Nag Panchami 2022: नागपंचमीच्या दिवशी या पद्धतीने करा नागांची पूजा, जाणून घ्या पूजेची योग्य विधी

आध्यात्म
भरत जाधव
Updated Jul 27, 2022 | 11:23 IST

हिंदू संस्कृतीतील (Hindu culture) विविध महत्त्वाच्या दिवसांपैकी नागपंचमीच्या (Nag Panchami ) दिवसाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी नागदेवतेची पूजा (Worship) केल्याने काल सर्प दोषांपासून (Kalsarpa Dosha) मुक्ती मिळते. नागपंचमी हा हिंदू संस्कृतीतील सर्वात महत्वाचा दिवस म्हणून गणला जातो,

Nagapanchami, worship
नागपंचमीच्या दिवशी या पद्धतीने करा नागांची पूजा  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • नागदेवतेची पूजा केल्याने काल सर्प दोषांपासून मुक्ती मिळते.
  • पंचमीला दिवसभर उपवास करून संध्याकाळी भोजन करावे.
  • नागपंचमीच्या दिवशी अनंत, वासुकी, पद्म, महापद्म, तक्षक, कुलीर, कर्कट, शंख, कालिया आणि पिंगल या देवतांची पूजा केली जाते.

Nag Panchami 2022 Puja Vidhi: हिंदू संस्कृतीतील (Hindu culture) विविध महत्त्वाच्या दिवसांपैकी नागपंचमीच्या (Nag Panchami ) दिवसाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी नागदेवतेची पूजा (Worship) केल्याने काल सर्प दोषांपासून (Kalsarpa Dosha) मुक्ती मिळते. नागपंचमी हा हिंदू संस्कृतीतील सर्वात महत्वाचा दिवस म्हणून गणला जातो, नागपंचमी हा श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी येतो. श्रावण (shravan) हा सणांचा राजा मानला जातो. श्रावणातील प्रत्येक दिवसाचे महत्त्व वेगवेगळे आहे. श्रावणात शिवपूजनाला खूप महत्त्व आहे.

श्रावणातील पहिला सण म्हणजे नागपंचमी. श्रावण शुद्ध पंचमीला कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित बाहेर आले, तो दिवस नागपंचमी म्हणून साजरा केला जातो. सापाला शेतकऱ्याचा मित्र मानले जाते.  ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी नाग देवतेची पूजा केली जाते. यावर्षी नागपंचमी 2 ऑगस्ट 2022 रोजी (नागपंचमी तिथी) म्हणजेच मंगळवारी येत आहे. या दिवशी नागदेवतेची पूजा कशी करावी याची योग्य विधी आपण जाणून घेणार आहोत.  

Read Also : बायको नांदायला येत नसल्यानं दारुड्यानं सर केला मोबाईल टॉवर

नागपंचमीला नागाची पूजा का केली जाते?

नागदेवतेची पूजा करून नागपंचमी साजरी केली जाते. हे करणे शुभ आहे कारण यामुळे कुंडलीत काल सर्प दोषापासून मुक्ती मिळते. यासोबतच या दिवशी गरजूंना दान करणे देखील फायदेशीर मानले जाते. नागपंचमीच्या दिवशी काल सर्प दोष पूजेसोबत राहू दोषाचीही पूजा करता येते. पंचमीला दिवसभर उपवास करून संध्याकाळी भोजन करावे. नागपंचमीच्या दिवशी लोक भिंतीवर नागाचा आकार करून पूजा करतात. त्यानंतर नागदेवतेला आवाहन करावे. त्यांना हळद, लाह्या, तांदूळ घालून तिलक लावावा. फुले अर्पण करावी. उदबत्ती करावी. कच्च्या दुधात साखर मिसळून नागदेवतेला पूजा करावी. त्यानंतर नागदेवतेची आरती करावी. 

नागपंचमीचे महत्त्व : 

नागपंचमीच्या दिवशी अनंत, वासुकी, पद्म, महापद्म, तक्षक, कुलीर, कर्कट, शंख, कालिया आणि पिंगल या देवतांची पूजा केली जाते. जे लोक या दिवशी भगवान शंकराची, नागाची पूजा करतात आणि रुद्राभिषेक करतात त्यांच्या जीवनातील सर्व संकटे संपतात. तसेच जर कुंडलीत राहु आणि केतूपासून काही दोष असेल तर या दिवशी नागांची पूजा केल्याने राहु आणि केतू ग्रहांचे अशुभ परिणाम देखील दूर होतात.

Read Also : अजित पवार राज्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाच्या दौऱ्यावर

नागपूजेच्या दिवशी नागदेवतेची पूजा केल्यास कालसर्प आणि सर्पदोषाचा प्रभाव दूर होतो. नागपंचमीला नागदेवतेची पूजा केल्यास कुटुंबात सर्पभय राहत नाही, असे भविष्य पुराणात सांगितले गेले आहे. सर्पभय मुक्तीसाठी नागपंचमीला घराच्या मुख्य दरवाजावर गायीच्या शेणाने नागाची मूर्ती तयार करून त्यावर दूर्वा आणि शेंदूर लावावे.

नागपंचमी पूजेची पद्धत

  • पूजेची खोली गंगाजल किंवा पाण्याने स्वच्छ करा.
  • नंतर चौरंगावर स्वच्छ कापड ठेवा.
  • त्यानंतर नागदेवतेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी.
  • यानंतर तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावा आणि नागदेवतेजवळ ठेवा.
  • यानंतर पूजेचे व्रत घ्यावे.
  • यानंतर नागद्वाताच्या चित्रावर किंवा मूर्तीवर पाणी आणि दूध शिंपडावे आणि हळद, चंदन, कुंकुम, अक्षत आणि फुले, धूप आणि नैवेद्य अर्पण करावा. यानंतर डोळे बंद करून भगवंताचे ध्यान करा आणि त्याचे आशीर्वाद मागा. यानंतर पूजा करताना क्षमा मागावी.

Read Also : सासरच्यांना नको होती मुलगी; डॉक्टरनं कापून बाहेर काढला गर्भ

नागपंचमी पूजेचे फायदे

अनेक पौराणिक लेखांमध्येही नागपंचमीचा उल्लेख आढळतो. पौराणिक कथेनुसार, जो कोणी या दिवशी नागदेवतेची पूजा करतो तो राहू आणि केतू या अशुभ ग्रहांनी आणलेल्या सर्व प्रकारच्या संकटांपासून वाचतो. ज्योतिष शास्त्रानुसार काल सर्प दोषाने ग्रस्त असलेल्या कोणत्याही व्यक्तीला त्याच्या वाईट परिणामांपासून मुक्ती मिळू शकते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी