Somvar Che Upay : सोमवारी करा हे उपाय, शंकराच्या कृपेने घरात लक्ष्मी नांदेल प्रगती होईल

Monday Pooja Tips, Somvar Che Upay, Lord Shiva : आज सोमवार. सोमवार हा दिवस भगवान शंकराचा दिवस म्हणून ओळखला जातो. भगवान शिव, शिवशंकर किंवा भोलेनाथ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी दर सोमवारी निवडक उपाय केले जातात.

Monday Pooja Tips, Somvar Che Upay, Lord Shiva
Somvar Che Upay : सोमवारी करा हे उपाय, शंकराच्या कृपेने घरात लक्ष्मी नांदेल प्रगती होईल  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
 • Somvar Che Upay : सोमवारी करा हे उपाय, शंकराच्या कृपेने घरात लक्ष्मी नांदेल प्रगती होईल
 • सोमवार हा दिवस भगवान शंकराचा दिवस
 • भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी दर सोमवारी निवडक उपाय केले जातात

Monday Pooja Tips, Somvar Che Upay, Lord Shiva : आज सोमवार. सोमवार हा दिवस भगवान शंकराचा दिवस म्हणून ओळखला जातो. भगवान शिव, शिवशंकर किंवा भोलेनाथ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी दर सोमवारी निवडक उपाय केले जातात. शंकर प्रसन्न झाल्यास घरात लक्ष्मी नांदते, प्रगती होते; असे सांगतात. मनोभावे पूजन केल्यास भगवान शंकर मनातील इच्छा पूर्ण करतात. याच कारणामुळे सोमवारचे उपाय करणे महत्त्वाचे आहे.

धर्म-कर्म-भविष्य । आध्यात्म । भविष्यात काय

सोमवारी करायचे उपाय किंवा सोमवारचे उपाय ( Monday Pooja Tips, Somvar Che Upay, Lord Shiva )

 1. सोमवारी शंकर मंदिरात जा, शंकराच्या पिंडीवर तांब्यातून दुग्धाभिषेक करा. रुद्राक्षाची माळ हाती घेऊन 'ऊं नमो धनदाय स्वाहा' या मंत्राचा 11 वेळा जप करा.
 2. सोमवारी शंकर मंदिरात जा, शंकराच्या पिंडीवर तांब्यातून दुग्धाभिषेक करा. रुद्राक्षाची माळ हाती घेऊन 'ओम नमः शिवाय:' असा जप 11 वेळा जप करा.
 3. सोमवारी उपवास करा. फक्त फलाहार करा. भगवान शंकराची आराधना करा. उपवास सोडण्यासाठी रात्री जेवण करा.
 4. सोमवारी शंकराला दूध, दही, तूप, साखर, गव्हाच्या पीठापासून तयार केलेला गोडप पदार्थ यांचा प्रसाद दाखवा. नंतर हा प्रसाद वाटून खा. 
 5. सोमवारी बेलपत्र, चंदन, पांढरी फुले यांचा वापर करून शंकराची मनोभावे पूजा करा. शंकराच्या पिंडीवर तांब्यातून दुग्धाभिषेक करा. शंकराची आराधना करा. 
 6. सोमवारी कच्चे तांदूळ त्यात थोडे तीळ मिसळून दान करा.
 7. सोमवारी शंकराचे दर्शन घ्या आणि शिवाष्टक म्हणा. 
 8. लग्न झाले असल्यास दोघांनी शंकराचे सोमवारी दर्शन घ्यावे.
 9. सोमवारी यथाशक्ती दानधर्म करा.

शंकराची पूजा

सकाळी लवकर उठून आंघोळ करावी आणि स्वच्छ कपडे घालावेत. यानंतर मंदिरात शंकरासमोर तुपाचा दिवा लावा. सर्व देवतांना जलाभिषेक करावा. शिवलिंगाला दूध आणि गंगाजलानं स्नान घालावं. त्यानंतर भगवान शंकराला फळं आणि फुले अर्पण करावीत. याशिवाय भगवान शंकराला बेलाची पानं वाहा. त्यानंतर भगवान शंकराची पूजा करावी.

भगवान शंकराच्या कृपेने सर्व दोष, रोग आणि सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते. भगवान शंकराची मनापासून आराधना केल्यानं आर्थिक संकटातून मुक्ती मिळते आणि अपत्यप्राप्ती होते. याशिवाय अविवाहित मुलींना इच्छित वर मिळतो.

निरोगी राहण्यासाठी आंघोळीच्या पाण्यात काही थेंब गंगाजल टाकून स्नान करा. या नंतर भगवान शंकराची पूजा करताना रोली-मोली, तांदूळ, धूप, दीप, सफेद चंदन, जानवे, पिवळे फळ, सफेद मिठाई, गंगाजल तसेच पंचामृत अर्पण करा. गायीच्या तुपाचा दिवा लावा तसेच शिव चालिसाचे पठण करा. यानंतर शिवाष्टक वाचा. हे उपाय तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आजारांपासून वाचवेल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी