Numerology: या तारखांना जन्मलेले लोक जिद्दी आणि कष्टाळू असतात, ते सहजासहजी हार मानत नाहीत 

आध्यात्म
Updated Apr 05, 2022 | 11:56 IST | टाइम्स नाऊ मराठी

Astrology News In Marathi | ज्योतिषशास्त्रामध्ये फक्त राशीच्या आधारावर नाही तर व्यक्तीच्या मूलांकावरून देखील व्यक्तीचा स्वभाव, प्रतिभा आणि भविष्याच्या बाबतीत माहिती मिळू शकते. म्हणजेच व्यक्तीचा जन्म कोणत्या तारखेला झाला आहे याच्यावरून देखील व्यक्तीच्या बाबतीत जाणून घेतले जाऊ शकते.

Numerology The people in Radix Number 9 are stubborn and hardworking
या तारखांना जन्मलेले लोक जिद्दी आणि कष्टाळू असतात  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • व्यक्तीच्या मूलांकावरून देखील व्यक्तीचा स्वभाव जाणून घेता येतो.
  • ज्या लोकांचा जन्म ९, १८ आणि २७ तारखेला होत असतो त्यांचा मूलांक क्रमांक हा ९ असतो.
  • या तारखेला जन्मलेली लोक खूप बुध्दीवान आणि ज्ञानी असतात.

Astrology | मुंबई : ज्योतिषशास्त्रामध्ये फक्त राशीच्या आधारावर नाही तर व्यक्तीच्या मूलांकावरून देखील व्यक्तीचा स्वभाव, प्रतिभा आणि भविष्याच्या बाबतीत माहिती मिळू शकते. म्हणजेच व्यक्तीचा जन्म कोणत्या तारखेला झाला आहे याच्यावरून देखील व्यक्तीच्या बाबतीत जाणून घेतले जाऊ शकते. चला तर म जाणून घेऊया अंकशास्त्रानुसार अशा कोणत्या तारखा आहेत ज्या तारखांना जन्मलेले लोक अत्यंत जिद्दी आणि कष्टाळू स्वभावाचे असतात. (Numerology The people in Radix Number 9 are stubborn and hardworking). 

अधिक वाचा : लोकल प्रवासासाठी लसीकरणाची नाही गरज

अंकज्योतिषशास्त्रानुसार ज्या लोकांचा जन्म ९, १८ आणि २७ तारखेला होत असतो त्यांचा मूलांक क्रमांक हा ९ असतो. त्यामुळे या मूलांकात जन्मलेल्या लोकांनी एखादी गोष्ट करायची ठरवली तर त्यास ते पूर्णत्वास नेल्याशिवाय शांत बसत नाहीत. ते त्या संबंधित कामात यश मिळवूनच मोकळा श्वास घेतात. या लोकांचा स्वभाव जिद्दी आणि कष्टाळू असतो. लक्षणीय बाब म्हणजे या लोकांना जोपर्यंत त्यांचे लक्ष्य साध्य होत नाही तोपर्यंत ते उदास असतात. असे बोलले जाते की या मूलांकातील लोकांचे एखादे काम नाही झाले तर ती गोष्ट त्यांच्या मनाला खूप लागते. 

खूप बुध्दीवान असतात 

दरम्यान, या तारखेला जन्मलेली लोक खूप बुध्दीवान आणि ज्ञानी असतात. त्यामुळे त्यांना आयुष्यात यशाच्या भरपूर संधी मिळतात. या लोकांमध्ये नेतृत्व करण्याची क्षमता असते सोबतच ते समाजासाठी प्रेरणादायी असतात. दरम्यान मूलांक क्रमांक ९ मधील लोक आपल्या नात्यांना खूप महत्त्व देतात. याशिवाय असे लोक आपल्या जीवनाच्या जोडीदारातही असेच गुण शोधतात. पण या लोकांच्या हट्टी आणि चिकाटीच्या स्वभावामुळे त्यांच्या नात्यात काही अडचणी येतात. त्याचबरोबर या राशीच्या लोकांना खूप प्रवास करायला आवडते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी