Narak Chaturdashi 2021: नरक चतुर्दशीला हनुमानाशी संबंधित करा हे उपाय, संकटमोचन दूर करतील सर्व संकटे

आध्यात्म
भरत जाधव
Updated Nov 03, 2021 | 10:12 IST

Narak Chaturdashi 2021: कार्तिक महिन्यातील (Kartik Month) कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला (Chaturdashi Tithi) नरक चतुर्दशीचा (Narak Chaturdashi ) सण साजरा केला जातो.

Narak Chaturdashi 2021
नरक चतुर्दशीला हनुमानाची पूजा केल्याने दूर करतील सर्व संकटे  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • नरक चतुर्दशी 3 नोव्हेंबरला आणि 4 नोव्हेंबरला साजरी केली जाणार
  • नरक चतुर्दशीला चौदस, काली चौदस, रूप चतुर्दशी आणि छोटी दीपावली अशा अनेक नावांनी देखील ओळखले जाते.
  • आर्थिक संकट असेल तर नरक चतुर्दशीला भगवान हनुमानाची पूजा करा.

Narak Chaturdashi 2021: नवी दिल्ली:  कार्तिक महिन्यातील (Kartik Month) कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला (Chaturdashi Tithi) नरक चतुर्दशीचा (Narak Chaturdashi ) सण साजरा केला जातो. हा सण दिवाळीच्या (Diwali) एक दिवस अगोदर साजरा केला जात असला तरी, यावर्षी तिथी कमी झाल्यामुळे कॅलेंडरमध्ये फरक आहे, त्यामुळे काही लोक नरक चतुर्दशी 3 नोव्हेंबरला तर काही लोक 4 नोव्हेंबरला हा सण साजरा करतील.

नरक चतुर्दशीला चौदस, काली चौदस, रूप चतुर्दशी आणि छोटी दीपावली अशा अनेक नावांनी देखील ओळखले जाते. पण तुम्हाला माहित आहे का की नरक चतुर्दशीला यमदेव व्यतिरिक्त हनुमानजीच्या पूजेचाही केली जाते. वाल्मिकींच्या रामायणानुसार, कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला मंगळवारी हनुमानजींचा जन्म झाला. त्यामुळे नरक चतुर्दशीला हनुमानजींची पूजा केल्याने शुभ फळ मिळते असे मानले जाते. हनुमान जी समस्यानिवारक(संकटमोचक) मानले जातात. जर तुम्हीही कोणत्या संकटाचा सामना करावा असाल तर नरक चतुर्दशीला हे सोपे उपाय करा. तुमच्या या उपायांनी हनुमान प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व दुःखांपासून मुक्ती मिळेल.

हनुमानजींना प्रसन्न करण्याचे उपाय

चला जाणून घेऊया कोणते सोपे उपाय ज्यामुळे तुमच्या समस्या दूर होतील-

हनुमानजींना पानाचा विडा अर्पण करा

असे मानले जाते की हनुमानजींना पान खूप आवडतात. म्हणूनच तुम्ही ते अर्पण करू शकतात. कोपरा बुरा, गुलकंद, बदाम इत्यादी पदार्थ पानांत  टाका. जर तुम्ही त्यांना भक्तीभावाने पानाचे विडा अर्पण केला तर भगवान हनुमान तुमची प्रत्येक तक्रार ऐकतील आणि तुमचे संकट दूर करतील. 

गावरान तुपाच्या रोटींचा नैवैद्य द्या. 

जर तुम्ही वाईट काळातून जात असाल तर त्यावर मात करण्यासाठी त्यांना पाच गावरान तुपाच्या रोटीचं नैवैद्य द्या. यामुळे तुमचा वाईट काळ लवकर संपेल आणि शत्रूपासून तुमची सुटका होईल.

राम नावाचा माळ अर्पित करा

जर तुम्ही आर्थिक विवंचनेने त्रस्त असाल आणि तुम्हाला कुठूनही आशा दिसत नसेल तर छोटी दिवाळीच्या दिवशी पिंपळाच्या 11 पानांवर श्री रामाचे नाव लिहून हनुमानजींना हार घाला. समस्या सोडवण्यासाठी हनुमान देवाला प्रार्थना करा.

चोला द्या

भगवान हनुमान यांना चोला प्रिय आहे. ज्याने हे देऊ केले त्याचे सर्व संकटे हनुमान दूर करत असतात. जर तुमच्या समस्या संपत नसतील तर हनुमानजींना चोला अर्पण करत असताना श्री राम नामाचा जप करा.  याशिवाय संकटमोचनाला बुंदी किंवा बेसनाचे लाडू अर्पण करा आणि एक नारळ डोक्यावर 7 वेळा लावून हनुमानजींच्या चरणी ठेवा. असे केल्याने तुमच्या जीवनात बरेच बदल होतील आणि हळूहळू तुम्हाला प्रत्येक संकटातून मुक्ती मिळू लागेल.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी