Chanakya Niti: नितीशास्त्रात आचार्य चाणक्य यांनी सांगितलेली धोरणे भलेही लोकांना कठोर वाटत असली तरी लोकांचे जीवन सुकर करण्याचा योग्य मार्ग दाखवते. या उपायांचा अवलंब केल्याने कोणतीही व्यक्ती आपले जीवन आनंदी बनवू शकते. आचार्य चाणक्य यांनी आपल्या नितीशास्त्रात वृद्ध, वयाने मोठे आणि महिला तसेच लहान मुलांबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. (never do these things in front of children otherwise you will face problems in the future as per Chanakya niti)
मुलांच्या संगोपनाशी निगडीत महत्त्वाच्या गोष्टींबाबत पालकांना सावध करत आचार्यांनी सांगितले की, पालकांनी मुलांसमोर प्रत्येक गोष्ट नीट विचार करूनच करावी. कारण मुले लहान रोपांसारखी असतात. ते लहानपणी त्यांच्यावर जसे संस्कार होतील त्याच प्रकारे ते मोठे होतील. त्यामुळे मुलांची काळजी घेताना अनेक खबरदारी घेणे आवश्यक आहे. जर पालकांनी या गोष्टींची काळजी घेतली नाही तर भविष्यात त्याचा परिणाम मुलांवर होऊ शकतो.
आचार्य चाणक्य यांच्या मते, पालकांनी कधीही मुलांसमोर खोटे बोलू नये किंवा त्यांच्यासमोर दिखावा करू नये. जर एखाद्या पालकाने असे केले तर ते मुलांना त्यांच्या खोटेपणात समाविष्ट करुन खोटे बोलायला शिकवतात. असे केल्याने त्याचा त्रास पालकांनाच सहन करावा लागतो कारण, भविष्यात मुलेच त्यांच्यासोबत खोटे बोलू लागतात.
अधिक वाचा : Vastu Tips: घराच्या ' या' दिशेला अन्नपूर्णेचा फोटो लावल्यास धन आणि अन्नाची कधीही कमतरता भासणार नाही
आचार्य चाणक्य म्हणतात की, पालकांनी आपल्या मुलांसमोर एकमेकांचा आदर आणि सन्मान करायला पाहिजे. कारण, त्याचा थेट परिणाम मुलांच्या मनावर होतो. मुलंसमोर एकमेकांचा अनादर केला तर मुलंही तेच शिकतात आणि आई-वडिलांचा आदर करणंही सोडून देतात.
आचार्य चाणक्य यांच्या मते, अनेकदा पालक आपल्या मुलांसमोर भांडू लागतात आणि या काळात ते एकमेकांच्या चुका काढून अपमान करण्याचा प्रयत्न करतात. असे करणारे लोक स्वत:च्या मुलाच्या नजरेत पडतात. यातूनच मुलाला आपल्या आई-वडिलांच्या चुका कळतात आणि संधी मिळाल्यावर त्याबाबत ते बोलून दाखवतात.
(Disclaimer: हा मजकूर इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या सामान्य माहितीच्या आधारावर लिहिण्यात आला आहे. टाइम्स नाऊ मराठी याची पुष्टी करत नाही)