Sankashti Chaturthi 2022:उद्या आहे अंगारकी संकष्टी, चुकूनही करून नका ही कामे

आध्यात्म
Updated Apr 18, 2022 | 15:35 IST | टाइम्स नाऊ मराठी

Sankashti Chaturthi April 2022:संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेशाची पुजा केल्यानंतर रात्री चंद्राला अर्घ्य दिले पाहिजे. याशिवाय काही गोष्टींवर लक्ष दिले पाहिजे.

ganesh chaturthi
उद्या आहे अंगारकी संकष्टी, चुकूनही करून नका ही कामे 
थोडं पण कामाचं
  • गणपती बाप्पाला चुकूनही तुळस अर्पण करू नका.
  • पशु-पक्ष्यांना कधीही त्रास देऊ नये. मात्र संकष्टी चतुर्थीच्या दिवशी असे करणे भारी पडू शकते.
  • संकष्टी चतुर्थीच्या दिवशी वरिष्ठ-ब्राम्हणांचा अपमान करू नका.

मुंबई: अंगारकी गणेश चतुर्थीच्या(ganesh chaturthi दिवशी गणपतीची मोठ्या मनोभावे आराधना केली जाते. सर्व चतुर्थी या गणपती बाप्पाला समर्पित केलेल्या असतात दर महिन्याला २ चतुर्थी सतात. यातील कृष्ण पक्षात एक आणि दुसरी शुक्ल पक्षात येते. यातील कृ्ष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी आणि शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हटले जात. उद्या म्हणजेच १९ एप्रिलला अंगारकी संकष्टी योग आहे. या दिवशी गणपतीसाठी उपवास केला जातो. संकष्टी चतुर्थीचा उपवास आणि पुजाविधीबाबत काही गोष्टींचे ध्यान राखणे गरजेचे असते. सोबतच चतुर्थीची पुजा शुभ मुहूर्तावर केली पाहिजे आणि चंद्राला अर्घ्य दिले पाहिजे. याशिवाय पुजा अपुरी मानली जाते.Never do this mistakes on sankashti chaturthi

अधिक वाचा - खासदार होताच हरभजन सिंगचं मोठं काम, सर्वजण करताय कौतुक

संकष्टी चतुर्थी पुजा मुहूर्त

१९ एप्रिल मंगळवारी संध्याकाळी ४.३८ वाजल्यापासून चतुर्थी तिथीला प्रारंभ होईल जो २० एप्रिल दुपारी १.५२ वाजेपर्यंत कायम राही. चतुर्थीच्या उपवासादरम्यान चंद्राला अर्घ्य जरूर दिले पाहिजे. यावेळेस अंगारकी संकष्टीचा चंद्रोदय ९.५० मिनिटांनी आहे. 

संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करा या मंत्राचा जप

गजाननं भूतगणादि सेवितं
कपित्थ जम्बूफलसार भक्षितम्
उमासुतं शोक विनाशकारणं
नमामि विघ्नेश्वर पादपङ्कजम् ॥  

संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ही कामे करू नये

गणपती बाप्पाला चुकूनही तुळस अर्पण करू नका. असे करणे अशुभ मानले जाते. 

पशु-पक्ष्यांना कधीही त्रास देऊ नये. मात्र संकष्टी चतुर्थीच्या दिवशी असे करणे भारी पडू शकते. या दिवशी त्यांना अन्न पाणी द्या.

संकष्टी चतुर्थीच्या दिवशी वरिष्ठ-ब्राम्हणांचा अपमान करू नका. यामुळे गणपती बाप्पा तुमच्यावर नाराज होऊ शकतात.

 

संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपले आचरण चांगले ठेवा. कोणाशीही खोटे बोलू नका. तसेच कोणालाही फसवू नका. 

संकष्टी चतुर्थीच्या दिवशी मांस-मच्छीचे सेवन करू नका. इतकंच नव्हे तर या दिवशी घरी जेवणात लसूण-कांद्याचा वापर करू नये. या दिवशी सात्विक भोजन करावे. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी