Neem Karoli Baba: नीम करोली बाबांनी सांगितले श्रीमंत होण्याचे हे 3 मार्ग

आध्यात्म
Updated Feb 09, 2023 | 17:40 IST | टाइम्स नाऊ मराठी

Neem Karoli Baba:उत्तराखंडच्या नीम करोली बाबाचे नाव हे 20व्या शतकातील  महान संतांमध्ये घेतले जाते. असे म्ंहटले जाते की नीम करोली बाबाकडे दिव्य शक्ती होत्या.  म्हणूनच लोकं त्यांना बजरंगबलीचा अवतार मानायचे.

Neem Karoli Baba told these 3 ways to become rich
नीम करोली बाबाकडे दिव्य शक्ती  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • नीम करोली बाबाकडे दिव्य शक्ती
  • माणसाच्या देहाप्रमाणेच तेही एक दिवस निघून जाणार आहे.
  • जाणून घेऊया नीम करोली बाबाच्या सिध्दांताबद्दल.

Neem Karoli Baba viral, नवी दिल्ली :  उत्तराखंडच्या नीम करोली बाबाचे नाव हे 20व्या शतकातील  महान संतांमध्ये घेतले जाते. असे म्हटले जाते की नीम करोली बाबाकडे दिव्य शक्ती होत्या.  म्हणूनच लोकं त्यांना बजरंगबलीचा अवतार मानायचे. नीम करोली बाबा म्हणायचे श्रीमंत असणे ही  अशी एक गरज आहे, जी प्रत्येक माणसाला हवी असते. पण खर्‍या अर्थाने माणूस कधी श्रीमंत म्हटला जातो हे तुम्हाला माहीत आहे. मग जाणून घेऊया नीम करोली बाबाच्या सिद्धांताबद्दल. (Neem Karoli Baba told these 3 ways to become rich read in marathi)

पैशाची उपयुक्तता 

नीम करोली बाबांनुसार, जर एखाद्या व्यक्तीकडे भरपूर पैसा असेल तर त्याला श्रीमंत समजणे योग्य नाही. श्रीमंत म्हणण्यासाठी तुम्हाला त्या पैशाचा वापर कसा करावा हे माहीत असणं गरजेचं आहे. हा पैसा जर गरजू लोकांसाठी कामी नाही आला, तर हा पैसा काही कामाचा नाही. पैशाचा योग्य तो वापर करणारेच खरे श्रीमंत असतात. प्रत्येक माणसाचे हे कर्तव्य की त्यांनी आपल्या पैशाचा उपयोग गरजूंसाठी करावा.

संपत्तीचे वितरण

महाराज म्हणतात, आपण जर संपत्तीचे वितरण नाही केले, तुम्ही पैशाची तिजोरी रिकामी केली नाही तर भरणार कशी. जर तुम्ही पैसा असाच जर साठवून ठेवलात तर नक्कीच एक दिवस ते नष्ट होऊन जाईल. कारण देव नेहमी अशाच लोकांची निवड करतो, ज्यांच्या मनात गरीबांबद्दल प्रेम आहे.

जरी तुमच्या मनात मदतीची भावना नसेल,जीवनात फक्त पैसा कमवत राहाल तर समजून जा हा पैसा जास्त काळ टिकणार नाही. जर तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीसाठी तुमच्या पैशाची तिजोरी रिकामी केली तर देव पुन्हा तुम्हाला भरभरून देईल. पैसा योग्य ठिकाणी जर कसा वापरायचा हे तुम्हाला माहीत नसेल, तर पैसा परत भरणे अशक्य आहे. जमा केलेला पैसा कधीच टिकत नाही. तो एकना एक दिवस निघून जातो.


वागणूक आणि देवावर विश्वास

 नीम करोली बाबा म्हणतात, जर एखाद्या व्यक्तीचे चारित्र्य, वागणूक आणि देवावर विश्वास असेल, तुम्ही या तिन्ही गोष्टींनी परिपूर्ण असाल तर स्वतःला गरीब समजू नका. जो पैसा तुमच्याकडे आहे तोच खर्‍या अर्थाने श्रीमंत आहे. नजरेस येणारी प्रत्येक गोष्ट रत्न नसते.  ते नश्वर आहेत. माणसाच्या देहाप्रमाणेच तेही एक दिवस निघून जाणार आहे. पण काम, भावना, भक्ती आणि समाजासाठी केलेलं कल्याण हे कायम लक्षात राहतं. हे लोकचं नेहमी श्रीमंत असतात. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी