा : माकडांना तसेच गायींना भाजलेले चणे, गुळ हे पदार्थ खाऊ घाला. यामुळे भगवान हनुमान प्रसन्न होतील आणि आपला मंगळ कमकुवत असल्यास त्यामुळे होणारा त्रास कमी होण्यास मदत होईल. मंगळ दोषातून लवकर सुटका होऊ शकेल.
 6. दान : दर मंगळवारी यथाशक्ति दान करावे. शक्यतो गरजूंना गहू, तांदूळ, डाळी, गुळ, नारळ, ताजी फळे अशा स्वरुपात दान करावे.

आठवड्याचे सात दिवस, कोणता दिवस कोणत्या देवाचा?

 1. सोमवार - शंकर आणि चंद्र देव (चंद्र ग्रह)
 2. मंगळवार - हनुमान आणि मंगळ ग्रह
 3. बुधवार - गणपती आणि बुध ग्रह
 4. गुरुवार - विष्णू आणि गुरू ग्रह
 5. शुक्रवार - माता लक्ष्मी, दुर्गा माता, महालक्ष्मी, संतोषी माता, वैभव लक्ष्मी आणि शुक्र ग्रह
 6. शनिवार - शनि देव आणि शनि ग्रह
 7. रविवार - सूर्य देव

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी