Hanuman Jayanti 2022:हनुमान जयंतीच्या दिवशी करू नका ही ५ कामे, नाहीतर पडतील भारी

आध्यात्म
Updated Apr 14, 2022 | 12:41 IST | टाइम्स नाऊ मराठी

Hanuman Jayanti 2022: संकटमोचक हनुमान जयंतीचा दिवस खूप खास असतो. या दिवशी व्रत, पुजा जरूर करा मात्र काही चुका करू नका. नाहीतर अनेक अडचणीत सापडू शकता. 

hanuman jayanti
हनुमान जयंतीच्या दिवशी करू नका ही ५ कामे, नाहीतर पडतील भारी 
थोडं पण कामाचं
  • १६ एप्रिलला आहे हनुमान जयंती
  • पुजेदरम्यान करू नका या चुका
  • अनेक समस्यांचे ठरू शकतात कारण

Hanuman Jayanti 2022: हिंदू धर्मात हनुमान जयंतीचे(hanuman jayanti) खूप महत्त्व आहे. चैत्र मासाच्या शुक्ल पक्षातील पोर्णिमेला संकटमोचक हनुमान जयंती साजरी केली जाते. या दिवशी बजरंगबलीची पुजा विधिवतपणे तसेच पुजा-अर्चाने(worship) केली जाते. उपवास केला जातो. या वर्षी १६ एप्रिल २०२२ला शनिवारी हनुमान जयंती साजरी केली जात आहे. हनुमानाची कृपा राहिल्यानस जीवनातील प्रत्येक दुख दूर होते. तसेच अपार सुख आणि संपत्ती मिळते. मात्र या दिवशी काही चुका केल्यास ते अनेक संकटांना निमंत्रण ठरते. अशातच हनुमान जयंतीशी संबंधित काही नियम जरूर जाणून घ्या. Never do this mistakes on hanuman jayanti 2022

अधिक वाचा - IPL: अनेक महिने क्रिकेट खेळू शकणार नाही चेन्नईचा हा खेळाडू

या गोष्टींची घ्या काळजी

हनुमान जयंतीच्यया दिवशी पुजा-अर्चना करताना महिलांनी विशेष काळजी घ्या. हनुमान हे बाल ब्रम्हचारी आहेत. दरम्यान, महिलांनी पुजा करताना चुकूनही बजरंगबलीचया मूर्ताीला स्पर्श करू नये नाहीतर अनेक समस्या येऊ शकतात. 

हनुमानाच्या पुजेदरम्यान कधीही चरणामृतचा प्रयोग करू नका.

हनुमानाची पुजा करताना कधीही काळे अथवा सफेद कपडे घालू नका. हे खूप अशुभ मानले जाते. शुभ फळ मिळवण्यासाठी लाल अथवा पिवळे वस्त्र परिधान करा. 

जे लोक हनुमान जयंतीचे व्रत करत आहेत त्यांनी दिवसा झोपू नये. त्याऐवजी बजरंगबलीची आराधना करा. या दिवशी ब्रम्हचर्येचे पालन करा.

अधिक वाचा -  Taxi प्रवास महागणार, प्रत्येक ट्रिपच्या भाड्यात 12-15% वाढ

ज्यांच्या घरामध्ये काही कारणामुळे सुतक झाले असेल तर त्यांनी हनुमान मंदिरात जाऊ नये तसेच पुजाही करू नये. 

हनुमान जयंतीला करा हे उपाय

  1. हनुमान जयंतीच्या दिवशी ११ वेळा हनुमान चालिसाचे पठण करा. हनुमान मंदिरात जाऊन संकटमोचकच्या मूर्तीसमोर बसून याचे पठण करा. असे केल्याने शनिचा त्रास अथवा साडेसातीपासून सुटका मिळेल. 
  2. हनुमानाला बेसनचे लाडू प्रिय आहेत. हनुमान जयंतीच्या दिवशी त्यांना बेसन लाडूचा प्रसाद चढवा. असे केल्याने जीवनात सुख-समृद्धी येईल. संकटमोचकला गोड पान अर्पण करा. यात काथा, गुलकंद, खोबरे, बडिशेप आणि गुलाबकतरीचा वापर करा.   

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी