Nag Panchami 2022 Puja Upay: नागपंचमीच्या दिवसाचे विशेष महत्त्व शास्त्रात सांगण्यात आले आहे. या दिवशी लोक प्रतीकात्मक चित्र बनवून नागांची पूजा करतात. तसेच ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातून या दिवशी कालसर्प दोषाची पूजा केली जाते. म्हणजे ज्या लोकांच्या जन्मपत्रिकेत काल सर्प दोष आणि राहू दोष आहेत, ते या दिवशी शंकराला रुद्राभिषेक करतात. या दिवशी नागदेवतेची पूजा करण्यासोबतच शंकराची पूजा करून रुद्राभिषेक केल्यास त्याच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात, असा समज आहे. जाणून घ्या काय आहे नागपंचमीचे महत्त्व आणि हा सण का साजरा केला जातो
अधिक वाचा : टीव्ही जगतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्रींची यादी
शास्त्रानुसार नागपंचमीची कथा श्रीकृष्णाशीही जोडलेली आहे. असे म्हणतात की श्रीकृष्ण आपल्या मित्रांसोबत खेळत असताना त्यांचा चेंडू नदीत पडला. या नदीत कालिया नागाचे वास्तव्य होते. श्रीकृष्णाने चेंडू आणण्यासाठी नदीत उडी मारली. तेव्हाच कालिया नागाने श्रीकृष्णावर हल्ला केला.पण श्रीकृष्णाने कालिया नागाला धडा शिकवला. यानंतर कालिया नागाने श्रीकृष्णाची माफी मागितली आणि वचन दिले की ते आतापासून कोणाचेही नुकसान करणार नाहीत. कालिया नागावर श्री कृष्णाचा विजय देखील नागपंचमी म्हणून साजरा केला जातो असे म्हणतात.
1- शास्त्रानुसार नागपंचमीला व्रत करावे. तसेच नाग मंत्राचा जप करावा. असे केल्याने राहू आणि केतू दोषांपासून मुक्ती मिळते.
2- नागपंचमीच्या दिवशी घराबाहेर नागाचे चित्र लावावे, जेणेकरून कुटुंबावर नागदेवतेची कृपा राहते.
3- शास्त्रानुसार नागपंचमीच्या दिवशी सुईच्या धाग्याचा वापर करू नये, तसेच लोखंडी भांड्यांमध्ये या दिवशी अन्न शिजवू नये.
अधिक वाचा : सुवर्णपदक विजेती मीराबाईला व्हायच्या प्रचंड वेदना
4- नागपंचमीच्या दिवशी जिथे सापांचा वावर असेल तिथे अजिबात खोदू नये. तसेच या दिवशी साप मारू नयेत. कुठेही साप दिसला तर जाऊ द्या. त्याला त्रास देऊ नका.
5- ज्योतिष शास्त्रानुसार जर पत्रिकेत राहू आणि केतू भारी असतील तर या दिवशी सापांची पूजा करावी. लक्षात ठेवा की या दिवशी सर्पदेवतेला दूध अर्पण करताना पितळेचा गोळा वापरावा. असे केल्याने राहू आणि केतूचा अशुभ प्रभाव कमी होतो.