Mokshada Ekadashi 2021: मोक्षदा एकादशीला विष्णूच्या या मंत्रांचा करा जप, पूर्ण होतील मनोकामना, जाणून घ्या शुभ शुभ मुहूर्त

आध्यात्म
भरत जाधव
Updated Dec 14, 2021 | 15:24 IST

Mokshada Ekadashi 2021 मार्गशीर्ष (Margashirsha) किंवा आघाण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला मोक्षदा एकादशी (Mokshada Ekadashi ) म्हणतात. या दिवशी भगवान विष्णूची (Lord Vishnu) पूजा (Worship) केल्याने पितरांना मोक्ष प्राप्त होतो, म्हणूनच या एकादशीला मोक्षदा एकादशी म्हणतात

Mokshada Ekadashi 2021
मोक्षदा एकादशीला प्राप्त होतो मोक्षाचा आशीर्वाद  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • मान्यतेनुसार, वैकुंठ द्वार खुले राहते आणि भगवान विष्णू आपल्या भक्तांना मोक्षाचा आशीर्वाद देतात.
  • याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने कुरुक्षेत्रात गीतेचे ज्ञान दिले होते.
  • या दिवशी भगवान विष्णूच्या या मंत्रांचा जप केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात.

Vaikuntha Ekadashi 2021:  नवी दिल्ली :  मार्गशीर्ष (Margashirsha) किंवा आघाण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला मोक्षदा एकादशी (Mokshada Ekadashi ) म्हणतात. या दिवशी भगवान विष्णूची (Lord Vishnu) पूजा (Worship) केल्याने पितरांना मोक्ष प्राप्त होतो, म्हणूनच या एकादशीला मोक्षदा एकादशी म्हणतात, अशी या दिवसाची मान्यता आहे. याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने (ord Krishna) कुरुक्षेत्रात (Kurukshetra) गीतेचे ज्ञान दिले होते. 

या दिवशी गीता जयंती उत्सव साजरा केला जातो. या दिवशी हरियाणातील कुरुक्षेत्र येथील ब्रह्मसरोवराजवळ जत्रेचे आयोजन केले जाते. यंदा मोक्षदा एकादशीचे व्रत मंगळवार,14 डिसेंबर रोजी म्हणजेच आहे. या दिवशी भगवान विष्णूच्या या मंत्रांचा जप केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. मोक्षदा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूच्या पूजेच्या मंत्रांबद्दल आणि शुभ मुहूर्ताविषयी जाणून घेऊ.... 

भगवान विष्णूचे मंत्र -

1-ऊँ नमो भगवते वासुदेवाय

2-श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे । हे नाथ नारायण वासुदेवाय।।

3- नारायणाय विद्महे। वासुदेवाय धीमहि। तन्नो विष्णु प्रचोदयात्।।

4- ऊँ हूं विष्णवे नम:

5- ऊँ विष्णवे नम:

6- ऊँ नमो नारायण। श्री मन नारायण नारायण हरी हरी।

7- ऊँ अं वासुदेवाय नम:

8- ऊँ आं संकर्षणाय नम:

9- ऊँ अं प्रद्युम्नाय नम:
10- ऊँ अ: अनिरुद्धाय नम:

11- ऊँ नारायणाय नम:

12- लक्ष्मी विनायक मंत्र -

दन्ताभये चक्र दरो दधानं,

कराग्रगस्वर्णघटं त्रिनेत्रम्।

धृताब्जया लिंगितमब्धिपुत्रया

लक्ष्मी गणेशं कनकाभमीडे।।

13- धन-वैभव एवं संपन्नता का मंत्र -

ऊँ भूरिदा भूरि देहिनो, मा दभ्रं भूर्या भर। भूरि घेदिन्द्र दित्ससि।

ऊँ भूरिदा त्यसि श्रुत: पुरूत्रा शूर वृत्रहन्। आ नो भजस्व राधसि।
14- विष्णु के पंचरूप मंत्र -

ऊँ ह्रीं कार्तविर्यार्जुनो नाम राजा बाहु सहस्त्रवान। यस्य स्मरेण मात्रेण ह्रतं नष्‍टं च लभ्यते।।

15- विष्णु जी का स्तुति मंत्र -

शांता कारम भुजङ्ग शयनम पद्म नाभं सुरेशम। विश्वाधारं गगनसद्र्श्यं मेघवर्णम शुभांगम। लक्ष्मी कान्तं कमल नयनम योगिभिर्ध्यान नग्म्य्म।

16- विष्णु गायत्री महामंत्र-

ऊँ नारायणाय विद्महे। वासुदेवाय धीमहि। तन्नो विष्णु प्रचोदयात्।।
वन्दे विष्णुम भवभयहरं सर्व लोकेकनाथम।

वैकुंठ एकादशी 2021: तारीख आणि शुभ वेळ

तारीख: 14 डिसेंबर, मंगळवार

एकादशी तिथीची सुरुवात - 13 डिसेंबर 2021 रोजी रात्री 09:32
एकादशी तिथी संपेल - 14 डिसेंबर 2021 रोजी रात्री 11:35
पारण दिवस द्वादशी समाप्ती मुहूर्त - 02:01 AM, 16 डिसेंबर

वैकुंठ एकादशी 2021: महत्त्व

हिंदू ग्रंथांनुसार, ही सर्व 24 एकादशींपैकी सर्वात शुभ मानली जाते. मान्यतेनुसार, वैकुंठ द्वार खुले राहते आणि भगवान विष्णू आपल्या भक्तांना मोक्षाचा आशीर्वाद देतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी