Chanakya Niti: या लोकांना त्रास दिल्यास लक्ष्मी माता होते नाराज, येतात वाईट दिवस

आध्यात्म
Updated Aug 05, 2022 | 13:02 IST | टाइम्स नाऊ मराठी

Chanakya Niti:चाणक्य नितीनुसार अनुकरण केल्यास व्यक्तीचे जीवन अतिशय सरल होते. चाणक्य नितीमध्ये लक्ष्मी मातेची कृपा मिळवण्यासाठी काही कामे न करण्याचा सल्ला दिला आहे. या गोष्टींचे अनुकरण केल्यास धन-संपत्ती, मान-सन्मान प्राप्त होतो. 

chanakya
थोडं पण कामाचं
  • चाणक्य नितीनुसार जर व्यक्तीवर लक्ष्मी मातेची कृपा आहे अथवा मेहरबान आहे तेव्हा त्या व्यक्तीला काही गोष्टींचे ध्यान राखणे गरजेचे असते.
  • चाणक्यनितीनुसार अनेकदा पाहिले गेले आहे की ज्यया लोकांकडे पैसा येतो त्यांच्याकडे अहंकार वाढतो.
  • चाणक्य नितीमध्ये सांगितले आहे की जे लोक मेहनत करतात आणि आपल्या कामाप्रती समर्पित असतात त्यांना कधीही त्रास देऊ नये.

मुंबई: आचार्य चाणक्य(acharya chankya) आपल्या महान गोष्टींनी लोकांना मार्गदर्शन करतात. चाणक्य एक कूटनितीतज्ञ, अर्थतज्ञ तसेच सल्लागार आहेत. त्यांच्या नितींचे पालन केल्यास जीवनात येणाऱ्या समस्यांपासून दूर राहता येते. अशातच आज आपण अशा चाणक्य नितीबद्दल(chankya niti) ऐकणार आहोत ज्यामध्ये लक्ष्मी मातेची(laxmi mata) कृपा मिळवण्यासाठी अनेक उपाय सांगितले आहेत. चाणक्य नितीमध्ये सांगितले आहे की काही कामे अशी असतात जी केल्याने व्यक्तीचे वाईट दिवस येण्यास वेळ लागत नाही. सोबतच यामुळे लक्ष्मी माता रूसते. (Never hurt this people for any reason)

अधिक वाचा - एकाने पकडली जर्सी, दुसऱ्याने धरला गळा

चाणक्य नितीनुसार जर व्यक्तीवर लक्ष्मी मातेची कृपा आहे अथवा मेहरबान आहे तेव्हा त्या व्यक्तीला काही गोष्टींचे ध्यान राखणे गरजेचे असते. त्या व्यक्तीला इतर व्यक्तींच्या प्रती विनम्र राहिले पाहिजे. चाणक्यनितीनुसार अनेकदा पाहिले गेले आहे की ज्यया लोकांकडे पैसा येतो त्यांच्याकडे अहंकार वाढतो. आपल्यापेक्षा कमी तसेच नीच व्यक्तींना त्रास देण्यास सुरूवात होते. जाणून घेऊया अशाच काही कार्यांबद्दल जी त्या व्यक्तीने करू नये. 

या लोकांचा करा सन्मान

चाणक्य नितीमध्ये सांगितले आहे की जे लोक मेहनत करतात आणि आपल्या कामाप्रती समर्पित असतात त्यांना कधीही त्रास देऊ नये. असे केल्याने लक्ष्मी माता अप्रसन्न होते. तसेच पुढे जाऊन त्या व्यक्तीला धनहानीचा सामना करावा लागतो. 

लोकांशी विनम्र राहा

जेव्हा व्यक्तीकडे पैसा येतो तेव्हा त्या व्यक्तीमध्ये अहंकारही वाढतो. या अहंकाराच्या वेगात व्यक्ती आपल्यापेक्षा कमी ताकदवर तसेच गरीब लोकांना त्रास देऊ लागतो. न कारणाशिवाय त्रास देणे सुरू होते. आचार्यनुसार असे केल्याने लक्ष्मी माता रूसते आणि येणाऱ्या काळात अनेक समस्या उभी करते. 

अधिक वाचा - सोन्याच्या भावात वाढ, चांदीदेखील वधारली, चेक करा ताजा भाव

महिलांचा करा सन्मान

चाणक्य नितीमध्ये सांगितले आहे की प्रत्येक व्यक्तीला महिला आणि मुलांचा सन्मान केला पाहिजे. या लोकांना त्रास दिल्यास लक्ष्मी माता नाराज होते आणि माता लक्ष्मीची कृपा कधी मिळत नाही. या लोकांच्या घरात दारिद्रय वाढते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी