Mokshada Ekadashi 2022: मोक्षदा एकादशी (Mokshada Ekadashi)दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील तिथीला एकादशी साजरी केली जाते. या दिवशी भगवान विष्णूची पूजा करण्याचा नियम आहे आणि त्यांच्या नावाने उपवास केला जातो. मोक्षदा एकादशीच्या दिवशी व्रत करून भगवान विष्णूची (Lord Vishnu) आराधना केल्याने माणसाला सौभाग्य प्राप्त होते. यासोबतच जो कोणी पूर्ण भक्ती आणि खऱ्या मनाने भगवान विष्णूची उपासना ( worship) आणि उपवास करतो, त्याला मृत्यूनंतर स्वर्ग प्राप्त होतो. काशीच्या ज्योतिष चक्रपाणी भट्टा यांनी मोक्षदा एकादशी तिथी, पूजा मुहूर्ताची माहिती दिली आहे. (Mokshada Ekadashi 2022: Mokshada Ekadashi Date, Time and Significance in marathi)
अधिक वाचा : टाटांचा धडाका! एअर इंडिया आणि विस्ताराचे होणार विलीनीकरण
जो कोणी मोक्षदा एकादशीचे व्रत करून विष्णूची पूजा करतो त्याची सर्व पापे नष्ट होतात. एकादशीचे व्रत करणाऱ्या व्यक्तीचे पाप नष्टे होऊन त्याला मोक्ष मिळत असतो. भगवान विष्णूच्या कृपेने त्याला जीवन-मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती मिळते. या तिथीला भगवान श्रीकृष्णाने जगाला गीतेचा उपदेश केला होता , म्हणून मोक्षदा एकादशीच्या दिवशी गीता जयंतीही साजरी केली जाते.
अधिक वाचा : नवरा-बाययकोच्या नात्याची कमकवूत नाळ घट्ट करायची आहे?
हिंदू कॅलेंडरनुसार, मार्गशीष महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथी 03 डिसेंबर रोजी सकाळी 05.39 वाजेपासून सुरू होत आहे. दुसऱ्या दिवशी रविवार, 04 डिसेंबर रोजी सकाळी 05.34 वाजता या एकादशीची तिथी समाप्त होईल. उदयतिथीच्या निमित्ताने 03 डिसेंबर रोजी मोक्षदा एकादशी व्रत पाळण्यात येईल. या दिवशी सूर्योदय सकाळी 06:58 वाजता होईल.
मोक्षदा एकादशीच्या दिवशी सकाळी 07:04 पासून रवियोग सुरू होत आहे, जो दुसऱ्या दिवशी सकाळी 06:16 पर्यंत राहील. उपासनेच्या दृष्टीकोनातून रवि योग शुभ फल देणारं आहे. एकादशीच्या दिवशी तुम्ही सकाळी 09:28 ते दुपारी 01:27 दरम्यान भगवान विष्णूची पूजा करू शकता.