मुंबई: हिंदू धर्मात अनेक झाडांची पुजा केली जाते. यात तुळशीच्या रोपाचाही समावेश होते. असे म्हणतात की तुळशीच्या रोपामध्ये लक्ष्मी मातेचा वास असतो. नियमितपणे नियमानुसार तुळशीची पुजा केल्याने घरात सुख-समृद्धी येते. लक्ष्मी मातेची कृपा राहते. मात्र तुळशीच्या झाडाबाबत काही नियम लक्षात घेणे गरजेचे आहे. जर या गोष्टींकडे दुर्लक्ष केले तर लक्ष्मी माता नाराज होऊन सोडून जाऊ शकते. Never break tulsi leaves on this days
अधिक वाचा - शिंदे गटावर टांगती तलवार कायम, उद्या होणार सुनावणी
तुळशीच्या रोपाची पुजा करताना त्याला जल अर्पण करताना काही गोष्टींचे ध्यान राखणे गरजेचे असते. सोबतच अनेकजण कोणताही विचार न करता तुळशीची पाने तोडतात. यामुळे तुम्ही पापाचे भागीदार बनू शकता. ज्योतिषानुसार तुळशीची पाने तोडण्याचेही काही नियम सांगितले आहेत.
शास्त्रांनुसार तुळस इतकी पवित्र आहे की भगवान विष्णूंनी तिला आपल्या डोक्यावर स्थान दिले आहे.इतकंच नव्हे तुळशीच्या पानांशिवाय भगवान विष्णू प्रसाद ग्रहण करत नाही. तुळशीचे रोप वैधृती आणि व्यतीपात या दोन योगांमध्ये चुकूनही तोडू नये.
याशिवाय तुळशीची पाने मंगळवार, रविवार आणि शुक्रवारच्या दिवशी चुकूनही तोडू नयेत. सोबतच एकादशी, अमावस्या, आणि पोर्णिमा तिथीला तोडू नयेत.
तुळशीचे रोप संक्रांतीच्या दिवशी, घरात कोणाचा जन्म झाल्यास आणि त्याचे नामकरणाच्या दिवशी तुळशीची पाने तोडू नयेत. याशिवाय घरात कोणाचाही मृत्यू झाल्यास तेराव्या दिवशी तुळशीची पाने तोडू नये.
अधिक वाचा - शिवसेना संपविण्याचा डाव समोर आला - उद्धव ठाकरे
ज्योतिषशास्त्रानुसार सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळेस तुळशीचे पान तोडणे वर्ज्य मानले जाते.
आंघोळ न करता अशुद्ध हातांनी तुळशीची पाने तोडू नयेत. याशिवाय कधीही चाकू, कैची अथवा नखांनी तुळशीचा पाने तोडू नयेत. तुळशीचे एक एक पान न तोडता त्याचा वरचा भाग तोडावा.
सनातन धर्मात रविवारी तुळशीमध्ये जल अर्पण करणे अशुभ आहे. या दिवशी तुळशीला पाणी अर्पण करू नये आणि तुळशीची पानेही तोडू नयेत, असे सांगितले जाते. एकादशी आणि सूर्य आणि चंद्रग्रहणाच्या वेळीही पाणी अर्पण करण्यास मनाई आहे.
(Disclaimer: हा मजकूर उपलब्ध असलेल्या सामान्य समजुती आणि साहित्यावर आधारित आहे. टाइम्स नाऊ मराठी याची पुष्टी करत नाही.)