मुंबई: गरोदर(preganant) असणे ही कोणत्याही महिलेसाठी तिच्या आयुष्यातील सगळ्यात मोठी आनंदाची गोष्ट असते. ज्यावेळेस त्या महिलेला समजते की ती आई होणार आहे तेव्हा तिच्या आनंदाला पारावर उरत नाही. केवळ ती महिलाच नव्हे त्यांचे संपूर्ण कुटुंब येणाऱ्या बाळाचा(baby) आनंद साजरा करू लागतात. मात्र गर्भावस्थेत महिलांनी(womens) आपल्या आरोग्याची(health) तसेच खाण्यापिण्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. कारण थोडासा निष्काळजीपणा महिलेच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो. वास्तुशास्त्रात गरोदर महिलांच्या खोलीबाबतही विस्ताराने सांगितले आहे. जाणून घेऊया वास्तुनुसार गरोदर महिलांची खोली कशी असावी, त्यात काय असावे याबाबत सांगितले आहे. (Never put this things in pregnant women room)
अधिक वाचा - शिंदे सरकारचा विस्तार; शिंदे गटाला 40 टक्के वाटा
गर्भावस्थेदरम्यान महिलांची पॉझिटिव्ह एनर्जी राखणे गरजेचे आहे. वास्तु शास्त्रानुसार गरोदर महिलांच्या खोलीत अंधार नको. गरोदर महिलांच्या खोलीत प्रकाश असला पाहिजे. बाळाच्या विकासासाठी प्रकाशाची गरज असते.
शास्त्रात सांगितले आहे की गरोदरपणात आपले डोळ्यांसमोर ज्या घटना घडतात त्यांचा परिणाम मुलांवर होतो. यामुळे गरोदर महिलांच्या खोलीत भगवान कृष्णाच्या बाल रूपाचा फोटो ठेवण्याचा सल्ला दिला जातो. याशिवाय गरोदर महिलांच्या खोलीत हसत्याखेळत्या बाळाचा फोटो असला पाहिजे. यामुळे आजूबाजूस सकारात्मक उर्जेचा संचार होतो.
गरोदर महिलांच्या खोलीत भगवान कृष्णाच्या फोटोसह श्री कृष्णाशी संबंधित शंख, बासरी आणि मोरपंख असले पाहिजे. यामुळे होणाऱ्या बाळाचा स्वभाव हसमुख होतो आणि श्री कृष्णाप्रमाणे नटखट होतो.
गरोर महिलेच्या खोलीचा रंग खूप जास्त गडद असता कामा नये.. खोलीचा रंग हलका असला पाहिजे. वास्तुनुसार गरोदर महिलेच्या खोलीचा रंग गुलाबी असला पाहिजे. कारण हा रंग आनंदाचे प्रतीक मानला जातो.
अधिक वाचा - Viral Video, मरता मरता वाचले दोघे
गरोदर महिलेच्या खोलीत पिवळ्या अक्षता अथवा तांदूळ असले पाहिजेत. वास्तुमध्ये याला अतिशय शुभ मानले गेले आहे. गरोदर महिलेच्या खोलीस पिवळे तांदूळ ठेवल्याने नकारात्मकता येत नाही. कारण तांदळाचा संबंध माता लक्ष्मी आणि पिवळ्या रंगांचा संबंध भगवान विष्णूशी असतो. अशातच गरोदर महिलेच्या खोलीत पिवळे तांदूळ ठेवल्याने होणारी आई आणि होणाऱ्या बाळावर लक्ष्मी माता आणि भगवान विष्णूची कृपा राहते.