निर्जला एकादशीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये?

nirjala ekadashi vrat 2022 date puja vidhi and rules know dos donts of ekadashi vrat : ज्येष्ठ मासातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला निर्जला एकादशी म्हणतात. यंदा शुक्रवार १० जून २०२२ रोजी निर्जला एकादशी आहे.

nirjala ekadashi vrat 2022 date puja vidhi and rules know dos donts of ekadashi vrat
निर्जला एकादशीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये?  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • निर्जला एकादशीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये?
  • निर्जला एकादशीच्या व्रताच्या काळात पाणी पीत नाहीत
  • १० जून २०२२ रोजी असलेली निर्जला एकादशी ही अतिशय महत्त्वाची एकादशी

nirjala ekadashi vrat 2022 date puja vidhi and rules know dos donts of ekadashi vrat : ज्येष्ठ मासातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला निर्जला एकादशी म्हणतात. यंदा शुक्रवार १० जून २०२२ रोजी निर्जला एकादशी आहे. या दिवशी निर्जला एकादशीचे व्रत करतात. व्रत काळात पाणी पीत नाहीत. हे व्रत पूर्ण करणाऱ्या व्यक्तीला पुण्यलाभ होतो.

भारतीय पंचागानुसार वर्षभरात २४ वेळा एकादशी असते. यंदाच्या वर्षात म्हणजेच २०२२ मध्येही २४ एकादशी आहेत. यापैकी १० जून २०२२ रोजी असलेली निर्जला एकादशी ही अतिशय महत्त्वाची एकादशी समजली जाते. वर्षभरातील सर्व एकादशींच्या व्रतापेक्षा निर्जला एकादशीचे व्रत श्रेष्ठ समजले जाते.

निर्जला एकादशीच्या दिवशी पहाटे उठून आंघोळ करून विष्णू देवाची मनोभावे पूजा करतात. विष्णू पूजनाने व्रतारंभ होतो. जाणून घ्या निर्जला एकादशीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये?...

  1. निर्जला एकादशीचे व्रत सुरू असताना पाण्याचा एक थेंब पण पीत नाहीत. भारताच्या काही भागांमध्ये निर्जला एकादशीच्या काळात कडक उन्हाळा सुरू असतो. यामुळे त्या भागांमध्ये निर्जला एकादशीचे व्रत करणे कठीण आहे. यामुळे शक्यतो आजारी व्यक्तींनी निर्जला एकादशीचे व्रत करू नये. निरोगी व्यक्तींनी निर्जला एकादशीचे व्रत करताना आधी स्वतःच्या तब्येतीचा अंदाज घ्यावा. तब्येतीच्या काही समस्या असतील अथवा आजारी असाल पण व्रत करायचे असेल तर सुरुवात करण्याआधी लिंबू पाणी पिऊन घ्यावे.
  2. निर्जला एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजे दशमीच्या दिवशी सात्विक आहार करावा. मांसाहार, जास्त तिखट पदार्थ, दारू यापैकी काहीही खाऊपिऊ नये. व्यसन करणे टाळावे. कोणत्याही प्रकारची नशा करू नये.
  3. व्रत काळात व्रत करणाऱ्याने पाणी पिऊ नये. पण तहानलेल्या नागरिकांना तसेच तहानलेल्या पशूपक्ष्यांना पाणी पाजावे. घरात किंवा घराजवळ जिथे प्राणी पक्षी सहज येतात अशा ठिकाणी पशूपक्ष्यांकरिता पिण्याच्या पाण्याची सोय करून ठेवावी. घराबाहेर रस्त्यावर नागरिकांसाठी पाण्याचा माठ आणि पेला अशी व्यवस्था करावी. 
  4. निर्जला एकादशीच्या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करावे. मनात वाईट विचार येऊ नये म्हणून विष्णू देवाचे नामस्मरण करावे.
  5. व्रत काळात तांदूळ, मुळा, कांदा, वांगं तसेच जमिनीखाली उगवणारी फळे आणि भाज्या खाऊ नये. व्रत काळात वाईट विचार करू नये. व्रत काळात वाईट कृती करू नये. व्रत काळात तामसी आहार अर्थात मांसाहार तसेच तिखट, तेलकट, मसालेदार खाऊ नये. 
  6. व्रत काळात आणि व्रत पूर्ण झाल्यानंतर यथाशक्ती दानधर्म करावा. निर्जला एकादशीच्या दिवशी गरजूंना अन्नदान, वस्त्रदान, पैशांच्या स्वरुपातील दान, अंथरूण-पांघरूणाचे दान वा ताज्या फळांचे दान करणे शुभ समजले जाते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी