Margashirsha Purnima: बुधवारी (7 डिसेंबर 2022) मार्गशीर्ष पौर्णिमा आहे. या पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. असं मानले जाते की, भगवान विष्णू यांना हा महिना खूप आवडतो आणि या काळात धार्मिक कार्य केल्याने श्री विष्णू प्रसन्न होतात. यावर्षी मार्गशीर्ष पौर्णिमेला एक विशेष योग घडत आहे. या दिवशी सर्वार्थ सिद्धी, रवी आणि सिद्ध योग असे तीन योग आहेत. यामध्ये स्नान करणे, दान करणे आणि जप, तपस्या करणे हे पुण्याचे मानले जाते. (Margashirsha Purnima Vrat Katha Puja time Vidhi Samagri do this thing to fulfill wish read in marathi)
पौर्णिमेच्या दिवशी उपवास करून सत्यनारायणाची कथा सांगितल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते असे म्हटले जाते. हिंदू पंचांगानुसार, यंदाच्या वर्षी बुधवारी 7 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजून 1 मिनिटांनी पौर्णिमा सुरू होत आहे. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी 8 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजून 37 मिनिटांनी पौर्णिमा समाप्त होईल. यामुळे पौर्णिमेचा बहुतांश काळ हा 7 डिसेंबर रोजीच आहे.
मार्गशीर्ष पौर्णिमेला सकाळी लवकर स्ना करुन मंदिराची साफ-सफाई, स्वच्छता करावी. मंदिरातील भगवान विष्णू, श्री कृष्ण आणि माता लक्ष्मी यांच्या फोटो किंवा मूर्तीवर गंगाजल, कच्चे दूध मिसळून ते अपर्ण करा. यानंतर देवाला अबीर, गुलाल, चंदन, अक्षत, फुले, तुळशीचे पाने अर्पण करा. यानंतर सत्यनारायणाची कथा वाचावी. मग पूजा पूर्ण झाल्यावर कुटुंबातील सर्व ज्येष्ठ सदस्यांचे आशीर्वाद घ्यावे.