Astrology: माता लक्ष्मी घरी येण्याआधी देते हे संकेत; जाणून घ्या कधी येणार तुमचे 'अच्छे दिन'

Astrology News | हिंदू धर्मामध्ये माता लक्ष्मीला धन-संपत्तीची देवता मानली जाते. असे मानले जाते की ज्या लोकांवर माता लक्ष्मीची कृपा असते त्या व्यक्तीला पैशाची कधीच कमतरता भासत नाही.

Mata Lakshmi gives this signal before coming home
माता लक्ष्मी घरी येण्याआधी देते हे संकेत, वाचा सविस्तर   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • हिंदू धर्मामध्ये माता लक्ष्मीला धन-संपत्तीची देवता मानली जाते.
  • ज्या लोकांवर माता लक्ष्मीची कृपा असते त्या व्यक्तीला पैशाची कधीच कमतरता भासत नाही.
  • माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही चिन्हे सांगण्यात आली आहेत.

Astrology News | मुंबई : हिंदू धर्मामध्ये माता लक्ष्मीला धन-संपत्तीची देवता मानली जाते. असे मानले जाते की ज्या लोकांवर माता लक्ष्मीची कृपा असते त्या व्यक्तीला पैशाची कधीच कमतरता भासत नाही. ती व्यक्ती प्रत्येक सुख-सुविधांचा आनंद घेते. म्हणूनच असे मानले जाते की धन-संपत्ती कमावण्यासोबतच आपल्यावर देवी लक्ष्मीची कृपाही असावी. ज्योतिषशास्त्रामध्ये देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे अनेक मार्ग आहेत. (Mata Lakshmi gives this signal before coming home). 

अधिक वाचा : कपिल देव यांनी राजकारणात येण्याच्या चर्चांना दिला पूर्णविराम

दरम्यान, माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही चिन्हे सांगण्यात आली आहेत, ज्याद्वारे व्यक्तीला सहज कळू शकते की माता लक्ष्मीची कृपा होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार माता लक्ष्मी घरी येण्यापूर्वी काही ना काही संकेत नक्कीच देते. अनेक वेळा स्वप्नातच आपल्या भाविकांना माता लक्ष्मी संकेत देते.

अधिक वाचा : विमानतळाच्या लगेज बेल्टवर पोहचली एक डेथ बॉडी?

माता लक्ष्मी घरी येण्याआधी देते हे संकेत

  1. - जर एखाद्याला स्वप्नात बिळासह साप दिसला तर ते धन लाभाचे प्रतीक मानले जाते.
  2. - जर एखादी व्यक्ती स्वप्नात स्वतःला झाडावर चढताना पाहत असेल तर समजून जा की येणाऱ्या काळात त्याला धन मिळण्यासोबतच प्रत्येक कामात यश मिळते. ती व्यक्ती आपल्या करिअरमध्ये चांगली उंची गाठते. 
  3. - जर स्वप्नात एखादी महिला किंवा मुलगी नाचताना दिसली तर समजून जा की अचानक तुम्हाला धनप्राप्ती होणार आहे.
  4. - जर स्वप्नामध्ये एखाद्या व्यक्तीला सोन्यापासून बनलेल्या वस्तू दिसल्या तर ते देखील लक्ष्मीच्या आगमनाचे शुभ सूचक मानले जाते. 
  5. - स्वप्नात उंदीर दिसला तरी ते अत्यंत शुभ मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार उंदीर हे गणेशाचे वाहन आहे. अशा स्थितीत त्याचे स्वप्नात दर्शन म्हणजेच गणेशासोबत लक्ष्मीचे आगमन मानले जाते.
  6. -  जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात काही देवतांचे दर्शन होत असेल तर समजून जा की येणाऱ्या काळात माता लक्ष्मी तुमच्या घरी नक्कीच येणार आहे, ज्यामुळे तुम्हाला सर्व गोष्टींमध्ये यश आणि धन प्राप्त होईल.
  7. - जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात मधमाशीचे पोळे दिसले तर ते देवी लक्ष्मीच्या आगमनाचे लक्षण मानले जाते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी