नागपंचमी २०२०: जाणून घ्या कधी आहे नागपंचमी, सणाची कथा

आध्यात्म
Updated Jul 22, 2020 | 18:03 IST | टाइम्स नाऊ मराठी

Nagpanchmi Pooja Vidhi: श्रावण मासातील शुक्ल पक्षाच्या पंचमीला नागपंचमी हा सण साजरा केला जातो.  या दिवशी नागांची पुजा केली जाते. मात्र ती प्रतिकात्मक रूपाने.

nagpanchami
नागपंचमी २०२०: जाणून घ्या कधी आहे नागपंचमी 

थोडं पण कामाचं

  • श्रावण मासातील शुक्ल पक्षाच्या पंचमीला नागपंचमी हा सण साजरा करतात.
  • हा सण २५ जुलैला शनिवारी साजरा केला जात आहे
  • या दिवशीचे उकडीचे पदार्थ केले जातात.

Nagpanchami 2020: श्रावण महिन्याला(shravan month) २१ जुलैपासून सुरूवात झाली आहे. श्रावण महिना म्हणजे सण-उत्सवांचा महिना. या महिन्यात अनेक सण साजरे केले जातात. श्रावण महिन्याच्या सुरूवातीला सण येतो तो म्हणजे नागपंचमी(Nagpanchami 2020). श्रावण मासातील शुक्ल पक्षाच्या पंचमीला नागपंचमी हा सण साजरा करतात. या दिवशी नागांची प्रतिकात्मक पुतळ्याची पुजा केली जाते. तसेच नागाला दूधही पाजले जाते. भगवान शंकराच्या गळ्यामध्ये जो नाग असतो त्याचे नाव वासुकी. नागपंचमीला वासुकी नाग, तक्षक नाग आणि शेषनागाची पुजा केली जाते. 

कधी आहे नागपंचमी

यंदाच्या वर्षी नागपंचमी हा सण २५ जुलैला शनिवारी साजरा केला जात आहे. उत्तरा फाल्गुनी नक्षत्रानंतर हस्त नक्षत्र असेल.

नागपंचमी सणाच्या आदल्या दिवशी उपवास केला जातो. त्यानंतर नागाची पुजा केल्यानंतर हा उपवास सोडला जातो. या दिवशी बायका नवी वस्त्रे नेसून नागदेवतेची पुजा करतात. भिंतीवर नागाचे चित्र काढून त्याची पुजा केली जाते. नागदेवतेला दूध, लाह्यांच प्रसाद दाखवला जातो. तसेच दूर्वा वाहिल्या जातात. या दिवशीचे उकडीचे पदार्थ केले जातात. दरम्यान, भावाच्या दीर्घायुसाठीही हा उपवास करण्यामागचे कारण आहे असेही पुराणात सांगितले आहे. 

यावेळी पुजा करताना 'नमोsस्तु सर्पेभ्यो ये के च पृथ्वी मनु!' ये अंतरिक्षे ये दिवि तेभ्य: सर्पेभ्यो नम:! या मंत्राचा जप करावा. 

हे मिळतात लाभ

नागपंचमीला नागदेवची पुजा केल्याने कुटंबामध्ये सर्पभय राहत नाबी असे पुराणात सांगितले आहे. तसेच सर्प योनीत गेलेल्या पितरांनाही नागपंचमीला पुजा केल्यास मुक्ती मिळते असे सांगतात. तसेच नागदेवतेची पुजा केल्याने कालसर्प आणि सर्पदोषाचा प्रभावही दूर होतो. 

नागपंचमीचा सण साजरा करण्यामागे पुराणात अनेक कथा सांगितल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे श्रीकृष्णाने कालिया नागाचा पराभव केला. तेव्हापासून नागपंचमीचा सण साजरा केला जातो. या दिवशी असे म्हणतात की शेतकरी शेत नांगरत नाहीत. तसेच कोणत्याही प्रकारचे खोदकाम करत नाहीत. तसेच यावेळी नवीन लग्न झालेली मुलगी आपल्या माहेरी राहण्यास येते. दरम्यान, या सणाच्या दिवशी चिरू तसेच कापू नये, त्याचबरोबर चुलीवर तवा ठेवू नये असेही सांगितले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी