Pitru Paksha 2022: पितृपक्षात चुकूनही करू नका ही कामे नाहीतर...

आध्यात्म
Updated Aug 22, 2022 | 14:50 IST | टाइम्स नाऊ मराठी

Pitru Paksha: पितृपक्षात पितरांना पिंडदान आणि तर्पण केले जाते. यासाठी पितृपक्षात काही दिवस काही कार्ये करणे वर्ज्य मानले जाते. या कामांमुळे पितरे नाराज होतात आणि तुम्हाला अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जाणून घ्या पितृपक्षात कोणती कामे करावीत आणि करू नयेत. 

pitru paksh
पितृपक्षात चुकूनही करू नका ही कामे नाहीतर... 
थोडं पण कामाचं
  • पितृपक्षात मांसाहारी भोजन करणे वर्ज्य मानले जाते
  •  पितृपक्षात घरात कोणत्याही प्रकारचे शुभमंगल कार्ये नको
  • १० सप्टेंबरपासून सुरू होतोय पितृपक्ष

मुंबई: हिंदू धर्मात(hindu religion) पितृपक्षाला(pitru paksh) विशेष महत्त्व आहे. पितृपक्षादरम्यान पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी पिंडदान, श्राद्ध आणि तर्पण केले जाते. पितरांना पिंडदान तसेच श्राद्ध घातल्याने त्यांचे आशीर्वाद मिळतात. सोबतच त्या व्यक्तीला सुख-समृद्धी आणि प्रत्येक कामात यश मिळते. १० सप्टेंबरपासून पितृपक्ष सुरू होत आहे. पितृपक्ष १५ दिवसांचा असतो. पितृपक्षाच्या दिवसांमध्ये काही नियमांचे जरूर पालन केले पाहिजे. या दरम्यान काही कार्ये करणे वर्ज्य मानले जाते. या कामांमुळे पितर नाराज होऊ शकतात. जाणून घ्या कोणती कामे करावीत आणि करू नयेत. Neve do this things on pitru paksh 2022

अधिक वाचा - आईवडिलांच्या घटस्फोटाचा मुलांवर होतो गंभीर परिणाम

पितृपक्षात चुकूनही करू नका ही कामे

  1. पितृपक्षादरम्ान १५ दिवस घरी मांसाहारी भोजन बनवू नका. सोबतच लसूण आणि कांद्याचेही सेवन करू नय. 
  2. पितृपक्षात जी व्यक्ती श्राद्धकर्म करते त्यांनी पूर्ण १५ दिवस केस तसेच नखे कापू नयेत.तसेच त्यांनी ब्रम्हचर्येचे पालन करावे. 
  3. पितृपक्षादरम्यान कोणत्याही प्राण्याला त्रास देऊ नये. यामुळे पितर नाराज होतात आणि तुम्हाला संकटे घेरू शकतात. 
  4. पितृपक्षादरम्यान केवळ मांसाहारीच भोजन नव्हे तर काही शाकाहारी पदार्थांचे सेवनही वर्ज्य मानले जाते. या दिवसांत दुधी भोपळा, काकडी, चणे, जिरे आणि मोहरीची भाजी खाऊ नयेत. 
  5. पितृपक्षात मंगल कार्ये करणे वर्ज्य मानले जाते. या दिवसांमध्ये लग्न, मुंडन, साखरपुडा तसेच गृहप्रवेश यासारखी कामे करू नयेत. पितृपक्षादरम्यान शोकाकुल वातावरण असते त्यामुळे घरात कोणतेही शुभ कार्य करू नये. यामुळे पितर नाराज होतात. 
  6. पितृपक्षात शरीरावर तेल लावणेही वर्ज्य मानले जाते. 

अधिक वाचा - ISIS च्या दहशतवाद्याला रशियात अटक, भारतात हल्ल्याचा होता कट

पितृपक्षादरम्यान ही कार्ये करू नयेत. पितृपक्षात या नियमांचे पालन केल्यास पितरांच्या आत्म्याला शांती मिळते. तसेच पितर प्रसन्न होत आशीर्वाद देतात ज्यामुळे घरात तसेच कुटुंबात सुख शांती राहते. 

पितृपक्षाच्या तिथी

  1. १० सप्टेंबर २०२२ : पौर्णिमा भाद्रपद
  2. ११ सप्टेंबर २०२२ : कृष्ण पक्ष प्रतिपदा आश्विन मास
  3. १२ सप्टेंबर २०२२ : कृष्ण पक्ष द्वितीय, आश्विन मास
  4. १३ सप्टेंबर २०२२ : तृतीय कृष्ण पक्ष आश्विन मास
  5. १४ सप्टेंबर २०२२ : आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी
  6. १५ सप्टेंबर २०२२ : आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील पंचमी तिथी
  7. १६ सप्टेंबर २०२२ : आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील षष्ठी तिथी
  8. १७ सप्टेंबर २०२२ : आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील सप्तमी तिथी
  9. १८ सप्टेंबर २०२२ : आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी
  10. १९ सप्टेंबर २०२२ : आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील नवमी तिथी
  11. २० सप्टेंबर २०२२ : आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील दशमी तिथी
  12. २१ सप्टेंबर २०२२ : आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील एकदाशी तिथी
  13. २२ सप्टेंबर २०२२ : आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वादशी तिथी
  14. २३ सप्टेंबर २०२२ : आश्विन मास, त्रयोदशी, कृष्ण पक्ष
  15. २४ सप्टेंबर २०२२ : आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी
  16. २५ सप्टेंबर २०२२ : आश्विन महिन्यातील अमावस्या आणि पितृपक्ष का समापन

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी