Vastu Tips: सूर्यास्तानंतर चुकूनही ही कामे करू नका नाहीतर होईल मोठे नुकसान...

आध्यात्म
Updated Jun 23, 2022 | 17:22 IST | टाइम्स नाऊ मराठी

धर्म शास्त्रात काही चांगले काम करण्याची तसेच जीवनातील काही नियमांचे पालन करण्याचा सल्ला दिला जातो. यातील काही कामे अशी आहेत जी सकाळी अथवा संध्याकाळच्या वेळेस करणे चुकीचे मानले जाते.

sunset
सूर्यास्तानंतर चुकूनही ही कामे करू नका नाहीतर.... 
थोडं पण कामाचं
  • अनेकदा वडीलधाऱ्यांकडून तुम्ही ऐकले असेल की संध्याकाळी दिवा लावण्याच्या वेळेस झोपू नये
  • दान करणे ही चांगली गोष्ट आहे मात्र सूर्यास्तानंतर आंबट पदार्थ जसेच दही, लोणचे आणि मीठाचे दान करू नये.
  • सूर्यास्तानंतर कधीही घराची साफ-सफाई करू नका.

मुंबई: ज्या पद्धतीने व्यक्तीच्या चांगल्या कर्मामुळे त्याचे भाग्य उजळते त्याच पद्धतीने वाईट कामामुळे त्या व्यक्तीचे सौभाग्य हे दुर्भाग्यात बदलते. यासाठी धर्म शास्त्रात(dharmashastra) काही चांगले काम करण्याची तसेच जीवनातील काही नियमांचे पालन करण्याचा सल्ला दिला जातो. यातील काही कामे अशी आहेत जी सकाळी अथवा संध्याकाळच्या वेळेस करणे चुकीचे मानले जाते. ही कामे चुकीच्या वेळी करणे अशुभ मानले जाते. असे केल्याने मिळणारे सौभाग्य हे दुर्भाग्यात बदलते. जाणून घ्या सूर्यास्तानंतर(sunset) कोणती कामे करू नयेत...Never do this things after sunset

अधिक वाचा - देशातून गायब होतोय मलेरिया

सूर्यास्ताच्या वेळेस झोपणे

अनेकदा वडीलधाऱ्यांकडून तुम्ही ऐकले असेल की संध्याकाळी दिवा लावण्याच्या वेळेस झोपू नये. संध्याकाळच्या वेळेस धनदेवी लक्ष्मी प्रवेश करे. त्यामुळे यावेळेस कधीही झोपण्याची चूक करू नका. नाहीतर लक्ष्मी माता तुमच्यावर नाराज होईल आणि घरात प्रवेश करणार नाही. 

झाडांना हात लावणेे

कधीही सूर्यास्तानंतर झाडांना हात लावू नये आणि तसेच फळे, फूल अथवा पाने तोडू नयेत. सूर्यास्तानंतर झाडे-झुडुपे झोपतात त्यांमुळे त्यांना हात न लावण्याचा सल्ला दिला जातो. 

सूर्यास्तानंतर साफ-सफाई करणे

सूर्यास्तानंतर कधीही घराची साफ-सफाई करू नका. सूर्यास्तानंतर झाडू मारणे, जाळे काढणे हे योग्य मानले जात नाही. असे केल्याने लक्ष्मी माता नाराज होते आणि वाईट दिवस सुरू होण्यास वेळ लागत नाही. 

आंबट पदार्थांचे दान नको

दान करणे ही चांगली गोष्ट आहे मात्र सूर्यास्तानंतर आंबट पदार्थ जसेच दही, लोणचे आणि मीठाचे दान करू नये. असे केल्याने तुमच्या घरातील लक्ष्मी दूर निघून जाईल.. 

अधिक वाचा - वडील होण्यासाठी पुरुषांचे योग्य वय कोणते?

नखे-केस कापणे 

सूर्यास्ताच्या वेळेस आणि सूर्यास्तानंतर कधीही केस अथवा नखे कापू नका. तसेच शेव्हिंगही करू नका. असे केल्याने जीवनात नकारात्मकता येते. तसेच गरिबीही येते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी