Solar Elcipse 2022 : सूर्यग्रहण संपल्यानंतर हे करा, नाही होणार ग्रहणाचा त्रास

Must do these work after end surya grahan 2022 will no side effect of Solar Eclipse : दरवर्षी ग्रहण होते. यंदा वर्षभरात दोन सूर्यग्रहण आणि दोन चंद्रग्रहण होणार आहेत. ग्रहण ही एक खगोलीय घटना आहे. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहणाचा मानवी जीवनावर परिणाम होतो.

Must do these work after end surya grahan 2022 will no side effect of Solar Eclipse
सूर्यग्रहण संपल्यानंतर हे करा, नाही होणार ग्रहणाचा त्रास  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • सूर्यग्रहण संपल्यानंतर हे करा, नाही होणार ग्रहणाचा त्रास
  • यंदा वर्षभरात दोन सूर्यग्रहण आणि दोन चंद्रग्रहण
  • यंदाच्या वर्षीचे पहिले सूर्यग्रहण आज (शनिवार ३० एप्रिल २०२२)

Must do these work after end surya grahan 2022 will no side effect of Solar Eclipse : दरवर्षी ग्रहण होते. यंदा वर्षभरात दोन सूर्यग्रहण आणि दोन चंद्रग्रहण होणार आहेत. ग्रहण ही एक खगोलीय घटना आहे. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहणाचा मानवी जीवनावर परिणाम होतो. यंदाच्या वर्षीचे पहिले सूर्यग्रहण आज (शनिवार ३० एप्रिल २०२२) आहे. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहणाचा अनेकांच्या आयुष्यावर अशुभ अर्थात वाईट परिणाम होण्याचा धोका असतो. हा त्रास टाळण्यासाठी ज्योतिषशास्त्राने काही उपाय सुचविले आहेत. हे उपाय केल्यास ग्रहणाचा दुष्पपरिणाम होणार नाही, असे ज्योतिषांचे म्हणणे आहे. याच कारणामुळे भारतासह जगभरात अनेक ठिकाणी ग्रहण काळात धार्मिकस्थळांचा प्रवेश बंद असतो. 

Surya Grahan 2022: आज वर्षातील पहिले सूर्यग्रहण, जाणून घ्या त्याचा सुतक कालावधी आणि वेळ

ग्रहण माणूस आणि त्याच्या भोवतालच्या व्यक्ती तसेच वातावरणावर परिणाम करू शकते. ग्रहणामुळे पृथ्वीवर मोठ्या प्रमाणावर नकारात्मक ऊर्जेची निर्मिती होते. सूर्यग्रहणात तर नकारात्मक ऊर्जेची तीव्रता जास्त असते. या ऊर्जेमुळे होणारा त्रास टाळण्यासाठी अनेकजण महत्त्वाची कामं आणि शुभ कार्य ग्रहण काळात करणे टाळतात. 

सूर्यग्रहणाचा त्रास होऊ नये म्हणून ग्रहण संपताच करायच्या कृती

  1. ग्रहण संपताच घराच्या सर्व कोपऱ्यांत गंगाजल शिंपडावे
  2. ग्रहण संपताच आंघोळ करा आणि देवाची पूजा करा किंवा आंघोळ करून देवाला नमस्कार करा. 
  3. ग्रहण संपताच गरीब व्यक्तीला अन्नदान, वस्त्रदान, पैशांचे दान, धान्यदान, तिळदान, तांदूळदान, चण्यांचे दान, डाळींचे दान यापैकी जे शक्य असेल ते यथाशक्ती करावे.
  4. गरोदर महिलांनी ग्रहण बघू नये आणि ग्रहण संपताच लगेच आंघोळ करावी.

भारतातून ग्रहण दिसणार नाही

भारतात ग्रहण दिसणार नाही. यामुळे ग्रहणाचा सूतक काळ भारतात लागू नाही. पण ज्यांना ग्रहणाचा त्रास होऊ नये असे वाटत असेल तर ग्रहण संपताच करायचे उपाय करू शकतात.

डिस्क्लेमर / Disclaimer : मजकूर संकलित माहितीच्याआधारे तयार केला आहे. टाइम्स नाउ मराठी कोणतीही अंधश्रद्धा पसरवू  इच्छीत नाही, पण ज्यांचा या सर्व गोष्टींवर विश्वास आहे ते प्रयोग करावा की नाही याचा निर्णय घेण्यास स्वतंत्र आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी