Chanakya Niti:या कामांसाठी पैसा खर्च करण्यात नका करू संकोच, आयुष्यभर राहणार लक्ष्मी मातेची कृपा

आध्यात्म
Updated Aug 23, 2022 | 17:55 IST | टाइम्स नाऊ मराठी

Acharya chankya niti: आचार्य चाणक्य यांचे उपदेश व्यक्तीला जीवनात येणाऱ्या त्रासांपासून लढण्यासाठी तसेच समस्यांपासून बचावासाठी प्रेरणा देतात. आज आपण जाणून घेणार आहोत की आचार्य चाणक्य अशा गोष्टी सांगतात ज्यांचे पालन करून आयुष्यात यश मिळवू शकता. 

chanakya
Chanakya Niti:येथे खर्च करा पैसा, राहणार लक्ष्मी मातेची कृपा 
थोडं पण कामाचं
  • आचार्य चाणक्य यांचे म्हणणे आहे की प्रत्येक व्यक्तीला आपल्या इन्कममधील काही भाग सामाजिक कार्यांसाठी दान केला पाहिजे.
  • चाणक्य नितीनुसार जर एखादा गरीब अथवा गरजू व्यक्तीला मदत करता आली तर यापेक्षा पुण्याचे काम दुसरे असूच शकत नाही.
  • आचार्य चाणक्य यांच्यानुसार व्यक्तीला नेहमी काही कामांसाठी पैसा खर्च करताना विचार करू नये.

मुंबई: आचार्य चाणक्य(acharya chankya) यांचे अनुभव नितीशास्त्रात वर्णन करण्यात आले आहे. यात जीवनात येणाऱ्या समस्यांपासून कसा बचाव करता येईल याबाबतचा उल्लेख आहे. इतकंच नव्हे तर चाणक्य यांच्या गोष्टींचे अनुसरून जीवनातील प्रत्येक क्षेत्रात यश मिळवता येते. चाणक्य नितींमध्ये व्यक्तींना सांगितले आहे की धन कसे सांभाळावे. काही अशा जागा असतात जिथे पैसा खर्च करताना व्यक्तीला अजिबात संकोच करता कामा नये. असे केल्याने त्या व्यक्तीवर लक्ष्मी मातेची कृपा राहते. Never hesitate to spend money for this things

अधिक वाचा - लघवी करताना अचानक हुडहुडी का भरते?

धार्मिक स्थळांना करा मदत

धार्मिक कार्यांना दिलेला पैसा खूप पुण्यफळ देतो. आचार्य चाणक्य यांचे म्हणणे आहे की कोणत्याही मंदिरात अथवा धार्मिक स्थळी पैशांची मदत करताना हात आखडता घेऊ नये. असे केल्याने त्या व्यक्तीला पुण्यप्राप्ती होते. सोबतच जीवनात सकारात्मकता वाढते. 

आजारी व्यक्तीची मदत

आचार्य चाणक्य यांच्यानुसार व्यक्तीला नेहमी काही कामांसाठी पैसा खर्च करताना विचार करू नये. यात सगळ्यात आधी येतात आजारी व्यक्ती. कोणत्याही व्यक्तीच्या आजारापणात जर तुमचे पैसे खर्च होत असतील तर त्याचा विचार करू नये. एखाद्याचा जीव वाचवणे हे परोपकाराचे कार्य मानले जाते. असे मानले जाते की आजारी व्यक्तीला मदत केल्याने जे पुण्य मिळते ते व्यक्तीला यशाच्या मार्गावर नेते. 

गरिबांना मदत करा

चाणक्य नितीनुसार जर एखादा गरीब अथवा गरजू व्यक्तीला मदत करता आली तर यापेक्षा पुण्याचे काम दुसरे असूच शकत नाही. अशा कामांसाठी खर्च केलेला पैसा गरीब आणि गरजूंनी दिलेले आशीर्वादातून खूप पुण्य मिळते. 

अधिक वाचा - तरुण वयात हार्ट अटॅक, पाहा दीर्घायुषी होण्याच्या टिप्स

सामाजिक कार्यात करा दान

आचार्य चाणक्य यांचे म्हणणे आहे की प्रत्येक व्यक्तीला आपल्या इन्कममधील काही भाग सामाजिक कार्यांसाठी दान केला पाहिजे. लोकांना रुग्णालय, शाळा, धर्मशाळा या ठिकाणी अथावा अन्य सामाजिक ठिकाणी आपल्या ताकदीनुसार दान केले पाहिजे. लोकांकडून मिळणारे आशीर्वाद व्यक्तीला खूप यश देतात. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी