अंक शास्त्रानुसार असा घ्या आहार, नेहमी राहाल फिट

आध्यात्म
Updated Aug 13, 2019 | 17:48 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

स्वस्थ राहणे प्रत्येकासाठी आरोग्याच्या दृष्टीने गरजेचे असते. यासाठी तुम्ही एक्सरसाईजसोबत तुमच्या मूलांकानुसार योग्य डाएट ठेवणेही गरजेचे असते. अंक ज्योतिष केवळ तुमचे भाग्य अथवा भविष्याचीच माहिती देत नाही तर आरोग

salad
सलाड 

थोडं पण कामाचं

  • अंक ज्योतिष केवळ जन्म तिथीनेच नव्हे तर तुमच्याशी संबंधित कोणत्याही अंकाच्या माध्यमातून सांगितले जाऊ शकते.
  • प्रत्येक अंक तुमची वागणूक, विचार आणि आरोग्यावर प्रभाव टाकत असतात.
  • जर तुम्ही तुमच्या मूलांकानुसार तुमचा आहार घेतलात तर तुम्ही फिट राहू शकता. 

मुंबई: अंकज्योतिष शास्त्राची व्याप्ती खूप मोठी आहे. या शास्त्रात जन्मतारखेनुसार व्यक्तीचे भाग्य तसेच भविष्यासोबत त्याच्या व्यक्तिमत्वाची माहिती दिली जाते. विशेष म्हणजे अनेकदा अंकज्योतिषाचा खुलासा हा अनेकदा अचूकही असतो. अंक ज्योतिष केवळ जन्म तिथीनेच नव्हे तर तुमच्याशी संबंधित कोणत्याही अंकाच्या माध्यमातून सांगितले जाऊ शकते. तुमच्याशी संबंधित प्रत्येक अंक तुमच्यावर प्रभाव टाकत असतो. मग तो मोबाईल नंबर असो, घराचा नंबर अथवा तुमच्या चपलाचा नंबर. प्रत्येक अंक तुमची वागणूक, विचार आणि आरोग्यावर प्रभाव टाकत असतात. त्यामुळे तुमच्या अंकानुसार तुम्हाला बदलणे गरजेचे असते. विशेष करून तुमच्या खाण्यापिण्याबाबत तुम्हाला अधिक सजग राहिले पाहिजे. जर तुम्ही तुमच्या मूलांकानुसार तुमचा आहार घेतलात तर तुम्ही फिट राहू शकता. 

जाणून घ्या मूलांकानुसार काय खावे 

मूलांक १ -  ज्यांचा मूलांक १ आहे अशा व्यक्तींनी आपल्या आहारात सायट्रिक फूड जसे संत्रे, लिंबू, मोसंबी, डाळिंब यांचा समावेश जरूर करा. यासोबतच त्यांनी ओवा, बेदाणे, केशर, जव, खजूर तसेच सीताफळाचाही आहारात समावेश करावा. 

मूलांक २ - ज्यांचा मूलांक २ आहे अशा व्यक्तींनी आपल्या आहारात केळे, कोबी, शिंगाडा, काकडी सारख्या पाणीदार खाद्य पदार्थांचे सेवन केले पाहिजे. या व्यक्तींनी धान्य कमी आणि सलाड अधिक खाल्ले पाहिजे. 

मूलांक ३ - मूलांक ३ असलेल्या व्यक्तींनी आपल्या आहारात व्हिटामिन सी शी संबंधित पदार्थांचा समावेश करावा. डाळिंब, द्राक्षे, अननस, सफरचंद, नासपती मोठ्या प्रमाणात खाल्ले पाहिजे. यासोबतच पुदिना, बदाम, केशर, लवंग आणि अंजीर खाणेही फायदेशीर ठरते. 

मूलांक ४ - ज्यांचा मूलांक ४ आहे अशा व्यक्तींनी आपल्या डाएटमध्ये मेथी, कडीपत्ता, पालक, कांदा, कारले आणि सर्व प्रकारच्या हिरव्या भाज्या तसेच भरपूर प्रमाणात सलाड खाल्ले पाहिजे. 

मूलांक ५ - मूलांक ५ वाल्या व्यक्तींनी आपल्या डाएटमध्ये प्रत्येक प्रकारच्या ड्राय फ्रुट्सचे सेवन केले पाहिजे. बदाम, अक्रोड, नारळ, बेदाणे, मनुका यांच्यासह भाज्यांचेही सेवन करावे. 

मूलांक ६ - ज्यांचा मूलांक ६ आहे अशा व्यक्तींनी आपल्या आहारात अशा गोष्टींचा समावेश करावा ज्यामुळे शक्ती मिळेल. जसे डाळिंब, अक्रोड, अंजीर, टरबूज, नासपती, सफरचंद, बदाम दररोज खावेत. हिरव्या भाज्यांसह फळभाज्याही खाव्यात. 

मूलांक ७ - मूलांक ७ ज्यांचा असा अशा व्यक्तींनी अशा भाज्या आणि फळे खावीत ज्यात पाण्याचे प्रमाण अधिक असेल जसे काकडी, टोमॅटो, कांदा, लिंबू. याशिवाय द्राक्षे, कोबी, संत्रे आणि भरपूर सलाड हा आपल्या डाएटचा भाग असावा. 

मूलांक ८ - मूलांक ८ असलेल्या व्यक्तींनी भरपूर फळे खाल्ली पाहिजेत. तसेच मोसमात येणाऱी फळे आणि भाज्याही खाल्ल्या पाहिजेत. 

मूलांक ९ - मूलांक ९ असलेल्या व्यक्तींनी आपल्या आहारात हर्ब्सचा जरूर समावेश करावा. जसे आले, पुदिना, कोथिंबीर, लसूण, कांदा, लाल आणि हिरवी मिरची इत्यादी. 

तर आता तुम्हीही तुमच्या जन्म मूलांकाच्या आधारावर आपले डाएट निवडा आणि निरोगी जीवनशैली जगा. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...