Money Remedies Coconut:तुम्ही नेहमी आर्थिक तंगीमध्ये असतात? खूप कमाई करूनही हातात पैसा टिकत नाही का? कायम तुमचा खिसा खाली असतो? कमाई करुनही दुसऱ्याकडून पैसे उसने घ्यावे लागतात का? तर वाचकांनो तुमच्या या समस्येचा आमच्याकडे एक उपाय आहे. हा उपाय केल्यास तुम्ही मालामाल होऊ शकता. तुम्ही कमाई केलेला पैसा तुमच्या हातात टिकू लागेल. चला तर जाणून घेऊ काय आहे..
अधिक वाचा : अडुळशाच्या पानांचे सेवन करण्याचे हे आहेत फायदे
हा उपाय करण्यासाठी तुम्हाला जास्त काही करण्याची गरज नाही. तुम्हाला बाजारातून फक्त नारळ आणावे लागेल. यामुळे धनाची देवी लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर राहील आणि तुम्ही श्रीमंत व्हाल.
अधिक वाचा :या टीप्स करा फॅलो अन् कमी पैशात करा भटकंती
हिंदू धर्मात नारळ कितीही शुभ मानले जाते. प्रत्येक मंगल कार्यक्रमात पूजेच्या वेळी नारळचा उपयोग होतो. लक्ष्मी देवीलाही नारळ खूप आवडते. अशा परिस्थितीत नारळाचा हा उपाय तुमचे आर्थिक संकट दूर करू शकते. तुमच्या खिश्यात पैसे थांबू लागतील.
अधिक वाचा :
आपल्या हातात पैसा राहावा यासाठी शेंडी असलेले नारळ घ्या. सोबत कमळाचे फूल, दही, पांढरे वस्त्र आणि पांढरी मिठाई घ्या. ते धनाची देवी लक्ष्मी मातेला अर्पण करा. लाल रंगाचे कापड घेऊन त्यात नारळ बांधा. मग ते घरामध्ये अशा ठिकाणी ठेवा जेथे कोणी पाहू शकणार नाही.
याशिवाय तुमच्या घरावर वाईट नजर असेल तर तुम्ही नारळाचा उपायही करू शकता. यासाठी नारळावर काजल टिका लावून घ्या आणि नदीत वाहू द्या. यामुळे घरातील वाईट नजर दूर होईल.