Navratri Akhand Jyoti: जाणून घ्या नवरात्रोत्सवात अखंड ज्योती लावण्याचे ९ नियम आणि त्याचे महत्व

Navratri Akhand Jyoti: १७ ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सवाला सुरूवात होत आहे. नवरात्रोत्सवात अखंड ज्योत पेटवली जाते. अखंड ज्योत पेटवण्याला एक वेगळेच महत्व आहे आणि त्याचे काही नियम देखील आहेत. 

Navratri Akhand Jyoti
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

 • नवरात्रोत्सवात अखंड ज्योत प्रज्वलित करण्याची प्रथा
 • जाणून घ्या अखंड ज्योत प्रज्वलितचे नियम आणि महत्व काय आहे

Navratri Akhand Jyoti Rules, Importance: यंदा १७ ऑक्टोबर रोजी घटस्थापना आहे. या दिवसापासूनच नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. नवरात्रीत अखंड ज्योत लावण्याची प्रथा आहे. अखंड ज्योत पेटवण्याला खास महत्व असल्याचं मानलं जातं. ज्योतिषशास्त्रानुसार, नवरात्रोत्सवात दुर्गा मातेसमोर अखंड ज्योत प्रज्वलित करण्यात येते. असे मानले जाते की, गडद अंधारात एक लहानसा दिवा सुद्धा अंधार दूर करतो त्यातप्रमाणे आई भावानी सुद्धा भाविकांच्या आयुष्यातील अंधार, अडचणी दूर करते.

जाणून घ्या अखंड ज्योत प्रज्वलित करण्याचे नियम 

 1. अखंड ज्योत प्रज्वलित ठेवण्यासाठी नेहमीपेक्षा थोड्या मोठ्या आकाराचा दिवा घ्या. यासाठी मातीचा दिवा देखील घेऊ शकता.
 2. मातीचे आणि पितळेचे दिवे पूजेसाठी शुद्ध मानले जातात. त्यामुळे हे दिवे तुम्ही वापरु शकतात. 
 3. अखंड ज्योती नेहमीच उंच ठिकाणी ठेवावी. जमिनीवर ठेवू नका.
 4. पूजेचा दिवा लावण्यापूर्वी त्यावर गुलाल किंवा अष्टगंध लावा.
 5. नवरात्रोत्सवात उपवास करणाऱ्यांपैकी खूपच कमी नागरिकांना माहिती असते की, अखंड ज्योतीची वात ही रक्षा सूत्राने बनवली जाते.
 6. अखंड ज्योतीची वात बनवण्यासाठी सव्वा हाताचे रक्षा सूत्र घेऊन त्याची वात बनवा आणि मग ही वात दिव्याच्या मध्यभागी ठेवा.
 7. अखंड ज्योत प्रज्वलित करण्यासाठी तूप, मोहरी किंवा तिळाच्या तेलाचा वापर करु शकतात.
 8. अखंड ज्योत प्रज्वलित करण्यापूर्वी लक्षात ठेवा की, जर तुम्ही तूप लावत असाल तर ते देवीच्या उजव्या बाजूला ठेवावे. जर दिवा तेलाचा असेल तर तो देवीच्या डाव्या बाजूला ठेवावा.
 9. दिवा प्रज्वलित करण्यापूर्वी गणपती बाप्पा, देवी दुर्गा माता आणि भगवान शंकराचे ध्यान केले पाहिजे.

घटस्थापनेचा मुहूर्त 

१७ ऑक्टोबर २०२० रोजी घटस्थापना आहे. हिंदू संस्कृतीनुसार प्रत्येक सण, उत्सव, शुभ कार्य हे शुभ मुहूर्तावर केले जाते. त्याचप्रमाणे घटस्थापनेचाही शुभमुहूर्त आहे. यंदा सकाळी ६.२७ पासून घटस्थापना करत येऊ शकते. दरवर्षी नवरात्रोत्सवाचा एक वेगळाच उत्साह सर्वत्र भाविकांमध्ये असतो मात्र, यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नवरात्रोत्सव साधेपणाने साजरा करण्यात यावेा असे आवाहन प्रशासनाने सर्व भाविकांना केले आहे.

(Disclaimer: हे वृत्त केवळ तुमच्या माहितीसाठी आहे. ज्योतिषशास्त्रानुसार आणि परंपरेनुसार जे केलं जातं आम्ही त्याचं केवळ वृत्तांकन करत आहोत.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी