New year 2023 upay in marathi: आयुष्यात सुख-समृद्धी, आनंद, पैसा मिळवावा असे प्रत्येकालाच वाटत असते. नवीन वर्षात प्रत्येकजण यासाठी प्रयत्न करत एक संकल्प करतात. आपल्या आयुष्यातील चांगल्या-वाईट गोष्टी, वर्षभरातील आठवणी घेऊन प्रत्येकजण सरत्या वर्षाला निरोप देतो आणि नवीन वर्षाचं स्वागत करतो. मात्र, नवीन वर्षात प्रत्येकाच्या घरात सुख-समृद्धी नांदेल अशी सर्वांची इच्छा असते. तुम्ही सुद्धा यासाठी काही उपाय नक्की अवलंबू शकता ज्यामुळे तुमच्यासाठी नववर्ष हे आनंद घेऊन येईल. (new year 2023 do this upay for good luck wealth prosperity money happiness read in marathi)
ज्योतिषशास्त्रानुसार, 2023 मध्ये हनुमानाची पूजा करण्यासोबतच वर्षातून किमान दोनवेळा हनुमानजींना भगव्या रंगाचे वस्त्र अर्पण करा. असे केल्यास बजरंगबली लवकरच प्रसन्न होतील आणि आपली कृपा नेहमी कायम ठेवतात.
हे पण वाचा : 2023 मध्ये घरी आणा या 11 वस्तू, येईल सुख-समृद्धी अन् धनवर्षाव
ज्योतिषशास्त्रानुसार, नारळाचा वापर वाईट नजरेपासून मुक्ती देण्यासाठी करता येतो. नवीन वर्षाच्या मंगळवारी, गुरुवारी किंवा शनिवारी नारळ घेऊन आपल्या आणि कुटुंबातील सदस्यांच्या वरुन 21 वेळा उतरवून टाका. त्यानंतर हे नारळ पाण्यात टाका. हे दर महिन्याला किंवा सहा महिन्यांमधून एकदा करता येईल.
हे पण वाचा : फाटलेल्या नोटा बदलून घेण्याचं नका घेऊ टेन्शन, या ठिकाणी करा एक्सचेंज
नवीन वर्षात सलग 11 दिवस डोळ्यांत काजळ भरा. मान्यता आहे की, असे केल्याने रोग, दोष आणि भीती यापासून मुक्ती मिळते. तसेच ग्रहांची स्थिती सुधारते.
हे पण वाचा : स्वप्नात चंद्र दर्शन होणे शुभ की अशुभ? वाचा
नवीन वर्षाच्या पहिल्या शनिवारी गरजू किंवा गरीब व्यक्तींना पांढरे किंवा दोन रंगांचे ब्लँकेट द्या. याच्याशिवाय तुम्ही स्वेटर, शाल आणि इतर उबदार कपडे दान करू शकता. यामुळे घरात आनंदच नांदेल.
(Disclaimer: हा मजकूर इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे लिहिण्यात आलेला आहे. टाइम्स नाऊ मराठी या वृत्ताला दुजोरा देत नाही.)