Vastu Tips: चपाती वाढताना चुकूनही करू नका या चुका,नाहीतर पडेल भारी

आध्यात्म
Updated Jul 21, 2022 | 17:01 IST | टाइम्स नाऊ मराठी

tips for roti: जर तुम्ही कोणाला जेवण देताना चपाती वाढत आहात तर काही चुका चुकूनही करू नका. असे केल्याने घरात क्लेश सुरू होण्यासोबतच घरातील धन-दौलत निघून जाते. 

chapati
चपाती वाढताना चुकूनही करू नका या चुका,नाहीतर पडेल भारी 
थोडं पण कामाचं
  • वास्तुशास्त्राबद्दल बोलायचे झाल्यास अनेकदा चुकून केल्या गेलेल्या काही चुका आपल्या जीवनात मोठे वादळ आणतात.
  • अनेकदा जेवताना एखाद्याच्या ताटातील पोळी संपली तर किचनमध्ये हातातून चपात आणून ती वाढली जाते.
  • मात्र असे करू नये. हातात चपाती घेऊन जाऊन ती वाढणे यामुळे दारिद्रय वाढते.

मुंबई: जीवन(life) जगण्यासाठी योग्य वेळेवर पौष्टिक जेवण(food) घेणे गरजेचे असते. मात्र अनेकदा असे होते की चांगले जेवण करूनही आरोग्य(health) सतत बिघडत असते. तसेच घरात सतत दारिद्रय आणि कलह वाढू लागतात. याचे कारण तुमच्या जेवणात नाही तर ते वाढण्यात चूक होत आहे. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोक की चपाती(roti) वाढताना कोणत्या चुका करू नयेत. नाहीतर तुम्ही कंगाल होऊ शकता. (Never do this mistake while serving roti in plate)

अधिक वाचा - 

एकत्र ३ पोळ्या वाढू नका

वास्तुशास्त्राबद्दल बोलायचे झाल्यास अनेकदा चुकून केल्या गेलेल्या काही चुका आपल्या जीवनात मोठे वादळ आणतात. यातीलच एक म्हणजे चपाती वाढणे. या कारणामुळे आर्थिक तंगीसह संपूर्ण कुटुंबात गृहक्लेशचीही समस्या निर्माण होते. सनातन धर्मानुसार भोजन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला कधीही एकत्र ३ पोळ्या वाढू नयेत. असे केल्याने घरातील सुख शांती कमी होते. तसेच कुटुंबात नकारात्मक उर्जा वाढते. 

हातात चपाती देऊ नका

अनेकदा जेवताना एखाद्याच्या ताटातील पोळी संपली तर किचनमध्ये हातातून चपात आणून ती वाढली जाते. मात्र असे करू नये. हातात चपाती घेऊन जाऊन ती वाढणे यामुळे दारिद्रय वाढते. असे केल्याने जेवण जेऊ घातल्याचे पुण्य कमी होते. त्यामुळे चुकूनही अशी चूक करू नका. अशातच चपाती नेहमी एखाद्या प्लेट अथवा भांड्यात ठेवून वाढा. 

पाहुण्यांना देऊ नका शिळी पोळी

अनेकदा पोळ्या शिल्लक राहिल्यास त्या तशाच ठेवून नंतर खाल्ल्या जातात. जर त्या शिळ्या पोळ्या तुम्ही खात आहात तर ठीक आहे मात्र एखादे साधू-संत अथवा पाहुणे तुमच्याकडे आलेत आणि त्यांना तुम्ही या शिळ्या पोळ्या खायला देऊ नका. असे केल्याने देव आपल्यावर नाराज होतात. त्यामुळे ही चूक कधीही करू नका. 

अधिक वाचा - 

गरजेपेक्षा ४ पोळ्या जास्त बनवा

ज्योतिषाचार्यांच्या मते घरातील कुटुंबियांसाठी जेवणात जितक्या पोळींची गरज असते त्यापेक्षा ४ पोळ्या अधिकच बनवल्या पाहिजेत. यात पहिली पोळी ही गायीसाठी बनवली पाहिजे. याचा आकार तवा जितका मोठा असेल तितका मोठा असला पाहिजे. तर शेवटची पोळी ही नेहमी कुत्र्यासाठी बनवली पाहिजे. ही तोडून गायीच्या पोळीपेक्षा वेगळी ठेवा. उरलेल्या २ पोळ्या या पाहुण्यांसाठी ठेवल्या पाहिजेत. हिंदू धर्मात अतिथी देवो भव असे म्हटले जाते त्यामुळे घरात अप्रत्यक्षरित्या येणाऱ्या पाहुण्यांसाठी या पोळ्या बनवल्या जातात. यामुळे घर कधीही रिकामे राहत नाही. तसेच अन्नपूर्णेची कृपा आपल्यावर राहते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी