मुंबई: वास्तुशास्त्रात(vastu shastra) घराच्या प्रत्येक कोपऱ्याबद्दल काही गरजेचे नियम सांगितले आहेत. तर वास्तुमध्ये किचनसंबंधितही(kitchen) अनेक बाबी सांगितल्या आहेत. जर या गोष्टी लक्षात ठेवल्या नाहीत तर त्या व्यक्तीच्या घरातील वृद्धी निघून जाते. सुख शांती निघून जाते. किचनमध्ये कोणत्याही प्रकारचा वास्तु दोष(vastu dosh) कुटुंबातील व्यक्तींच्या जीवनावर नकारात्मक प्रभाव टाकतात. Never Do this mistake while making roti
अधिक वाचा - बॅंकांनी एकदम वाढवले एफडीवरील व्याजदर, ग्राहकांची चांदी
वास्तुशास्त्रात चपाती बनवण्याबाबतही काही नियम सांगितले. कुटुंब हल्ली छोटे असल्याने चपात्या या मोजून बनवल्या जातात. दरम्यान, आरोग्य तसेच पैशाच्या हिशेबाने हे योग्यच आहे. मात्र वास्तुशास्त्रात असे करणे चुकीचे मानले गेले आहे. वास्तुजाणकार सांगतात की चपातीसंबंधित या चुका केल्याने ग्रहांची स्थिती खराब होते. घराची सुख-शांती, समृद्धी आणि कुटुंबातील व्यक्तींचे आरोग्य बिघडते.
वास्तु जाणकारांच्या मते जेव्हा तुम्ही चपात्या बनवता त्या मोजून बनवू नका. नेहमी ४-५ चपात्या जास्त बनवल्या पाहिजेत. ज्योतिषशास्त्राने पहिली चपाती गायीला आणि शेवटची चपाती कुत्र्याला खाऊ घालणे शुभ मानले गेले आहे.
वास्तुनुसार चपाती बनवाताना हे लक्षात घ्या की नेहमी पाहुण्यासाठी जास्त चपाती बनवा. नेहमी २ जास्त चपात्या बनवा. असे केल्याने अन्नपूर्णा मातेची कृपा आपल्यावर राहते. तसेच घरात वृद्धी होते.
अधिक वाचा - गोपाळकाल्याला मुंबई पोलिसांनीही धरला ताल
वास्तुनुसार कधीही शिळ्या पिठाच्या चपात्या खाऊ नयेत. असे म्हणतात की या पीठापासून बनलेली पोळी कुटुंबातील क्लेशाचे कारण ठरते. यात अनेक प्रकारचे बॅक्टेरिया उत्पन्न होतात. शिळ्या चपातीचा संबंध हा राहूशी असतो. यासाठी या चपात्या कुत्र्यांना दिल्या जातात. ताज्या पिठापासून बनवलेली चपाती मंगळ ग्रह मजबूत करण्याचे काम करते.