Budh Upay: कुंडलीत कमजोर असलेला बुध ग्रह जीवनात आणतो अनेक समस्या; या उपायांनी होईल सुटका

आध्यात्म
Updated Jun 17, 2022 | 11:04 IST | टाइम्स नाऊ मराठी

Budh Upay In Marathi | जन्म कुंडलीत बुध ग्रह कोणत्याही ग्रहाने त्रस्त असेल तर ती व्यक्ती मानसिकदृष्ट्या कमजोर होत असते. त्या व्यक्तीला अनेक गोष्टी समजण्यात अडचणी येतात.

Mercury weak in the horoscope brings many problems to life
कुंडलीत कमजोर असलेला बुध ग्रह जीवनात आणतो अनेक समस्या  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • जन्म कुंडलीत बुध ग्रह कोणत्याही ग्रहाने त्रस्त असेल तर ती व्यक्ती मानसिकदृष्ट्या कमजोर होत असते.
  • बुधवारच्या दिवशी घरामध्ये विधीपूर्वक भगवान गणेशजींच्या मूर्तीची स्थापना करा.
  • बुधवारच्या दिवशी तृतीयपंथ्यांना काही पैसे दान करा.

Budh Upay In Marathi | मुंबई : जन्म कुंडलीत बुध ग्रह कोणत्याही ग्रहाने त्रस्त असेल तर ती व्यक्ती मानसिकदृष्ट्या कमजोर होत असते. त्या व्यक्तीला अनेक गोष्टी समजण्यात अडचणी येतात. दरम्यान आज आपण एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत बुध ग्रह कमजोर किंवा अशुभ असल्यास कोणत्या समस्या येतात याबाबत भाष्य करणार आहोत. चला तर म जाणून घेऊया बुध ग्रह कमजोर असल्यावर कोणते उपाय करावे. (Mercury weak in the horoscope brings many problems to life). 

अधिक वाचा : 200 कोटी लोकांचा जीव घेणाऱ्या साथीचे मूळ सापडले

ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रह बुद्धिमत्ता, वाणी, सौंदर्य आणि धनाचा कारक आहे. त्यामुळे तुमच्या जीवनात अचानक पैशांची चणचण भासू लागली आणि तुम्ही कर्जात बुडला असेल तर समजून जा की तुमच्या जन्मकुंडलीत बुध ग्रह कमजोर आहे आणि त्याची स्थिती कमकुवत आहे. त्यामुळे महिला नातेवाईक बहिण, मावशी, आत्या इत्यादी सोबत नाते बिघडणे हे देखील कमजोर बुधाचे लक्षण आहे. तसेच कुंडलीमध्ये बुध ग्रह कमजोर असल्यास व्यक्तीचा आत्मविश्वास कमी होत जातो आणि तो त्याच्या बुद्धिमत्तेवरून गोंधळून जातो. यामागे देखील कमजोर बुध ग्रहाचा हात असतो. 

बुध ग्रहाला मजबूत करण्यासाठी करा हे उपाय 

  1. बुधवारच्या दिवशी घरामध्ये विधीपूर्वक भगवान गणेशजींच्या मूर्तीची स्थापना करा. त्यांची पूजा, अर्चना करा. तसेच गणेशजींना मोदक देखील अर्पण करा. याशिवाय शक्य झाल्यास गणेश मंदिरातही जावा. मंदिरात जाऊन त्यांची पूजा करून त्यांना फुलांचा हार घाला. यानंतर खऱ्या अंतकरणाने तुमची इच्छा मागा. असे केल्यास गणेशजी प्रसन्न होतात आणि आशिर्वाद देतात. 
  2.  प्रत्येक बुधवारी गणेशजींना दुर्वा अर्पण केली पाहिजे. कारण गणेशजींना दुर्वा खूप प्रिय आहे. जो भक्त गणेशजींना दुर्वा अर्पण करतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. सोबतच आर्थिक चणचणीतूनही सुटका होते. जर तुमच्या कामामध्ये सतत विघ्न येत असतील तर भगवान गणेशजींना दुर्वा जरूर अर्पण करा. असे केल्यास तुमच्या जीवनातील विघ्न दूर होतील. 
  3. ज्योतिषशास्त्रानुसार, जर मेहनतीचे पूर्ण फळ मिळत नसेल तर बुधवारच्या दिवशी गणेशजींना रूद्राक्ष धारण करा. असे केल्यास तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल याशिवाय तुमच्या आर्थिक स्थितीत देखील सुधारणा होईल. 
  4. बुधवारच्या दिवशी तृतीयपंथ्यांना काही पैसे दान करा. नंतर त्यांच्याकडून काही पैसे आशिर्वादाच्या स्वरूपात घ्या आणि ते पैसे घरातील पूजेच्या ठिकाणी धूपबत्ती लावून हिरव्या कापडामध्ये गुंडाळून ठेवा. असे मानले जाते की असे केल्यास सुख-समृद्धीचा लाभ होतो. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी