नवरात्रीत शुभ लाभासाठी करायच्या पाच कृती

navratri vastu tips remedies नवरात्रीच्या दिवसांत देवीचा कृपाशीर्वाद लाभावा यासाठी काही सोपे उपाय आहेत. हे उपाय करणे सहज शक्य आहे.

navratri vastu tips remedies
नवरात्रीत शुभ लाभासाठी करायच्या पाच कृती 

थोडं पण कामाचं

  • नवरात्रीत शुभ लाभासाठी करायच्या पाच कृती
  • पाच कृतींमुळे लाभेल देवीचा कृपाशीर्वाद
  • प्रगतीचा मार्ग प्रशस्त होईल

मुंबईः नवरात्रीच्या दिवसांत देवीचा कृपाशीर्वाद लाभावा यासाठी काही सोपे उपाय आहेत. हे उपाय करणे सहज शक्य आहे. नवरात्रीच्या काळात हे उपाय केल्यास शुभ लाभ होतो, असे म्हणतात. या शुभ लाभासाठी नवरात्रीत पाच कृती करुन बघा. (navratri vastu tips remedies)

देवी मातेवर श्रद्धा असलेले नवरात्रीत पूजा, आरती, तांत्रिक साधना, व्रत, उपवास, सप्तशतीचे पठण, जागरण, नवचंडी यज्ञ, पुण्याहवाचन, देवीच्या धार्मिक स्तोत्रांचे पठण असे अनेक उपक्रम करतात. या निमित्ताने देवीचा आशीर्वाद लाभावा, अडचणी दूर व्हाव्या, प्रगतीचा मार्ग प्रशस्त व्हावा यासाठी प्रयत्न करतात. मग या पाच सोप्या असलेल्या कृती करुन बघायला काय हरकत आहे?

नवरात्रीच्या दिवसांत पाच सोप्या कृती करण्याने आपल्या भोवतीची तसेच आपल्या घराभोवतीची सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होऊ शकते. सकारात्मक ऊर्जा वाढू शकते. याचा आपल्याला तसेच घरातील इतर सदस्यांना शुभ लाभ होऊ शकतो, असे अनेकजण सांगतात. चला तर मग जाणून घेऊ, नवरात्रीत शुभ लाभासाठी करायच्या पाच सोप्या कृती...

नवरात्रीत शुभ लाभासाठी करायच्या पाच कृती

  1. नवरात्रीच्या काळात घर तसेच घराभोवतीचा परिसर स्वच्छ करा. घर नीटनेटके ठेवा. कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नका. बेकायदा वर्तन टाळा, वाद आणि हाणामारी टाळा. घराच्या मुख्य दरवाजावर अर्थात प्रवेशद्वारावर झेंडुची फुले आणि आंब्याच्या पानांचे तोरण लावा. आंब्याची पाने उपलब्ध नसल्यास झेंडुची फुले आणि अशोकाच्या पानांचे तोरण लावा. झेंडुची फुले उपलब्ध नसल्यास फक्त आंब्याच्या पानाचे अथवा फक्त अशोकाच्या पानांचे तोरण लावा. तोरणामुळे घरातील नकारात्मक शक्ती नष्ट होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते, असे म्हणतात.
  2. नवरात्रीच्या कालावधीत दररोज घराच्या दरवाजाबाहेर छान रांगोळी काढा. रांगोळी वापरुन घरात देवीची पावले काढा. सर्व खोल्यांमध्ये देवीची पावले काढा. देवीची आरती झाल्यावर या पावलांवर हळुवारपणे पाय ठेवत आरतीचे तबक घेऊन संपूर्ण घरात फिरा. आरती घरातून फिरवून पुन्हा देवीसमोर ठेवा. या कृतीमुळे आरतीच्या पावित्र्याचा प्रभाव घराचे आसमंत भारुन टाकेल. घरातील नकारात्मकता नष्ट करुन सकारात्मकता वाढवण्यासाठी ही कृती लाभदायी ठरते, असे सांगतात. घरात सुख समृद्धी नांदते.
  3. नवरात्रीच्या काळात घराच्या मुख्य दरवाजावर बाहेरच्या बाजूस चंदन अथवा कुंकू यांचा वापर करुन स्वस्तिक काढा. दरवाजावर अथवा दरवाजाच्या चौकटीच्या वर बाहेरील बाजूस गणपतीचा फोटो अथवा मूर्ती लावा. यामुळे घरात आनंदाचे वातावरण राहते. घरात सुख समृद्धी कायम राहते. 
  4. नवरात्रीच्या दिवसांत लक्ष्मी देवीच्या मंदिरात जा. देवीचे मनोभावे दर्शन घ्या. देवीला प्रसाद दाखवा. शक्यतो तांदूळ वापरुन तयार केलेल्या गोड पदार्थाचा अथवा केशर अथवा केशरयुक्त दुधाचा अथवा दुधाचा प्रसाद दाखवा. 
  5. देवी समोर आपण ध्वज ठेवत असाल तर हा ध्वज वायव्य दिशेला ठेवा. देवीची मूर्ती अथवा फोटो ईशान्य दिशेला आणि देवीसमोर अखंड तेवत असलेली ज्योत अथवा समई अथवा दिवा आग्नेय दिशेला असेल याची खबरदारी घ्या. देवी समोर दररोज सकाळी आणि संध्याकाळी तुपाचा दिवा लावा. 

महत्त्वाचा मुद्दा

शुभ लाभासाठी करायच्या पाच सोप्या कृती नवरात्रीच्या काळात दररोज करा. दररोज शक्य नसल्यास किमान सप्तमी, अष्टमी आणि नवमीच्या दिवशी या कृती करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी