Mauni Amavasya 2022: पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी मौनी अमावस्या आहे खास, वाचा काय आहेत उपाय

आध्यात्म
भरत जाधव
Updated Jan 24, 2022 | 15:45 IST

Mauni Amavasya 2022:  पितृपाठात येणारी अमावस्या (Amavasya ) ही खूप महत्त्वाची असते. परंतु पितृ दोषापासून (Pitru Dosh) मुक्ती आणि पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी माघ मासची (Magh Month) अमावस्या खूप विशेष मानली जाते. माघ कृष्ण पक्षातील अमावस्याला मौनी अमावस्या म्हणतात.

Mauni Amavasya 2022
पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी मौनी अमावस्या आहे खास  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • इतर अमावस्येच्या तुलनेत पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी मौनी अमावस्या विशेष आहे.
  • मौनी अमावस्येला पिठात साखर मिसळून मुंग्यांना खाऊ घातल्यास पितृदोष दूर होतो.
  • माघ कृष्ण पक्षातील अमावस्याला मौनी अमावस्या म्हणतात

Mauni Amavasya 2022:  नवी दिल्ली :  पितृपाठात येणारी अमावस्या (Amavasya ) ही खूप महत्त्वाची असते. परंतु पितृ दोषापासून (Pitru Dosh) मुक्ती आणि पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी माघ मासची (Magh Month) अमावस्या खूप विशेष मानली जाते. माघ कृष्ण पक्षातील अमावस्याला मौनी अमावस्या म्हणतात. या दिवशी पितरांना प्रसन्न करण्यासाठी तर्पण, पिंडदान आणि दान करण्याची परंपरा आहे. इतर अमावस्येच्या तुलनेत पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी मौनी अमावस्या विशेष आहे. यावेळी मौनी अमावस्या 1 फेब्रुवारी 2022 रोजी आहे. असे मानले जाते की मौनी अमावस्येच्या दिवशी काही उपाय केल्यास पितृदोषापासून मुक्ती मिळते. अशा स्थितीत मौनी अमावस्येच्या दिवशी कोणते उपाय करावेत हे आपण माहिती करून घेतले पाहिजेत. 

पितृदोषापासून मुक्ती मिळवण्याचे उपाय-१ 

मौनी अमावस्येला पिठात साखर मिसळून मुंग्यांना खाऊ घातल्यास पितृदोष दूर होतो. त्याचबरोबर मनोकामनाही पूर्ण होतात. मौनी अमावस्येच्या दिवशी काळ्या तिळाचे लाडू, तिळाचे तेल, ब्लँकेट, आवळा आणि काळे कपडे गरजूंना दान करा. यामुळे पितृदोष शांत होतो. माघ अमावस्येला पवित्र नदीत स्नान करावे, काळे तीळ दान केल्याने पितृदेव प्रसन्न होतो आणि पितृदोषापासून मुक्ती मिळते.

पितृदोषापासून सुटका करण्याचे उपाय -2

पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी मौनी अमावस्येच्या दिवशी पितरांचे स्मरण करून सूर्याला जल अर्पण करावे. याशिवाय कमळात पाणी घेऊन त्यात लाल फुले व काळे तीळ मिसळून पितरांचे ध्यान करताना सूर्यदेवाला पाणी द्यावे. तसेच या दिवशी पिंपळाच्या झाडाला पांढऱ्या रंगाची मिठाई अर्पण करून झाडाची १०८ वेळा प्रदक्षिणा करावी.

पितृदोषापासून मुक्ती मिळवण्याचे उपाय -3

घराच्या दक्षिण दिशेला पांढरे कपडे आणि काही काळे तीळ ठेवा. त्यावर पितळ-तांब्याचे पितृयंत्र स्थापित करावे.  यानंतर उजव्या बाजूला पितरांसाठी तिळाच्या तेलाचा दिवा लावावा.  भरपूर पाणी भरा आणि मध्यभागी ठेवा. त्यावर स्टीलचे ताट ठेवून त्यावर तीळ टाकलेली रोटी ठेवा. रोट्यावर तुळशीची पाने ठेवा. त्यावर पांढरे फूल अर्पण करून चंदनाचा तिलक अर्पण करा.  यानंतर रोटीचे चार भाग करा आणि कुत्रे, गाय आणि कावळे यांना खायला द्या. तसेच पिंपळाच्या खाली एक तुकडा ठेवा. हे करत असताना मौनाचा उपवास लक्षात ठेवा.

 (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. टाइम्स नाउ मराठी याची पुष्टी करत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी