मुंबई: सावित्रीने यमदेवाकडून सत्यवानाचे प्राण परत मागितले होते. याच सावित्री वत्रानुसार दरवर्षी सुवासिनी महिला वडाची पुजा करतात आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. वट पोर्णिमा (Vat Purnima Vrat)चे व्रत ज्येष्ठ पोर्णिमेला केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी महिला व्रत ठेवून वडाची पुजा करतात. त्याला प्रदक्षिणा घालतात. पंचांगानुसार वट पोर्णिमेचे व्रत यंदा १४ जूनला केले जात आहे. वट पोर्णिमेच्या व्रतामध्ये काही खास नियमांचे पालन केले जाते. जाणून घेऊया...Never do this mistake on this vatpournima
अधिक वाचा - राज्यातल्या 'या' भागात पुढील 5 दिवस मुसळधार पावसाची शक्यता
वट पोर्णिमेच्या व्रताच्या नियमानुसार या दिवशी महिलांनी काळे, सफेद अथवा निळ्या रंगाचे कपडे घालू नये. खरंतर हे वट पोर्णिमेच्या नियमांच्या विरुद्ध मानले जाते. अशातच या व्रताला विशेख काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो.
वट पोर्णिमेच्या दिवशी सुवासिनी महिलांनी काळी, निळी अथवा सफेद रंगाच्या बांगड्याही घालू नयेत. असे करणे अशुभ मानले जाते.
मान्यतेनुसार ज्या महिला पहिल्यांदा वटपोर्णिमेचे व्रत करत आहे त्यांनी व्रत आणि पुजेदरम्यान सुवासिनींनी आपल्या माहेरच्या वस्तू वापरल्या पाहिजेत. अशी मान्यता आहे की या दिवशी पुजेमध्ये माहेरच्या वस्तूंचा वापर केला पाहिजे यामुळे अखंड सौभाग्याचा आशीर्वाद मिळतो.
अधिक वाचा - शरीराच्या कोणत्या भागावर तीळ असणं असतं भाग्यवानाचं प्रतिक
वडाचे झाड विशाल असते याच्या वडाच्या पारंब्या लटकत असतात. याा सावित्री देवीचे रूप मानले जाते. हिंदू धर्मात वडाच्या झाडात ब्रम्हा, विष्णू, महेशाचा वास मानला जातो. या वृक्षाच्या मुळाशी ब्रम्हा असतात मध्येच विष्णू आणि वरच्या भागात भगवान शंकराचा वास असतो. यासाठी या वृक्षाच्या खाली बसून पुजा केल्याने सारे व्रत मनाच्या इच्छा पूर्ण होतात. सोबतच सौभाग्याचा आशीर्वाद मिळतो.