Navratri 2020: कोणत्या दुर्गा मातेच्या कोणत्या रुपाची पूजा, कोणत्या दिवशीचा कोणता रंग

navratri 2020 which form of durga maa is worshiped on which day नवरात्रीच्या निमित्ताने झाले गेले विसरुन नवी सुरवात करण्याचा शुभ दिन.

Navratri 2020
देवी माता 

थोडं पण कामाचं

 • Navratri 2020: कोणत्या दुर्गा मातेच्या कोणत्या रुपाची पूजा, कोणत्या दिवशीचा कोणता रंग
 • नवरात्रीच्या काळात नऊ रात्री देवी मातेच्या नऊ रुपांची मनोभावे पूजा करावी
 • जाणून घ्या  कोणत्या दिवशी कोणत्या देवीची पूजा करावी आणि त्या दिवशीचा पवित्र रंग कोणता?

मुंबईः उद्या १७ ऑक्टोबर २०२०. वार शनिवार. घटस्थापनेचा दिवस. शारदीय नवरात्रारंभ. कोरोना संकटामुळे सतत मास्क, सॅनिटायझर, आजारपण, मृत्यू अशा वाईट बातम्या ऐकणाऱ्यांसाठी नवरात्रीच्या निमित्ताने झाले गेले विसरुन नवी सुरवात करण्याचा शुभ दिन. नवरात्र म्हणजे वाईटाचा विनाश आणि चांगल्याचे तसेच शौर्याचे कौतुक करण्याचा उत्सव. अनेकांची अशी श्रद्धा आहे की नवरात्रीच्या काळात नऊ रात्री देवी मातेच्या नऊ रुपांची मनोभावे पूजा करावी. यामुळे पूजा करणारी व्यक्ती आणि त्या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांना सुखसमृद्धीचा लाभ होतो. घरातील अडचणी दूर होतात. याच कारणामुळे नवरात्रीत देवीची पूजा केली जाते. जाणून घ्या  कोणत्या दिवशी कोणत्या देवीची पूजा करावी आणि त्या दिवशीचा पवित्र रंग कोणता? (navratri 2020 which form of durga maa is worshiped on which day)

 1. प्रतिपदा, शनिवार, १७ ऑक्टोबर, रंग करडा (ग्रे वा राखाडी), शैलपुत्री देवी - नवरात्रीच्या पहिल्या दिवसाला घटस्थापनेचा दिवस असे म्हणतात. या दिवशी घट बसतात. देवीची प्रतिष्ठापना होते. देवीचा फोटो अथवा मूर्ती पूजेसाठी ठेवली असल्यास त्यात प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मनोभावे पूजन केले जाते. या दिवशी  शैलपुत्री देवीची पूजा करतात. वाईटाचा विनाश करणाऱ्या करड्या अर्थात ग्रे रंगाचे कपडे या दिवशी वापरतात. करडा रंग हा बुद्धीमत्तेचे प्रतिकही समजला जातो.
 2. द्वितिया, रविवार, १८ ऑक्टोबर, रंग केशरी, ब्रम्हचारिणी देवी - नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ब्रम्हचारिणी देवीची पूजा करतात. या दिवसाचा रंग केशरी आहे. केशरी हा अतिशय पवित्र रंग आहे. चांगल्यासाठी केलेल्या त्यागाचे तसेच सकारात्मक ऊर्जेचे प्रतिक म्हणून या रंगाला महत्त्व आहे.
 3. तृतिया, सोमवार, १९ ऑक्टोबर, रंग पांढरा (सफेद), चंद्रघंटा देवी - नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा करतात. या दिवसाचा रंग पांढरा आहे. शांतता, स्वच्छता, पावित्र्य, ताजेपणा म्हणजे पांढरा रंग. 
 4. चतुर्थी, मंगळवार, २० ऑक्टोबर, रंग लाल, कुशमंदा देवी - नवरात्रीच्या चौथ्या दिवशी लाल रंगाचे कपडे घालून कुशमंदा देवीची पूजा करतात. लाल रंग संताप आणि प्रेम, वात्सल्य अशा दोन्हीशी निगडीत आहे. सोप्या शब्दात सांगायचे तर हा रंग म्हणजे चांगल्याशी चांगले आणि वाईटाशी वाईट वागण्याचा संदेश देणारा रंग आहे.
 5. पंचमी, बुधवार, २१ ऑक्टोबर, रंग निळा, स्कंदमाता देवी - नवरात्रीच्या पाचव्या दिवशी निळ्या रंगाचे कपडे घालतात आणि स्कंदमातेची पूजा करतात. जीवनात स्थैर्य आणि विश्वासार्हता यांना प्रचंड महत्त्व आहे. यासाठीच स्कंदमातेची पूजा केली जाते. 
 6. षष्ठी, गुरुवार, २२ ऑक्टोबर, रंग पिवळा, कातयानी देवी - कातयानी देवी ही देवी वाईट शक्तींचा विनाश करते म्हणून नवरात्रीच्या सहाव्या दिवशी हिची पूजा करतात आणि या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे वापरण्याची पद्धत आहे. पिवळा हा रंग आनंदाचे आणि आशेचे प्रतिक आहे. 
 7. सप्तमी, शुक्रवार, २३ ऑक्टोबर, रंग हिरवा, कलातरी (कालरात्री) देवी - या दिवशी कलातरी देवीची पूजा करतात आणि हिरव्या रंगाचे कपडे वापरतात. हिरवा हा निसर्गाचा रंग आहे. हा अतिशय शांत रंग आहे. या दिवशीचे पूजन सर्व काही सुरळीत करते. अडीअडचणी दूर करते. 
 8. अष्टमी, शनिवार, २४ ऑक्टोबर, रंग जांभळा, गौरी (महागौरी) देवी - गौरी देवीचे पूजन नवरात्रीच्या आठव्या दिवशी केले जाते. या दिवशी जांभळ्या रंगाचे कपडे घालतात. हा उत्तम व्यवस्थापकीय कौशल्याचे प्रतिक असलेला रंग आहे.
 9. नवमी, रविवार, २५ ऑक्टोबर, रंग गुलाबी (रोझ), सिद्धीधात्री देवी - नवरात्रीच्या नवव्या दिवशी गुलाबी (रोझ) रंगाचे कपडे घालतात आणि सिद्धीधात्री देवीची पूजा करतात. या दिवसाचा रंग असलेला गुलाबी रंग हा पावित्र्य, निरागसपणा, वात्सल्य आणि निर्मळ आनंद यांचे प्रतिक आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी