Vastu Tips For Sleeping: झोपताना या ५ गोष्टी कधीच डोक्याजवळ ठेवू नका, नाहीतर व्हाल बर्बाद 

आध्यात्म
Updated Jun 06, 2022 | 15:05 IST | टाइम्स नाऊ मराठी

Vastu Tips For Sleeping । वास्तुशास्त्रामध्ये प्रत्येक दिवसाशी संबंधित अनेक नियम सांगण्यात आले आहेत. कारण त्याचा मानवी जीवनावर थेट किंवा विपरीत परिणाम होत असतो. त्याचप्रमाणे वास्तुशास्त्रात नमूद केल्याप्रमाणे झोपताना काही गोष्टी अजिबात जवळ ठेवू नयेत.

Never keep these 5 things near your head while sleeping 
झोपताना या ५ गोष्टी कधीच डोक्याजवळ ठेवू नका, नाहीतर...  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • वास्तुशास्त्रामध्ये प्रत्येक दिवसाशी संबंधित अनेक नियम सांगण्यात आले आहेत.
  • वास्तुशास्त्रात नमूद केल्याप्रमाणे झोपताना काही गोष्टी अजिबात जवळ ठेवू नयेत.
  • वास्तुशास्त्रानुसार सोन्याचे दागिने झोपताना जवळ ठेवू नयेत.

Vastu Tips For Sleeping । मुंबई : वास्तुशास्त्रामध्ये प्रत्येक दिवसाशी संबंधित अनेक नियम सांगण्यात आले आहेत. कारण त्याचा मानवी जीवनावर थेट किंवा विपरीत परिणाम होत असतो. त्याचप्रमाणे वास्तुशास्त्रात नमूद केल्याप्रमाणे झोपताना काही गोष्टी अजिबात जवळ ठेवू नयेत. कारण असे केल्याने व्यक्तीच्या कुंडलीत दोष निर्माण होऊ शकतात. यासोबतच मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते, ज्याचा व्यक्तीच्या प्रगतीवर, व्यवसायावर, करिअरवर वाईट परिणाम होतो. चला तर म जाणून घेऊया कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या झोपताना जवळपासही ठेवू नयेत. (Never keep these 5 things near your head while sleeping). 

अधिक वाचा : किल्ले रायगडावर राज्याभिषेक सोहळ्याला सुरुवात

झोपताना या ५ गोष्टी चुकूनही ठेवू नका जवळपास

  1. शूज किंवा चपला - अनेकांना शूज किंवा चप्पल जवळ ठेवून झोपायची सवय असते त्यामुळे ते शूज आणि चप्पल बेडखाली ठेवतात. वास्तूनुसार असे करणे चांगले नाही. कारण ते नकारात्मक ऊर्जा घरात आणते. ज्याचा शारीरिक आणि मानसिक प्रभाव पडत असतो. शूज किंवा चपला यांचा वापर आपण आपल्या पायांचे रक्षण करण्यासाठी करत असतो त्यामुळे आपल्या बिछाण्यापाशी त्यांना ठेवणे अशुभ आहे. 
  2. पर्स - अनेकांना पर्स उशीखाली ठेवून झोपण्याची सवय असते. पण असे करू नये. कारण वास्तूनुसार असे केल्याने पैशाच्या चणचणीला सामोरे जावे लागते. यासोबतच लव्ह लाईफवरही याचा वाईट परिणाम होतो. कारण पर्समध्ये मुख्यत्वे धनाच्या संबंधित वस्तू असतात त्यामुळे पर्स झोपतावेळी आपल्यापासून दूरवर ठेवली पाहिजे. 
  3. आरसा - अनेक लोक आपल्या बेडजवळ आरसाही ठेवतात. दरम्यान हे असे करणे टाळले पाहिजे. कारण आरशातून बाहेर पडणाऱ्या नकारात्मक उर्जेचा व्यक्तीच्या लव्ह लाईफवर वाईट परिणाम होतो. यासोबतच भयानक स्वप्ने पडतात. दरम्यान काही लोकांचा असा देखील समज आहे की सकाळी उठल्याबरोबर प्रथम आरश्यात आपले तोंड पाहिल्यावर येणारा दिवस अशुभ जातो. त्यामुळे आरशापासून अंतर ठेवून झोपलेले कधीही चांगलेच आहे. 
  4. सोने - वास्तुशास्त्रानुसार सोन्याचे दागिने झोपताना जवळ ठेवू नयेत. ते अशुभ आहे. जे लोक बेडजवळ किंवा उशीजवळ सोने ठेवतात, अशा लोकांना जास्त राग येतो. तसेच नातेसंबंधात वाद निर्माण होण्याची दाट शक्यता असते. तसेच कोणताही अलंकार घालून झोपणे देखील अशुभ मानले जाते. 
  5. पुस्तक - अनेकांना सवय असते की ते अभ्यास करत-करत झोपतात आणि ते झोपेतच पुस्तक उशाखाली किंना बिछान्यावर कुठेही ठेवतात. पण वास्तुनुसार असे करू नये. कारण त्याचा करिअरवर वाईट परिणाम होतो. कारण पुस्तक ज्ञान देण्याचे काम करत असते त्यामुळे पुस्तकाची अशी विटंबना करणे चुकीचे आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी