मुंबई: सकाळी उठताच प्रत्येक व्यक्तीच्या मनात ही गोष्ट येते की त्यांचा दिवस चांगला जावा. हाती घेणाऱ्या कामांमध्ये यश मिळावे. तसेच दिवसाची सुरूवात चांगली झाली तर संपूर्ण दिवस सकारात्मक राहतो. तुम्ही पाहिले असेल की घरातील मोठ्या व्यक्तीही सकाळी उठताच काही कामे करण्याचा सल्ला देतात जो शुभ असतो. जसे सकाळी उठून आपल्या हातांचे दर्शन घेतले पाहिजे. कारण असं म्हटलं जातं की व्यक्तीच्या हातामध्ये भगवान विष्णू, लक्ष्मी माता आणि सरस्वती मातेचा वास असतो. जाणून घ्या ज्योतिषशास्त्रानुसार सकाळी उठताच कोणत्या वस्तू पाहणे चांगले नसते. Never see this things after wake up in morning
अधिक वाचा - गृहिणींनी १५ मिनिटांसाठी घरीच करा हे ५ व्यायाम, वाचा सविस्तर
आपल्या बेडरूममध्ये अथवा फोनच्या वॉलपेपरवर जंगली प्राण्यांचे चित्र लावू नका. कारण ज्योतिषशास्त्रात सकाळी उठताच जंगली प्राण्यांचे चित्र अथवा पेंटिंग पाहिल्याने मनावर चुकीचा परिणाम होतो. तसेच जीवनात नकारात्मकता येते.
ज्योतिषशा्त्रानुसारा सकाळी उठताच तुटलेली अथवा खंडित मूर्ती पाहणेही अशुभ असते. तसेच घरात खंडित अथवा तुटलेली मूर्ती ठेवणेही योग्य नाही.
सकाळी उठून आपली सावलीही पाहू नये. कारण असे केल्याने जीवनात नकारात्मकता यते तसेच अनेक कार्यांमध्ये अडथळा निर्माण होतो. लक्षात ठेवा सकाळी उठल्यावर सूर्यदेवाचे दर्शन जरूर करा मात्र सावली पाहू नका.
अधिक वाचा - Dry Fruits for Men: पुरुषांनो स्टॅमिना वाढवयचा आहे का
अनेकांना सवय असते की ते सकाळी उठताच आपला चेहरा आरशात पाहतात. ज्योतिषशास्त्रात ही सवय चुकीची सांगण्यात आली आहे. तुम्हाला सकाळी उठून आपला चेहरा आरशात नाही पाहिला पाहिजे. कारण यामुळे दिवसभरात कामात कोणते ना कोणते अडथळे ेयेतात.